कृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः डॉ. अनिल बोंडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कृषी सुधारणा कायदे करून शेतकऱ्यांना नवीन दालन उपलब्ध करून दिले आहे. परंतु शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करणारे नेते केवळ मोदी यांना यश मिळेल म्हणून देशात द्वेषपूर्ण राजकारण करीत आहेत, असा आरोप भाजप किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी केला.
Hateful politics over agricultural laws: Dr. Anil Bonde
Hateful politics over agricultural laws: Dr. Anil Bonde

अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कृषी सुधारणा कायदे करून शेतकऱ्यांना नवीन दालन उपलब्ध करून दिले आहे. परंतु शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करणारे नेते केवळ मोदी यांना यश मिळेल म्हणून देशात द्वेषपूर्ण राजकारण करीत आहेत, असा आरोप भाजप किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी केला.

केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात जिल्हा भाजप व शेतकरी आघाडीच्या वतीने निंबा फाटा येथे ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. बोंडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर होते.

यावेळी दोन नवीन ट्रॅक्टरचे पूजन करून शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. आमदार सावरकर यांनी महाराष्ट्रात विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रकार होत असल्याचे सांगितले. अकोला जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानंतरसुद्धा सर्व्हे, पंचनामे न करणे हा प्रकार निंदनीय असून मानवतेच्या दृष्टीने चुकीचा असल्याचे म्हटले. यावेळी व्यासपीठावर भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात, माजी महापौर विजय अग्रवाल, शामराव शेलार, श्रीकृष्ण मोरखडे, अमर साबळे, जयंत मसने, माधव मानकर यांच्यासह इतर उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com