जनावरांच्या आजाराकडे नको दुर्लक्ष

पशूतज्ज्ञ आजार निदानासाठी जनावर आजारी असतानाची माहिती, गोठ्याचे व्यवस्थापन, खाद्याचे नियोजन व आजाराची लक्षणे आणि तपासणी करून योग्य निदान करतो.
Keeping animal shed and animals clean does not spread the disease
Keeping animal shed and animals clean does not spread the disease

पशूतज्ज्ञ आजार निदानासाठी जनावर आजारी असतानाची माहिती, गोठ्याचे व्यवस्थापन, खाद्याचे नियोजन व आजाराची लक्षणे आणि तपासणी करून योग्य निदान करतो. जनावरांच्या आजाराचे योग्य व अचूक निदान होणे आवश्यक आहे. पशूतज्ज्ञ आजार निदानासाठी जनावर आजारी असतानाची माहिती, गोठ्याचे व्यवस्थापन, खाद्याचे नियोजन व आजाराची लक्षणे आणि तपासणी करून योग्य निदान करतो. कारण भरपूर काही आजार असे आहेत की, ज्यामध्ये एकसारखी लक्षणे आढळून येतात. आजाराची कारणे

  • जनावरांच्या मध्ये विविध आजार होतात. यामध्ये जीवाणूजन्य, विषाणूजन्य, आदी पेशी परोपजीवी, रीक्टेशिया, कवक/बुरशीजन्य , बहु पेशी परोपजीवी, आहारपोषण दोष, रक्तप्रवाहदोष, अंतःस्त्राव ग्रंथीमधीलकार्यदोष, जीवाणूरक्तता आणि कर्करोगाच्या गाठी दिसतात.
  • काही आजारांची रासायनिक कारणे देखील असू शकतात. यामध्ये तीव्र आम्ले व तीव्र आम्लारी मुळे होणारे आजार किंवा कृत्रिम विषे, जैविक विषे आणि विषद्रव्ये किंवा जीवाणूविषांचा प्रादुर्भाव.
  • जनावरांना झालेला आजार हा सांसर्गिक आजार ( वातावरणातील कोणत्याही माध्यमाद्वारे जसे पाणी, अन्न, हवा इत्यादींमुळे पसरणारा आजार) आहे की स्पर्शजन्य आजार (म्हणजे रोगी जनावराच्या प्रत्यक्ष स्पर्शामुळे पसरणारा ) हे पशूतज्ज्ञाला ओळखावे लागते.
  • जाती, रंगानुसार आजार

  • प्राणी जाती प्रकार-  काही आजार विशिष्ट जनावरांना होतात, इतरांना होत नाहीत. उदा.रिंडरपेस्ट हा आजार फक्त गो जातीय जनावरांना होतो, इतरांना होत नाही.
  • वंश-  काही आजार केवळ विशिष्ट वंशातील जनावरांना होतात.
  • आनुवंशिकता-  उदा. कोंबड्यातील ‘एव्हीयन लयुकोसीस कॉम्प्लेस’
  • वय-  उदा. पिगलेट अनेमिया हा आजार वराहाच्या छोट्या पिल्लांना होतो.
  • रंग-  शिंगाचा कर्करोग, डोळ्यांचा कर्करोग हा पांढऱ्या कातडीच्या बैलामध्ये अधिक प्रमाणात आढळतो.
  • आजाराची विविध कारणे लक्षात घेऊन पशूतज्ज्ञांच्याकडून उपचार करून घ्यावेत. प्रयोगशाळेच्या मदतीने अचूक आणि योग्य निदान केले आणि लगेच उपचार केले तर आपले आर्थिक आणि जनावरांचे शारीरिक नुकसान होत नाही. अंदाजाने उपचार केल्यास विनाकारण जास्त औषधे वापरावी लागतात, तसेच त्या औषधामधील प्रतिजैविकांच्या अयोग्य वापरामुळे सूक्ष्म जिवाणूमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होऊन पुढील टप्यात अशी औषधे आजारावर प्रभावी कार्य करीत नाहीत. आदी पेशी परोपजीवी / प्रोटोझून पाँरासइट्स तपासणी उदा. गोचीड ताप थायलेरीयोसीस, गोचीडजन्य लाल मूत्र आजार बबेसिओसीस, अनाप्लास्मोसीस, सर्रा/ट्रीपँनोसोमिओसिस

  • या आजारात गाय, म्हैस, शेळ्या यांचा रक्तजल नमुना द्यावा.
  • प्रयोगशाळेत प्राथमिक स्वरूपात नमुने प्राप्त झाल्यापासून २४ ते ४८ तासात प्रयोगशाळेतून निष्कर्ष मिळतात.
  • आजारामध्ये जनावरांवर गोचीड, चावणाऱ्या माश्या आदी बाह्य कीटक सापडतात, सारखा ताप आणि अशक्तपणा असते.
  • रक्त काचपट्यांचा वापर करून एकपेशीय परजीवी तपासून वरील आजारांचे निदान होते. त्यावर योग्य औषधोपचार करून आजारी जनावरास पशुपालक वाचवू शकतो.
  • प्रयोगशाळेमध्ये लाल व पांढऱ्या रक्त पेशींच्या संख्येच्या मोजणीवरून आजार जीवाणूजन्य, विषाणूजन्य, एलर्जिक आहे की एकपेशीय परजीवी जंतूमुळे आहे याचे अचूक निष्कर्ष देता येतो.
  • संपर्क- डॉ.नूपुर हलमारे, ९४२१०६८९२६ (वरिष्ठ संशोधन अधिकारी,बाएफ, उरुळीकांचन, जि.पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com