agriculture news in marathi health benefirts of finger millet | Agrowon

आरोग्यदायी नाचणी

प्रशांत पवार, डॉ. ए. आर. सावते
शनिवार, 25 जानेवारी 2020

नाचणीमध्ये कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसीन, थायामीन आणि रिबोफ्लेविन हे महत्त्वाचे पोषक घटक असतात. कॅल्शियमचे जास्त प्रमाण असल्यामुळे खेळाडू, कष्टाची कामे करणारी व्यक्ती, वाढती मुले यांना नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.

गहू, तांदूळ, ज्वारी यांच्यापेक्षा जास्त प्रमाणात नाचणीमध्ये काही पोषकद्रव्ये आहेत. यात खनिजद्रव्ये, तंतुमय पदार्थ आणि काही जीवनसत्त्वांचा समावेश होतो. नाचणीमध्ये प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ व ऊर्जा साधारणपणे इतर तृणधान्याइतकीच आहे.

नाचणीमध्ये कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसीन, थायामीन आणि रिबोफ्लेविन हे महत्त्वाचे पोषक घटक असतात. कॅल्शियमचे जास्त प्रमाण असल्यामुळे खेळाडू, कष्टाची कामे करणारी व्यक्ती, वाढती मुले यांना नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.

गहू, तांदूळ, ज्वारी यांच्यापेक्षा जास्त प्रमाणात नाचणीमध्ये काही पोषकद्रव्ये आहेत. यात खनिजद्रव्ये, तंतुमय पदार्थ आणि काही जीवनसत्त्वांचा समावेश होतो. नाचणीमध्ये प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ व ऊर्जा साधारणपणे इतर तृणधान्याइतकीच आहे.

 • नाचणीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण भरपूर आहे. ही दोन्ही खनिजद्रव्ये हाडे आणि दातांची वाढ, बळकटीकरण आणि मजबूती कायम ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत.
   
 • नाचणीयुक्त अन्नपदार्थांचा वापर लहान मुले आणि गरोदर स्त्रिया यांना फायदेशीर आहे. वाढत्या वयांच्या मुलां-मुलींना पोषणद्रव्यांची गरज जास्त असते. नाचणीयुक्त आहाराने ही गरज भरून काढता येते.
   
 • वृध्द व्यक्तींना नाचणीचे पदार्थ फायदेशीर आहेत. नाचणीमध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात आहेत. नाचणीतील तंतुमय पदार्थांचे प्रमाण इतर तृणधान्यांच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा जास्त आहे. तंतुमय पदार्थ जास्त असल्याकारणाने नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. त्यामुळे नाचणी मधुमेही व्यक्तींसाठी खूप उपयोगी आहे. कारण, ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणारे पदार्थ रक्तातील साखर एकदम वाढू देत नाहीत. त्यामुळे रक्तशर्करेवर नियंत्रण राहते. तंतुमय पदार्थ रक्तातील कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतात. वजन नियंत्रणात ठेवणे आणि वाढलेले वजन कमी करण्यासाठी तंतुमय पदार्थ उपयोगी आहेत.
   
 • नाचणीमध्ये पोटॅशिअम आणि जीवनसत्व ब याचे प्रमाण जास्त आहे. पोटॅशिअम हा पेशीद्रव्यातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. तो पेशी निर्मितीसाठी आणि पर्यायाने स्नायुनिर्मितीसाठी तसेच त्यांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. ब वर्गीय जीवनसत्त्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास पण मदत करतात.
   
 • नाचणीचा आहारात उपयोग करण्यासाठी त्यावरील आवरण काढून टाकावे लागते. आवरण काढलेली नाचणी रवा, पीठ अशा स्वरूपात विविध पदार्थ बनविण्यासाठी वापरता येते.
   
 • नाचणीच्या पिठापासून चपाती, रोटी, शेवया आणि पापडनिर्मिती करता येते.

संपर्क ः प्रशांत पवार ८२०८४७४८७६
(अन्नतंत्र महाविद्यालय, परभणी)


इतर कृषी प्रक्रिया
ड्रॅगन फळापासून प्रक्रिया पदार्थड्रॅगन फ्रूट या फळाचे मध्य अमेरिका, मलेशिया,...
कवठाची जॅम, जेलीकवठाचे औषधी उपयोग लक्षात घेऊन फळापासून विविध...
पोषणमूल्याने समृद्ध प्रथिनयुक्त बारबाजारामध्ये विविध प्रकारच्या प्रथिनयुक्त पावडर...
फळे,भाजीपाला साठवणीसाठी उच्च तापमानाचा...फळे, भाजीपाला व प्रक्रिया पदार्थ अधिक काळ...
फळांची जेली करताना...चमकदार, पारदर्शक, मऊ आणि उत्कृष्ट जेली...
आवळ्यापासून विविध उत्पादनांची निर्मिती आपणा सर्वांना आहारात आणि आयुर्वेदात आवळ्याचे...
फळे,भाजीपाला प्रक्रियेची तत्त्वेफळे, भाजीपाला व प्रक्रिया पदार्थ अधिक काळ...
चिकूपासून टॉफी, जॅमनिर्मितीचिकू फळापासून टॉफी, जॅम, जेली, ज्यूस, गर (पल्प),...
जीवनसत्त्व, क्षार घटकांचा पुरवठा करणारे...अंजिरामध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ हे घटक मुबलक...
भाजीपाला साठवणीसाठी ‘शून्य ऊर्जा शीत-...काढणी, साठवणूक आणि प्रक्रिया यातील अयोग्य हाताळणी...
बाजरी मूल्यवर्धनातून वाढवा नफाबाजरीच्या पिठाचा वापर इतर पिठात मिसळून केल्यास...
आरोग्यदायी नाचणीनाचणीमध्ये कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसीन, थायामीन...
शेळीपालन : परतफेड हप्ते ठरवण्यासाठी ...शेळीपालनामुळे शेतमजूर स्त्रियांच्या उत्पन्नामध्ये...
पोल्ट्री सुरू करायचीय, नक्की वाचा......विमलताई या गावातील समाजकार्यास वाहून घेतलेल्या...
आवळ्याचे गुणकारी पदार्थआवळा हे फळ इतर फळांसारखे वर्षभर टिकत नाही,...
डाळनिर्मितीला भारतात मोठी संधीभारतातील एकूण गरजेपैकी ६० टक्के डाळ देशांतर्गत...
काथ्या उद्योगासाठी अनुदान आणि वितरणकाथ्या उद्योगात रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत....
अन्नप्रक्रिया उद्योगात आहेत मुबलक संधीशेती व्यवसाय हा केवळ शेतमालाची उत्पादकता वाढवणे...
किवी फळापासून प्रक्रिया पदार्थकिवी फळ हे चॉकलेटी व हिरवे रंगाचे केसाळ, आंबट व...
दुग्ध व्यवसायाच्या प्रकल्प अहवालात काय...खरेतर राहुलला आता दूध व्यवसायाने झपाटले होते. दूध...