agriculture news in marathi, hasan mushrif, raju shetty speak about farmers, kolhapur, maharashtra | Agrowon

`ऊस उत्पादकांवरील अन्याय सहन करणार नाही`

टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

कोल्हापूर  ः पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत शासकीय लेखापरीक्षक चुकीची तपासणी करत आहेत. त्यांनी त्यात तत्काळ दुरुस्ती करावी किंवा तपासणी बंद करावी; पण शेतकऱ्यांचे नुकसान करू नये. पूरग्रस्त ऊस उत्पादकांवरील अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ व माजी खासदार राजू शेट्टी यांनी संयुक्त पत्रकातून दिला आहे.

कोल्हापूर  ः पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत शासकीय लेखापरीक्षक चुकीची तपासणी करत आहेत. त्यांनी त्यात तत्काळ दुरुस्ती करावी किंवा तपासणी बंद करावी; पण शेतकऱ्यांचे नुकसान करू नये. पूरग्रस्त ऊस उत्पादकांवरील अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ व माजी खासदार राजू शेट्टी यांनी संयुक्त पत्रकातून दिला आहे.

अतिवृष्टीमुळे ऊस पिकाचे अपरिमित नुकसान झाले आहे. याबाबत शासनाने २३ व २७ ऑगस्टला नुकसानीची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. तथापि आदेशानुसार तपासणी होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून आपल्याकडे येत आहेत. बाधित शेतकऱ्यांनी संबंधित बॅंकेच्या मंजूर प्रतिहेक्‍टरी पीक कर्ज दरानुसार कमाल एक हेक्‍टरच्या उत्पादनासाठी प्रत्यक्ष उचल केलेली व परतफेड न केलेली रक्कम कर्जमाफीस पात्र आहे, असा शासन निर्णय झाला आहे. त्याप्रमाणे जिल्हा तज्ज्ञ समितीने ठरवलेल्या पीक कर्ज दराप्रमाणे नुकसानभरपाई द्यायची आहे, असे या पत्रकात म्हटले आहे.

२०१९-२० मध्ये ऊस पिकासाठी हेक्‍टरी ९५ हजार कर्ज देण्याचे ठरले. प्रतिगुंठा ही रक्कम ९५० रुपये येते. त्याप्रमाणे पंचनामा यादीतील जेवढे क्षेत्र बाधित आहे, तेवढ्या क्षेत्राला ९५० रुपयांप्रमाणे कर्जमाफीचा लाभ देणे आवश्‍यक आहे. तथापि असा लाभ दिला जात नाही. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक यांनी नोंद घ्यावी व तत्काळ दुरुस्ती करून जास्तीत जास्त पूरग्रस्त शेतकरी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, फेरपंचनामे करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...
जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटातजळगाव  ः जिल्ह्यात रोज सुमारे साडेसहा लाख...
जळगावात पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथजळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
`औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीची मुदत...औरंगाबाद : झालेली मका खरेदी व बाकी असलेली...
धुळे जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा...देऊर, जि. धुळे  : जिल्ह्यात मका पिकावर...
सांगलीत दुग्ध व्यवसाय बंद पडण्याच्या...सांगली  ः शेतीपूरक दूग्ध व्यवसाय पशुखाद्य...
सिंधुदुर्गात दुध संकलनाची शासकीय...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात दुध संकलन करणाऱ्या...
कोल्हापुरात बिलांअभावी...कोल्हापूर : दुध संघांकडून वेळेत बिले मिळत...
‘पीकविमा प्रस्तावासाठी जनसुविधा केंद्र...नांदेड : ‘‘जिल्ह्यातील जनसुविधा केंद्र (सीएससी)...
परभणीत दर कपातीमुळे दूध उत्पादकांसमोर...परभणी : शासकीय दुग्धशाळेतील दूधाचे दर स्थिर आहेत...
सोलापुरात पावसाने जूनची सरासरी केली...सोलापूर  ः जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली...
भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांतील...सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा...
पुणे जिल्ह्यात दूध दराअभावी शेतकऱ्यांचे...पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे....
हिंगोलीत ‘कर्जमुक्ती’तून ७० हजार...हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
साताऱ्यात कमी दूध दरामुळे उत्पन्न,...सातारा ः दुष्काळग्रस्त तसेच बागायती भागातील...
कृषी केंद्रात दरफलक नसल्यास...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालविणाऱ्या...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’ने केली वीज...सोलापूर : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात...
नगर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक मेटाकुटीलानगर ः जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू...
पदरमोड करून दूध व्यवसाय करण्याची...सोलापूर  ः चारा व पशुखाद्याच्या वाढत्या...
कोल्हापुरात वाढीव वीज बिलांची होळीकोल्हापूर : वाढीव वीज बिलांविरोधात येथील...