साहेब, शाळा शिकायची; पण गावात एसटीच नाही !

बऱ्हाणपुरातील मुलींनी कृषिमंत्र्यांकडे मांडली व्यथा
बऱ्हाणपुरातील मुलींनी कृषिमंत्र्यांकडे मांडली व्यथा

अमरावती  ः ‘‘आम्हाला शिकण्याची इच्छा असली तरी गावातून शाळा असलेल्या रिद्धपूरला जाण्याकरिता बस नाही, त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो.’’ बऱ्हाणपूर येथील मुलींनी मांडलेल्या या समस्येची तत्काळ दखल घेत कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी बससेवा सुरू करण्याचे निर्देश एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले. कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते बऱ्हाणपूर (ता. मोर्शी) येथे ग्रामपंचायत इमारतीत कृषी सहायक कार्यालयाचे उद्‍घाटन पार पडले. या वेळी त्यांनी ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला. याच दरम्यान गावातील काही मुलींनी शिक्षणासाठी जाण्याकरिता गावातून बस नसल्याचे सांगीतले. डॉ. बोंडे यांनी तेथूनच एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांशी संपर्क साधत, बससेवा सुरु करण्याचे निर्देश दिले. षिमंत्र्यांच्या या धडक कृती कार्यक्रमाबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. गावात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, घरकुलाचे काम पूर्ण करावे, कृषी सहाय्यकांनी पूर्णवेळ कार्यालयात उपस्थित राहावे व स्वतःचा मोबाईल क्रमांक फलकावर ठळकपणे नमूद करण्याचे निर्देशही कृषिमंत्र्यांनी यावेळी दिले. जलयुक्‍त शिवार, प्रधानमंत्री पीक विमा योजना, कृषी यांत्रिकीकरण, शेततळे अशा अनेकविध योजनांच्या अंमलबजावणीवर भर देण्याची सूचना त्यांनी केली. 

रिद्धपूरला कृषी सहायक कार्यालय रिद्धपूर येथे देखील कृषिमंत्र्यांच्या हस्ते कृषी सहायक कार्यालयाचे उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी महंत वाईनदेशकर बाबा, यक्षदेवबाबा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, वसुधाताई बोंडे, सारंग खोडस्कर, सरपंच गोपाल जामठे, प्रमोद हरणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com