agriculture news in marathi, The havoc of swine flu, 16 dead in 24 days | Agrowon

नाशिकला स्वाईन फ्ल्यूचा कहर, 24 दिवसांमध्ये 16 बळी
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युने कहर केलाय. रविवारी (ता.१६) सकाळी इंदिरानगरमधील प्रशांत सुभाष कुलकर्णी (वय 48) यांच्या मृत्युमुळे बळींची संख्या अठरा झालीय. त्यात शहर-जिल्ह्यात 24 ऑगस्टनंतर दगावलेल्या 16 जणांचा समावेश आहे. पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्युचा धोका वाढल्याने आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे यांनी आज विशेष आढावा बैठक घेत तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. 

नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युने कहर केलाय. रविवारी (ता.१६) सकाळी इंदिरानगरमधील प्रशांत सुभाष कुलकर्णी (वय 48) यांच्या मृत्युमुळे बळींची संख्या अठरा झालीय. त्यात शहर-जिल्ह्यात 24 ऑगस्टनंतर दगावलेल्या 16 जणांचा समावेश आहे. पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्युचा धोका वाढल्याने आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे यांनी आज विशेष आढावा बैठक घेत तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. 

प्रशांत कुलकर्णी यांना गेल्या गुरुवारी (ता.13) जिल्हा सरकारी रुग्णालयात स्वाईन फ्ल्यू विशेष कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यांचा वैद्यकीय अहवाल "पॉझिटिव्ह' होता. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच आज सकाळी साडेदहाला त्यांचा मृत्यु झाला. जिल्हा रुग्णालयाच्या विशेष स्वाईन फ्ल्यू कक्षामध्ये 21 रुग्ण दाखल असून यापैकी 12 रुग्णांना स्वाईन फ्ल्युची लागण झाली आहे. उर्वरित रुग्णांचे वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. "पॉझिटिव्ह' रुग्णांमध्ये 9 पुरुष व 3 महिलांचा समावेश आहे. तसेच विशेष कक्षामध्ये दाखल रुग्णांमध्ये नाशिक महापालिका क्षेत्रातील 13 रुग्ण आहेत. 

नाशिकमध्ये अधिक फैलाव 
स्वाईन फ्ल्युने दगावलेल्या 18 रुग्णांमध्ये 6 रुग्ण हे नाशिक महापालिका क्षेत्रातील, 10 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. चांदवड, येवला, निफाड, मालेगाव या तालुक्‍यातून अधिक रुग्ण दाखल होत आहेत. नाशिकमधील इंदिरानगर, पंचवटी, जेलरोड भागातील रुग्ण संख्या अधिक आहे. आत्तापर्यंत दगावलेल्या 22 रुग्णांमध्ये स्वाईन फ्ल्यू व्यतिरिक्त चार रुग्ण हे निमोनिया, क्षयरोगाने दगावले आहेत. 

घरोघरी जाऊन तापाच्या रुग्णांची माहिती घ्या : डॉ. कांबळे 
जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युमुळे दगावलेल्या रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यास वेळीच अटकाव करण्यासाठी ग्रामपातळीवर अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या व आरोग्यसेविकांना घरोघरी जाऊन तापाच्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना डॉ. कांबळे यांनी दिल्यात. तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी आरोग्य विभागाच्या संपर्कात राहून उपचार करावेत. तालुकास्तरावर खासगी रुग्णालयांच्या बैठका घेऊन स्वाईन फ्ल्युला अटकाव करण्यासाठीच्या उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा सरकारी रुग्णालयास भेट देत आढावा बैठक घेतली आणि त्यांनी स्वाईन फ्ल्यू विशेष कक्षाला भेट दिली.

बैठकीसाठी सहसंचालक डॉ. प्रकाश भोये, नाशिक विभागाच्या उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे, नाशिक महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयराम कोठारे यांच्यासह जिल्ह्यातील उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. 

महापालिका रुग्णालयाने द्यावी सुविधा 
जिल्हा सरकारी रुग्णालयात नाशिक महापालिका क्षेत्रातून स्वाईन फ्ल्युसदृश्‍य तापाचे रुग्ण दाखल होताहेत. त्यामुळे महापालिकेने त्यांच्या रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्ल्यू कक्ष सुरू करून औषधांचा साठा उपलब्ध करण्याच्या सूचना महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कोठारे यांना यावेळी आरोग्य संचालकांनी दिल्या. 

स्वाईन फ्ल्यू बळींची संख्या 

  • राज्य : 54 
  • नाशिक जिल्हा : 10 
  • नाशिक महापालिका क्षेत्र : 6 
  • नाशिकमधील इतर जिल्ह्याचे : 2 

राज्यातील आजाराची स्थिती 

  • रुग्णांची स्वाईन फ्ल्यू तपासणी : 13 लाख 93 हजार 299 रुग्ण 
  • स्वाईन फ्ल्यू सदृश्‍य ताप : 17 हजार 454 रुग्ण 
  • स्वाईन फ्ल्युबाधित रुग्ण : 446 
  • डेंग्युचे बळी : 9 
  • स्क्रब टायपसचे बळी : 11 

"ताप आल्यास तो अंगावर न काढता तत्काळ डॉक्‍टरांकडे जावे. खासगी रुग्णालयांनाही तापाच्या रुग्णांना "टॅमी-फ्ल्यू' देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच "टॅमी-फ्ल्यू'चा पुरेसा साठाही उपलब्ध आहे. संसर्गजन्य असल्याने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.'' 
- डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक. 

इतर ताज्या घडामोडी
कलिंगडांच्या जनुकीय प्रदेशांचा घेतला...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट कलिंगडाच्या सात...
औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीसाठी दहा...औरंगाबाद : मक्याला किमान आधारभूत किंमत मिळावी,...
सांगली जिल्ह्यात यंदा पावसाची ‘रेकॉर्ड...सांगली : जिल्ह्यात गेल्या २० वर्षातील सर्वाधिक...
युरिया ब्रिकेटची पन्हाळा तालुक्यात शंभर...कोल्हापूर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन...
परभणीत साडेचार लाख हेक्टरवर पिके वायापरभणी : ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे...
शिरपूर उपबाजारात सोयाबीनची आवक वाढलीशिरपूर, जि. वाशीम  : सलग सुरू असलेला पाऊस...
पणन संचालकपदी कोणाची वर्णी लागणार?पुणे ः शेतमाल विपणनच्या ३०७ बाजार समित्या, ९००...
धक्कादायक ! कांदा नुकसानीच्या...नाशिक  : चालू वर्षी दुष्काळामुळे होरपळून...
अमरावती : रब्बी हंगाम क्षेत्रात होणार...अमरावती ः मॉन्सूनोत्तर पाऊस खरीप पिकांच्या मुळावर...
‘भातकुली’वर पाणीटंचाईचे सावटअमरावती  ः सुरुवातीला उघडीप त्यानंतर...
पुणे विभागात रब्बीचा चार लाख हेक्टरवर...पुणे  ः ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत...
साताऱ्यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून...सातारा ः अतिपावसाने शेती क्षेत्राचे कोट्यवधींचे...
पुणे बाजार समितीत ‘ई-नाम’ची अंमलबजावणी...पुणे :  शेतीमालाच्या ऑनलाइन लिलावांतून...
माण तालुक्यात पीक पंचनाम्यांमध्ये...दहिवडी, जि. सातारा  : पावसाने जोरदार तडाखा...
राज्यात अखेर राष्ट्रपती राजवटमुंबई ः चौदाव्या विधानसभेसाठी कोणत्याच...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस...कोल्हापूर  : यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीच्या...
विमा प्रतिनिधी शोधताना शेतकऱ्यांची दमछाकयवतमाळ ः मॉन्सूनोत्तर पावसाने झालेल्या...
‘बुलबुल’ प्रभावित शेतकऱ्यांना मदत जाहीरभुवनेश्‍वर, ओडिशा:  राज्याला बुलबुल...
तण निर्मूलनातून तण व्यवस्थापनाकडेवास्तविक तण विज्ञानाचा संबंध विविध कृषी शाखांशी...
जळगावात कोबी १८०० ते ३००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...