Agriculture news in marathi; he agitation stalled due to rising milk prices | Page 2 ||| Agrowon

नाशिक : दुधाचे दर वाढवून मिळाल्याने आंदोलन स्थगित
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील दूध उत्पादकांना दुधाचे दर वाढवून मिळावे, तसेच पशुखाद्याचे दर दुप्पट झाल्याने दूध उत्पादक शेतकरी पुरता अडचणीत आला असल्यामुळे आंदोलनाचा पवित्रा दूध उत्पादकांनी घेतला होता. मात्र, दुधाचे दर वाढवून मिळाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील दूध उत्पादकांना दुधाचे दर वाढवून मिळावे, तसेच पशुखाद्याचे दर दुप्पट झाल्याने दूध उत्पादक शेतकरी पुरता अडचणीत आला असल्यामुळे आंदोलनाचा पवित्रा दूध उत्पादकांनी घेतला होता. मात्र, दुधाचे दर वाढवून मिळाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

दूध उत्पादक आंदोलनकर्ते रविवारी (ता. ८) घोटी येथील महामार्गावर आंदोलनासाठी जमले होते. आंदोलन सुरू असताना अमूल मिल्कचे प्रतिनिधी भारत मुसळे व एस. एस. आर. थोरात मिल्कचे प्रतिनिधी रमेश गायकर यांनी दूध उत्पादकांच्या मागण्या मान्यता करून दूध दर वाढवून दिल्याचे जाहीर केले. इगतपुरी तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आंदोलनापूर्वी एका फॅटला ५ रुपये ७० पैसे असा भाव मिळत होता. मात्र, आता दूध संकलन करणाऱ्या कंपनीने प्रतिफॅट ६.६० रुपये दूध दर केल्याने प्रतिफॅटमागे ९० पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले. प्रहार संघटना व शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी जमले होते. दरम्यान, पशुखाद्य दराबाबत मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला आहे. 

दूध वितरणावर परिणाम अन् आंदोलनाला यश
दूध उत्पादकांनी एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन पुकारले होते. त्यामुळे हॉटेल, चहा विक्रेते यांना दूध वेळेवर मिळू शकले नाही. तर ऐन गणेशोत्सव काळात दूध वितरणावर परिणाम दिसून आला. 

इतर बातम्या
साताऱ्यातील तीन तालुक्यांत पाणीटंचाई...सातारा : गेल्या दोन दिवसांत माण, खटाव, फलटण या...
चाळीसगाव तालुक्‍यात अद्यापही टॅंकर सुरूचजळगाव  ः जिल्ह्यात यंदा पावसाने नाबाद ११५.५...
पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ४२ कोटींचे...पुणे : गेल्या जुलै व ऑगस्ट महिन्यांत...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची लागवड...नाशिक  : महाराष्ट्रात होणारी खरीप कांद्याची...
मराठवाड्यात २७१ मंडळांमध्ये बरसला पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या...अकोला  ः शेगाव येथे नुकत्याच झालेल्या राज्य...
सातारा जिल्ह्यातील चार साखर...सातारा  : गाळप हंगामातील ऊस उत्पादकांची...
‘आदिनाथ'च्या कामगारांचे पगारासाठी ‘...सोलापूर : आदिनाथ साखर कारखान्याकडून ४१ महिने...
उजनी कालवा फुटला, पिके उद्‌ध्वस्तमोहोळ, जि. सोलापूर : उजनी धरणाचा डावा कालवा मोहोळ...
आधुनिक तंत्रांचा वापर करून स्मार्ट शेती...अकोला : ऊतिसंवर्धित हळद रोपांची निर्मिती आणि...
सांगली जिल्ह्यात अजूनही ९१ टॅंकर सुरूचसांगली  ः जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासूनच...
सिंधुदुर्गातील वृद्ध दाम्पत्यावर...सिंधुदुर्ग  ः पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी...
पुणे जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदानपुणे : ‘‘विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात शहरी...
अखेर बगाजी सागर ‘ओव्हर फ्लो’धामणगाव रेल्वे, जि. अमरावती  : अमरावती आणि...
सरकी ढेपेचे दर कडाडल्याने दूध उत्पादक...अकोला : दुधाळ जनावरांना पोषक खाद्य म्हणून खाऊ...
'स्मार्ट' मुख्यालयाला मिळाली नवी जागापुणे :  राज्याच्या स्मार्ट प्रकल्पाच्या...
सोलापूर जिल्ह्यात मका लष्करी अळीने केला...सोलापूर ः दुष्काळातही जेमतेम पाण्यावर यंदा...
लष्करी अळीपासून कपाशीला धोका नाहीः कृषी...पुणे: राज्याच्या कापूस पिकाला अमेरिकन लष्करी...
खानदेशातही कापसावर लष्करी अळीजळगाव  : खान्देशात जळगाव, धुळे जिल्ह्यांतील...
विधानसभेचा बिगुल वाजलामुंबई: चौदाव्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे...