आरोग्यदायी नाचणी

biscuit and cake
biscuit and cake

नाचणीमध्ये कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसीन, थायामीन आणि रिबोफ्लेविन हे महत्त्वाचे पोषक घटक असतात. कॅल्शियमचे जास्त प्रमाण असल्यामुळे खेळाडू, कष्टाची कामे करणारी व्यक्ती, वाढती मुले यांना नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. गहू, तांदूळ, ज्वारी यांच्यापेक्षा जास्त प्रमाणात नाचणीमध्ये काही पोषकद्रव्ये आहेत. यात खनिजद्रव्ये, तंतुमय पदार्थ आणि काही जीवनसत्त्वांचा समावेश होतो. नाचणीमध्ये प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ व ऊर्जा साधारणपणे इतर तृणधान्याइतकीच आहे.

  • नाचणीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण भरपूर आहे. ही दोन्ही खनिजद्रव्ये हाडे आणि दातांची वाढ, बळकटीकरण आणि मजबूती कायम ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत.  
  • नाचणीयुक्त अन्नपदार्थांचा वापर लहान मुले आणि गरोदर स्त्रिया यांना फायदेशीर आहे. वाढत्या वयांच्या मुलां-मुलींना पोषणद्रव्यांची गरज जास्त असते. नाचणीयुक्त आहाराने ही गरज भरून काढता येते.  
  • वृध्द व्यक्तींना नाचणीचे पदार्थ फायदेशीर आहेत. नाचणीमध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात आहेत. नाचणीतील तंतुमय पदार्थांचे प्रमाण इतर तृणधान्यांच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा जास्त आहे. तंतुमय पदार्थ जास्त असल्याकारणाने नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. त्यामुळे नाचणी मधुमेही व्यक्तींसाठी खूप उपयोगी आहे. कारण, ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणारे पदार्थ रक्तातील साखर एकदम वाढू देत नाहीत. त्यामुळे रक्तशर्करेवर नियंत्रण राहते. तंतुमय पदार्थ रक्तातील कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतात. वजन नियंत्रणात ठेवणे आणि वाढलेले वजन कमी करण्यासाठी तंतुमय पदार्थ उपयोगी आहेत.  
  • नाचणीमध्ये पोटॅशिअम आणि जीवनसत्व ब याचे प्रमाण जास्त आहे. पोटॅशिअम हा पेशीद्रव्यातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. तो पेशी निर्मितीसाठी आणि पर्यायाने स्नायुनिर्मितीसाठी तसेच त्यांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. ब वर्गीय जीवनसत्त्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास पण मदत करतात.  
  • नाचणीचा आहारात उपयोग करण्यासाठी त्यावरील आवरण काढून टाकावे लागते. आवरण काढलेली नाचणी रवा, पीठ अशा स्वरूपात विविध पदार्थ बनविण्यासाठी वापरता येते.  
  • नाचणीच्या पिठापासून चपाती, रोटी, शेवया आणि पापडनिर्मिती करता येते.
  • संपर्क ः प्रशांत पवार ८२०८४७४८७६ (अन्नतंत्र महाविद्यालय, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com