राज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक आहे.
ताज्या घडामोडी
मांजरपाडा प्रकल्पग्रस्तांची पूल ओलांडताना होतेय अडचण
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील मांजरपाडा वळण योजनेअंतर्गत देवसाने गावच्या खालील बाजूस पाणी अडवून बोगद्याद्वारे प्रवाही पद्धतीने गोदावरी खोऱ्यातील पुणेगाव धरणाच्या वरील बाजूस उनंदा नदीत सोडण्यात आले आहे. यामुळे उनंदा नदीचे पात्र खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आल्याने हनुमंतपाडा व हस्ते दुमाला या परिसरातील स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रामुख्याने येथील पूल ओलांडताना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे समोर आले आहे.

गुजरातमध्ये वाहून जाणारे पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी अडवून ते वळण योजनांद्वारे पूर्ववाहिनी गोदावरी खोऱ्यामध्ये वळविण्यात आले आहे. मात्र, उनंदा नदीवर मजबूत पूल नसल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. दैनंदिन गैरसोय होत असताना स्थानिकांना आश्वासन देऊन या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली नाही. या ठिकाणी तात्पुरता लोखंडी पूल बांधला असून, पुलाला कठडे नसल्याने जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागते.
तर शेतीमाल काढल्यानंतर तो बाहेर आणण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागते. उनंदा नदीतील उघड्या सुमारे ३० फूट चाऱ्यांद्वारे हस्ते दुमाला या गावाजवळ उनंदा नदीत पाणी प्रवाहित होत आहे. हे प्रवाहित पाणी पुढे गोदावरी खोऱ्यातील पुणेगाव धरणात जाते. मात्र, स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालून तातडीने हे काम करावे, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.