Agriculture news in marathi health advisory for pet animals | Agrowon

जनावरांच्या आजाराकडे नको दुर्लक्ष

डॉ.नूपुर हलमारे
मंगळवार, 21 जुलै 2020

पशूतज्ज्ञ आजार निदानासाठी जनावर आजारी असतानाची माहिती, गोठ्याचे व्यवस्थापन, खाद्याचे नियोजन व आजाराची लक्षणे आणि तपासणी करून योग्य निदान करतो.

पशूतज्ज्ञ आजार निदानासाठी जनावर आजारी असतानाची माहिती, गोठ्याचे व्यवस्थापन, खाद्याचे नियोजन व आजाराची लक्षणे आणि तपासणी करून योग्य निदान करतो.

जनावरांच्या आजाराचे योग्य व अचूक निदान होणे आवश्यक आहे. पशूतज्ज्ञ आजार निदानासाठी जनावर आजारी असतानाची माहिती, गोठ्याचे व्यवस्थापन, खाद्याचे नियोजन व आजाराची लक्षणे आणि तपासणी करून योग्य निदान करतो. कारण भरपूर काही आजार असे आहेत की, ज्यामध्ये एकसारखी लक्षणे आढळून येतात.

आजाराची कारणे

 • जनावरांच्या मध्ये विविध आजार होतात. यामध्ये जीवाणूजन्य, विषाणूजन्य, आदी पेशी परोपजीवी, रीक्टेशिया, कवक/बुरशीजन्य , बहु पेशी परोपजीवी, आहारपोषण दोष, रक्तप्रवाहदोष, अंतःस्त्राव ग्रंथीमधीलकार्यदोष, जीवाणूरक्तता आणि कर्करोगाच्या गाठी दिसतात.
 • काही आजारांची रासायनिक कारणे देखील असू शकतात. यामध्ये तीव्र आम्ले व तीव्र आम्लारी मुळे होणारे आजार किंवा कृत्रिम विषे, जैविक विषे आणि विषद्रव्ये किंवा जीवाणूविषांचा प्रादुर्भाव.
 • जनावरांना झालेला आजार हा सांसर्गिक आजार ( वातावरणातील कोणत्याही माध्यमाद्वारे जसे पाणी, अन्न, हवा इत्यादींमुळे पसरणारा आजार) आहे की स्पर्शजन्य आजार (म्हणजे रोगी जनावराच्या प्रत्यक्ष स्पर्शामुळे पसरणारा ) हे पशूतज्ज्ञाला ओळखावे लागते.

जाती, रंगानुसार आजार

 • प्राणी जाती प्रकार- काही आजार विशिष्ट जनावरांना होतात, इतरांना होत नाहीत. उदा.रिंडरपेस्ट हा आजार फक्त गो जातीय जनावरांना होतो, इतरांना होत नाही.
 • वंश- काही आजार केवळ विशिष्ट वंशातील जनावरांना होतात.
 • आनुवंशिकता- उदा. कोंबड्यातील ‘एव्हीयन लयुकोसीस कॉम्प्लेस’
 • वय- उदा. पिगलेट अनेमिया हा आजार वराहाच्या छोट्या पिल्लांना होतो.
 • रंग- शिंगाचा कर्करोग, डोळ्यांचा कर्करोग हा पांढऱ्या कातडीच्या बैलामध्ये अधिक प्रमाणात आढळतो.

आजाराची विविध कारणे लक्षात घेऊन पशूतज्ज्ञांच्याकडून उपचार करून घ्यावेत. प्रयोगशाळेच्या मदतीने अचूक आणि योग्य निदान केले आणि लगेच उपचार केले तर आपले आर्थिक आणि जनावरांचे शारीरिक नुकसान होत नाही. अंदाजाने उपचार केल्यास विनाकारण जास्त औषधे वापरावी लागतात, तसेच त्या औषधामधील प्रतिजैविकांच्या अयोग्य वापरामुळे सूक्ष्म जिवाणूमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होऊन पुढील टप्यात अशी औषधे आजारावर प्रभावी कार्य करीत नाहीत.

आदी पेशी परोपजीवी / प्रोटोझून पाँरासइट्स तपासणी
उदा. गोचीड ताप थायलेरीयोसीस, गोचीडजन्य लाल मूत्र आजार बबेसिओसीस, अनाप्लास्मोसीस, सर्रा/ट्रीपँनोसोमिओसिस

 • या आजारात गाय, म्हैस, शेळ्या यांचा रक्तजल नमुना द्यावा.
 • प्रयोगशाळेत प्राथमिक स्वरूपात नमुने प्राप्त झाल्यापासून २४ ते ४८ तासात प्रयोगशाळेतून निष्कर्ष मिळतात.
 • आजारामध्ये जनावरांवर गोचीड, चावणाऱ्या माश्या आदी बाह्य कीटक सापडतात, सारखा ताप आणि अशक्तपणा असते.
 • रक्त काचपट्यांचा वापर करून एकपेशीय परजीवी तपासून वरील आजारांचे निदान होते. त्यावर योग्य औषधोपचार करून आजारी जनावरास पशुपालक वाचवू शकतो.
 • प्रयोगशाळेमध्ये लाल व पांढऱ्या रक्त पेशींच्या संख्येच्या मोजणीवरून आजार जीवाणूजन्य, विषाणूजन्य, एलर्जिक आहे की एकपेशीय परजीवी जंतूमुळे आहे याचे अचूक निष्कर्ष देता येतो.

संपर्क- डॉ.नूपुर हलमारे, ९४२१०६८९२६
(वरिष्ठ संशोधन अधिकारी,बाएफ, उरुळीकांचन, जि.पुणे)


इतर कृषिपूरक
जनावरांच्या खुराकात मिसळा ॲझोलाजनावरांच्या आहारात संकरित नेपिअर, सुबाभूळ, चवळी,...
व्यवस्थापन गाभण शेळ्यांचेशेळीपालनाचे उत्पन्न कळपामध्ये जन्माला येणाऱ्या...
धिंगरी अळिंबीचे उत्पादन तंत्रधिंगरी आळिंबी ही कमी खर्चात चांगला आर्थिक फायदा...
जनावरातील सर्पदंशाचे निदान अन्‌ उपचार सध्याच्या काळात चराईला जाणाऱ्या जनावरांच्यामध्ये...
गाभण शेळी तपासणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानशेळी गाभण झाल्यानंतर शरीरात विविध बदल होतात....
मधमाशीपालनातून मिळवा प्रोपोलिस, रॉयल...प्रोपोलिस मानवी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत....
मधमाशी पालनामध्ये मोठी व्यावसायिक संधीमधमाशी पालनामध्ये मधाच्या बरोबरीने सात विविध...
पावसाळ्यामध्ये कोंबड्यांचे व्यवस्थापनपावसाळ्यामध्ये वातावरणातील दमटपणा वाढलेला असतो....
`मनरेगा‘च्या माध्यमातून पशुसंवर्धन योजनाग्रामीण भागात राहणाऱ्या अकुशल कामगारांना गावातच...
स्वच्छ दूध निर्मितीसाठी उपाययोजनागोठा नेहमी स्वच्छ, कोरडे, खाच खळगेविरहित असावा....
प्रयोगशाळांतून होईल पशू आजाराचे योग्य...जनावरांचे आरोग्य अबाधित राखणे, जनावरातील आजारांचे...
स्वच्छ दूधनिर्मितीवर लक्ष द्यादुधाची प्रत ही दुधातील फॅट, एस.एन.एफ.चे प्रमाण...
नवजात वासराची घ्यावयाची काळजीआरोग्याच्या दृष्टीने वासराचे जीवन हे  पहिले...
गोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धनकोळंबी संवर्धनासाठी तलावाचे क्षेत्रफळ ०.१ ते ०.२...
जनावरांतील सर्पदंशांवर प्राथमिक उपचारसर्पदंश झालेले जनावर बेचैन होते.हालचाल करत नाही....
जनावरांच्या आजाराकडे नको दुर्लक्षपशूतज्ज्ञ आजार निदानासाठी जनावर आजारी असतानाची...
शेळ्यांना द्या सकस आहार...शेळ्यांच्या विविध शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी...
बायोफ्लाक मत्स्यपालनाचे तंत्रबायोफ्लाक तंत्रज्ञानातील महत्त्वाचे घटक म्हणजे...
व्यवस्थापन गाई-म्हशींचेसाधारणपणे गाई,म्हशींचा गाभण काळ अनुक्रमे २८० ते...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...