agriculture news in Marathi healstorm in Mahabaleshwar Maharashtra | Agrowon

क्षेत्र महाबळेश्वर येथे गारपीट 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 मार्च 2021

क्षेत्र महाबळेश्वर येथे बुधवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. गारांसह पडणाऱ्या पावसाचा जोर मोठा होता. अक्षरशः रस्त्यावर गारांचा खच पडल्याने आर्थरसिट पॉइंट रस्ता बर्फाने भरून गेला होता.

सातारा ः क्षेत्र महाबळेश्वर येथे बुधवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. गारांसह पडणाऱ्या पावसाचा जोर मोठा होता. अक्षरशः रस्त्यावर गारांचा खच पडल्याने आर्थरसिट पॉइंट रस्ता बर्फाने भरून गेला होता. या परिसरातील स्ट्रॅाबेरी, फराशीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. 

जावळी तालुक्‍यात आनेवाडी, सायगाव, रायगाव, खर्शी तर्फे कुडाळ, महिगाव, मोरघर, दुदुस्करवाडी, महामुलकरवाडी येथील परिसरात बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. बेलावडे, आर्डे, सोनगाव परिसरात गारांच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

शेतशिवारात अजूनही पीक काढणीची लगबग सुरू असल्याने शेतकऱ्यांची अचानक सुरू झालेल्या पावसामुळे तारांबळ उडाली होती. अजूनही काही ठिकाणी गहू,ज्वारीची पिके उभी आहेत. मात्र, या पावसाने गहू व ज्वारी काही ठिकाणी भुईसपाट झाली आहे. 

काढून ठेवलेली ज्वारीही भिजल्याने ज्वारीच्या उत्पन्नात घट होऊन ज्वारी काळी पडणार आहे. गहू, कांद्याच्या पिकांची देखील अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी शेतामध्ये गहू काढणीसाठी आणलेले हार्वेस्टर मशिन पावसामुळे शेतातच अडकून पडले होते. वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी शेतातील पिकांचे नुकसान झाले. आंब्यांना आलेला मोहर गळून पडला होता. 
 


इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...