Agriculture news in marathi; he controversy over the business complex in Jalgaon Market Committee | Agrowon

जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुलावरून वादंग कायम
टीम अॅग्रोवन
रविवार, 23 जून 2019

जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नियोजित नवीन व्यापारी संकुलाच्या बांधकामावरून अडतदार, व्यापाऱ्यांचा विरोध कायम असून, मागील १०-१२ दिवसांपासून धान्य मार्केटयार्डात अघोषित बंदची स्थिती आहे. तर नवीन व्यापारी संकुलामुळे बाजार समितीला एकरकमी सहा कोटी रुपये रक्कम मिळेल व वर्षाकाठी २५ लाख रुपये शुल्क भाड्यापोटी मिळेल. यामुळे बाजार समितीची आर्थिक स्थिती सुधारेल, असा दावा सभापती कैलास चौधरी यांनी केला आहे. 

जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नियोजित नवीन व्यापारी संकुलाच्या बांधकामावरून अडतदार, व्यापाऱ्यांचा विरोध कायम असून, मागील १०-१२ दिवसांपासून धान्य मार्केटयार्डात अघोषित बंदची स्थिती आहे. तर नवीन व्यापारी संकुलामुळे बाजार समितीला एकरकमी सहा कोटी रुपये रक्कम मिळेल व वर्षाकाठी २५ लाख रुपये शुल्क भाड्यापोटी मिळेल. यामुळे बाजार समितीची आर्थिक स्थिती सुधारेल, असा दावा सभापती कैलास चौधरी यांनी केला आहे. 

बाजार समितीच्या दर्शनी भागात मुख्य प्रवेशद्वारानजीक १८० गाळ्यांचे दुमजली व्यापारी संकुल उभारण्याचे नियोजन आहे. त्यासंबंधी विकासकाने काही दिवसांपूर्वी कार्यवाही सुरू केली. यातून बाजार समितीची संरक्षण भिंत पाडली व जलकुंभही काढण्यात आला. या संकुलामुळे धान्य मार्केट यार्डातील पहिल्या रांगेतील अडत दुकानांना रस्ता कमी मिळेल व धान्याचे मोजमाप व इतर कार्यवाहीला अडचणी येतील. हे संकुल उभारू नका, असे बाजार समितीमधील अडत असोसिएशनने म्हणणे आहे. 

प्रशासनाचा संकुलासाठी प्रयत्न
बाजार समिती प्रशासन व संचालक हे संकुल व्हावे यासाठी कार्यवाही करीत आहे. व्यापारी किंवा अडतदार यांच्या आडमुठेपणामुळे नवीन संकुल उभे राहू शकत नसल्याचे सभापती कैलास चौधरी यांनी म्हटले आहे. शासनाने नियमनमुक्ती आणली आहे. पुढे बाजार समितीचे उत्पन्न कमी होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत हवे आहेत.  बाजार समितीचे उत्पन्न कमी आहे. वेतन, निवृत्त कर्मचाऱ्यांचे देणे देताना अडचणी येतात. उत्पन्न वाढायला हवे, असेही सभापती चौधरी यांनी सांगितले.

धान्याची आवकच नाही, तर बंद कसला
जळगाव बाजार समितीत धान्याचे एरवी रोज लिलाव होत नाहीत. शेतकऱ्याने धान्य आणले की, अडतदार ते पाच-सात दिवस आपल्याकडेच ठेवतात. शेतकऱ्यासमोर मोजमाप, तोलाई केली जात नाही. लिलावांना अडतदार विरोध करतात. यामुळे अनेक शेतकरी आपले धान्य विक्रीसाठी चोपडा, अमळनेर, शिरपूर, नंदुरबार येथे जातात. यातच सध्या धान्य मार्केट यार्डात धान्याची कोणतीही आवक नसल्याने बंदचा कोणताही परिणाम बाजार समितीच्या उत्पन्नासंबंधी होत नसल्याचा दावाही काही संचालकांनी केला आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सांगली : महापुरात खरीप पिकांचे मोठे नुकसान...
बीड जिल्ह्यात हमीभाव शेतीमाल खरेदीची...बीड : हमीदराने शेतीमाल खरेदीच्या नोंदणीत...
भाजप सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या...बीड : आम्ही विविध भागात औद्योगिक वसाहती आणि...
पुणे जिल्ह्यातील ३१७६ हेक्टर क्षेत्राला...पुणे  ः जिल्ह्यात २५ सप्टेंबरला झालेल्या...
पुणे जिल्ह्यात होणार २३५४ पीककापणी...पुणे   ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा...
पुणे जिल्ह्यात लसीकरण पडताळणीसाठी...पुणे  : महाराष्ट्र राज्य लाळ खुरकूत रोगमुक्त...
नगर जिल्ह्यात बाराशे हेक्टरवर ज्वारी...नगर : कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध...
सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप; खरीप...सातारा  ः पावसाने उघडीप दिल्याने खरिपातील...
रविकांत तुपकर यांचा पुन्हा `स्वाभिमानी`...कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अंतर्गत...
वऱ्हाडात टेक्स्टटाइल, अन्न प्रक्रिया...अकोला  ः विदर्भातील वऱ्हाड हा भाग...
पावसाळी वातावरणात डाऊनी नियंत्रणासाठी...सर्वच द्राक्ष विभागामध्ये गुरुवार ते सोमवार (ता....
लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली,...उस्मानाबाद : मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद...
धुळे : कांदा दरप्रश्‍नी शेतकरी संघटनेचे...धुळे  ः कांद्याचे दर बऱ्यापैकी वाढल्याने...
शिराळा तालुक्यात भाताचे उत्पादन २०...सांगली : शिराळा पश्‍चिम भाग हा भातपिकाचे माहेरघर...
शेतकऱ्यांना दरवर्षी दहा हजार देणारच :...इस्लामपूर, जि. सांगली  : ‘‘ गेल्या पाच...
उत्पादन खर्चावर आधारित दर हवेत :...भारत हा शेतीप्रधान देश असे आपण म्हणत असतो. मात्र...
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारच : उध्दव...सोलापूर : ‘‘शिवसेना बोलते ते करते, आम्ही...
अकोला जिल्ह्यात शासनाच्या हमीभाव...अकोला ः शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळवून...
पीकविम्याबाबत असुरक्षिततेचीच भावना...केंद्र सरकारने मोठा गाजा-वाजा करीत जाहीर केलेल्या...
`चासकमान`मधील आवर्तन तब्बल ८९...चास, जि. पुणे  ः चासकमान (ता. खेड) धरणातून...