Agriculture news in marathi; he agitation stalled due to rising milk prices | Page 2 ||| Agrowon

नाशिक : दुधाचे दर वाढवून मिळाल्याने आंदोलन स्थगित

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील दूध उत्पादकांना दुधाचे दर वाढवून मिळावे, तसेच पशुखाद्याचे दर दुप्पट झाल्याने दूध उत्पादक शेतकरी पुरता अडचणीत आला असल्यामुळे आंदोलनाचा पवित्रा दूध उत्पादकांनी घेतला होता. मात्र, दुधाचे दर वाढवून मिळाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील दूध उत्पादकांना दुधाचे दर वाढवून मिळावे, तसेच पशुखाद्याचे दर दुप्पट झाल्याने दूध उत्पादक शेतकरी पुरता अडचणीत आला असल्यामुळे आंदोलनाचा पवित्रा दूध उत्पादकांनी घेतला होता. मात्र, दुधाचे दर वाढवून मिळाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

दूध उत्पादक आंदोलनकर्ते रविवारी (ता. ८) घोटी येथील महामार्गावर आंदोलनासाठी जमले होते. आंदोलन सुरू असताना अमूल मिल्कचे प्रतिनिधी भारत मुसळे व एस. एस. आर. थोरात मिल्कचे प्रतिनिधी रमेश गायकर यांनी दूध उत्पादकांच्या मागण्या मान्यता करून दूध दर वाढवून दिल्याचे जाहीर केले. इगतपुरी तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आंदोलनापूर्वी एका फॅटला ५ रुपये ७० पैसे असा भाव मिळत होता. मात्र, आता दूध संकलन करणाऱ्या कंपनीने प्रतिफॅट ६.६० रुपये दूध दर केल्याने प्रतिफॅटमागे ९० पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले. प्रहार संघटना व शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी जमले होते. दरम्यान, पशुखाद्य दराबाबत मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला आहे. 

दूध वितरणावर परिणाम अन् आंदोलनाला यश
दूध उत्पादकांनी एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन पुकारले होते. त्यामुळे हॉटेल, चहा विक्रेते यांना दूध वेळेवर मिळू शकले नाही. तर ऐन गणेशोत्सव काळात दूध वितरणावर परिणाम दिसून आला. 


इतर ताज्या घडामोडी
नगर : चारा उत्पादनाबाबत मिळतेय अंदाजे...नगर ः खरीप, रब्बी हंगामासह चारापिके, कुरण, जंगल...
कर्जमाफीची दुसरी यादी उद्यासोलापूर : महाविकास आघाडीने महात्मा जोतिराव फुले...
सातारा जिल्ह्यात अवघे ३२ टक्के कर्जवाटपसातारा ः जिल्ह्यातील कर्जमाफीत अडकलेल्या...
नाशिक विभागात पहिल्या टप्प्यात होणार ७१...नगर  ः राज्यात ५० कोटी वृक्षलागवडीचे...
खानदेशात कापसाची खेडा खरेदी मंदावलीजळगाव  ः खानदेशात कापसाची बाजारातील आवक कमी...
मुली, स्त्रियांमध्ये अजूनही...जळगाव  : मुली, स्त्रियांमध्ये अजूनही...
दोडामार्ग : साडेतीन हजार केळी झाडांचे...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यातील वीजघर, बांबर्डे (...
पवनारमधील शेती कसण्यासाठी करावा लागतोय...वर्धा  ः धाम नदीच्या दुसऱ्या बाजूस शेती...
व्यवस्थापन मसाला पिकांचे...मिरी वेल आणि जायफळास पुरेसे पाणी आणि खत...
उष्ण तापमानाचा केळी बागेवर परिणामउष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी...
लागवड पालेभाज्यांची....पाण्याची उपलब्धता असल्यास कमी कालावधीत...
वर्षभरात चार हंगामांत फायदा देणारा घेवडासातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात बहुतांशी उसाचे...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची १८७५ ते २८१०...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे विद्यापीठात पश्चिम विभागीय औषधी...पुणे  ः केंद्र सरकारच्या आयुष...
शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळ्यासाठीची...शिर्डी, जि. नगर  : साई सिद्धी चॅरिटेबल...
माळेगाव कारखान्यात सत्तापरिवर्तन;...माळेगाव, जि. पुणे  ः राज्यात लक्षवेधी...
नगर जिल्ह्यातील सहा केंद्रांवर तूर...नगर  ः जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीसाठी आठ...
कर्जमाफीवरून विरोधक दुसऱ्या दिवशीही...मुंबई  ः भाजपने शेतकरी कर्जमाफी आणि महिला...
सातारा जिल्ह्यात ९० टक्के क्षेत्रावर...सातारा  ः जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे रब्बी...
मसाला, सुगंधी वनस्पतीवर्गीय पिकांची...अकोला  ः ‘‘आपल्याकडील हवामान, जमीन हे मसाला...