agriculture news in marathi Health benefits of Amla | Agrowon

आरोग्यदायी आवळा

डॉ. साधना उमरीकर,डॉ.अश्विनी बोडखे
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

आवळा हे फळ प्रक्रिया केल्यास आपल्याला वर्षभर औषध म्हणून वापरता येऊ शकते.   आवळ्यापासून लोणचे, मुरंबा, ज्यूस, सुपारी, चूर्ण आदी पदार्थ तयार केले जातात. त्याचा विविध प्रकारच्या आजारांवर उपयोग होतो.
 

आवळा हे फळ प्रक्रिया केल्यास आपल्याला वर्षभर औषध म्हणून वापरता येऊ शकते.   आवळ्यापासून लोणचे, मुरंबा, ज्यूस, सुपारी, चूर्ण आदी पदार्थ तयार केले जातात. त्याचा विविध प्रकारच्या आजारांवर उपयोग होतो.

आवळा शरीरासाठी अतिशय उत्तम मानला जातो. आवळा जीवनसत्त्व क चा उत्तम स्रोत आहे.  आवळ्यात कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, तंतुमय पदार्थ, कार्बोहायड्रेट, अॅन्टी-ऑक्सिडन्ट असतात. रोज आवळा खाल्ल्याने अनेक रोगांपासून मुक्ती मिळू शकते. आयुर्वेदानुसार रोज सकाळी एक ग्लास पाण्यात १० मि.लि. आवळ्याचा ज्यूस मिसळून प्यायल्यास शरीरातील सर्व विषारी द्रव्ये बाहेर जाण्यास मदत होते.

आवळा हा  म्हातारपण  दूर करणारा, चेहरा तेजस्वी करणारा, वीर्यवर्धक, स्फूर्तिवर्धक, पचनक्रिया सुधारणारा, ज्वरनाशक, स्नायू तसेच दात मजबूत करणारा, रक्तशोधक, नजर तेज करणारा, केसांना काळेशार व कोमल करणारा, हृदयरोग, मधुमेह, सर्दी, खोकला, स्वप्नदोष, श्वेत पदर आदी आजारांवर गुणकारी  आहे. आबालवृद्धांसाठी आवळा हे अति उत्तम औषध आहे. या फळामुळे शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. 

आवळा हे फळ प्रक्रिया केल्यास आपल्याला  वर्षभर औषध म्हणून वापरता येऊ शकते. लोणचे, मुरंबा, ज्यूस, सुपारी, चूर्ण आदी तयार करून त्याचा विविध प्रकारच्या आजारांवर औषध म्हणून वापर करू शकतो. आवळा तुरट-आंबट असल्याने पित्त,  कफ , वात  या आजारांवर जालीम औषध आहे. त्यामुळे त्याला त्रिदोषनाशकही म्हटले जाते.

आवळ्यातील पोषण मूल्ये  (प्रति १०० ग्रॅम)
 

पोषक तत्त्वे    प्रमाण
प्रथिने ०.५ ग्रॅम
स्निग्ध पदार्थ  ०.१ ग्रॅम
तंतुमय पदार्थ   ३.५ ग्रॅम
जीवनसत्त्व ‘क’  ६०० मिलिग्रॅम
कर्बोदके  १३.७ ग्रॅम
खनिजे    ०.५ ग्रॅम
ऊर्जा   ५८ किलो कॅलरी
कॅल्शिअम  ५० मिलिग्रॅम
फॉस्फरस    २० मिलिग्रॅम
कॅरोटीन ९ म्यु ग्रॅम

औषधी गुणधर्म
आंबट, तुरट व आकाराने छोट्या असलेल्या या फळात अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे आयुर्वेदात याला खूप महत्त्व आहे. आवळा अनेक आजारांवर गुणकारी आहे. च्यवनप्राशमध्ये मुख्य घटक हा आवळा असतो. 

मधुमेह 
मधुमेहाच्या समस्येवर आवळा गुणकारी आहे. आवळ्यामध्ये क्रोमियम तत्त्व मोठ्या प्रमाणावर असतात. यामुळे शरीरातील इन्शुलिन पेशी मजबूत होऊन शरीरातील साखरेचे प्रमाणावर नियंत्रण ठेवता येते.  आयुर्वेदानुसार मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आवळ्याच्या रसात मध मिसळून खाल्याने फायदा होतो.

हृदयाची समस्या 
आवळ्यामध्ये असणारे औषधी गुणधर्म बीटा ब्लॉकरच्या प्रभावाला कमी करतात. यामुळे व्यक्तीचे  हृदय तंदुरुस्त राहते. शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे कामही आवळा करतो. 

पचनक्रिया सुधारणा 
अन्न पचवण्यासाठी आवळा फायद्याचा ठरतो. नेहमीच अपचनाचा त्रास होत असल्यास २ ते ३ आवळ्याचे तुकडे खावेत. डायजेस्ट गोळ्या किंवा अॅन्टी अॅसिड औषधांपेक्षा आवळा सेवन करणे हा उत्तम  पर्याय आहे. आवळा पचनतंत्रामध्ये गॅस्ट्रिक लिक्विड उत्पन्न करण्यास मदत करतो. हे लिक्विड पचन प्रक्रिया वाढवण्यास मदत करते. बद्धकोष्ठता, गॅस, अॅसिडिटी, अपचन, पोटासंबंधी अनेक समस्यांमध्ये  आवळा फायदेशीर ठरतो. आवळ्याचे लोणचे, ज्यूस, चूर्ण यांसारख्या पदार्थांचा समावेश जेवणात करणे फायदेशीर ठरते.

वजन नियंत्रण 
आवळा शरीरातील पचनक्रिया मजबूत करतो. यामुळे वजन नियंत्रण करण्यास मदत होते.

हाडांसाठी उपयुक्त
आवळ्यात मोठ्या प्रमाणावर कॅल्शिअम असते. आवळा सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. यामुळे ऑस्ट्रोपोरोसिस, अर्थराईटीस आणि हाडांचे आजार यांपासून मुक्ती मिळण्यासाठी आवळ्याचे सेवन करणे अत्यंत आवश्यक असते. 

डोळ्यांसाठी गुणकारी 
आवळ्यामध्ये कॅरॉटीन असल्यामुळे आवळ्याच्या रस नियमितपणे सेवन केल्यास याचा फायदा डोळ्यांना होऊ शकतो. मोतीबिंदू, दृष्टी कमी होणे, ब्लाइंडनेस यांसारख्या आजारापासून दूर राहता येते. 

मासिक पाळीत गुणकारी 
आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवनसत्त्व आणि खनिजे असतात. महिलांना मासिक पाळीच्या काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पोटदुखी, कंबरदुखी, अनियमितता व इतर समस्यांवर आवळा गुणकारी ठरतो.
 
प्रादुर्भाव नियंत्रण 
आवळ्यामध्ये जिवाणू आणि बुरशीचा प्रादुर्भाव नियंत्रणाची ताकद असते. आवळ्याचे नियमित सेवन केल्याने प्रादुर्भाव  होत नाही असे आयुर्वेद शास्त्र मानते. आवळा शरीरातील नको असलेले पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतो. यामुळे पोट स्वच्छ राहते आणि आणि पर्यायाने मनही एकदम फ्रेश राहते.

उच्च रक्तदाब
आवळा, आवळ्याचा ज्यूस उच्च रक्तदाब, मधुमेही रुग्णांसाठी गुणकारी आहे. अनेक डॉक्टर हाय ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी आवळा ज्यूस पिण्याचा सल्ला देतात.

मॉर्निंग सिकनेस   
गर्भवती महिलांना सकाळी झोपून उठल्यावर अनेकदा मॉर्निंग सिकनेसचा त्रास होतो. आवळा स्फूर्तिदायक असल्यामुळे मॉर्निंग सिकनेसपासून बचाव करण्यासाठी आवळा उत्तम उपाय आहे. सकाळी उठल्यावर चक्कर किंवा उलटीसारखं होत असल्यास कच्चा किंवा सुकवलेल्या आवळ्याचा एक तुकडा खाल्याने फरक जाणवतो. 

तोंडाच्या दुर्गंधीवर उपाय  
ज्या लोकांना सतत तोंडाला दुर्गंधी येण्याची समस्या असते, त्यांच्यासाठी आवळा अतिशय फायदेशीर आहे. ज्या वेळी दुर्गंधी जाणवेल त्या वेळी आवळ्याचे २ ते ३ तुकडे खाल्ल्यास फायदा होतो. अॅन्टी-इन्फ्लेमेटरी तत्त्व असलेला आवळा दुर्गंधीचे कारण बनणाऱ्या जिवाणूंना नष्ट करतो.

संपर्क ः डॉ. साधना उमरीकर,  ९४२०५३००६७
(कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर, जि. जालना)


इतर औषधी वनस्पती
गुणकारी अन् औषधी हरभरासाधारणपणे हिवाळ्यात कोवळा हरभरा येतो. हरभऱ्याचे...
वातदोषावर उपाय ः हादग्याची फुले, शेंगाआयुर्वेदानुसार त्रिदोषांपैकी वातदोष कमी...
आरोग्यदायी आले आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे...
जाणून घ्या पळसाचे आरोग्यदायी गुणधर्मआपल्या सर्वांना पळस ही वनस्पती परिचित आहे....
आरोग्यदायी आवळाआवळा हे फळ प्रक्रिया केल्यास आपल्याला वर्षभर औषध...
हळदीचे औषधी गुणधर्महळद ही अत्यंत गुणकारी असून, त्यातील जंतूनाशक...
गुणकारी वाळावाळा म्हटले की उन्हाळ्याच्या दिवस आठवतात. माठ...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
सब्जा बियांचे आरोग्यदायी फायदे सब्जामध्ये प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने...
महौषधी ओवास्वयंपाकघरातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे ओवा! अनेक...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...
वातविकारांवर गुणकारी एरंडएरंड ही वनस्पती सगळ्यांना सुपरिचित आहे. घरातील...
आरोग्यदायी सुरणसुरण एक कंद पीक आहे. सुरणचे दोन भाग ...
केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी माका ​माका सगळीकडे अगदी सहज मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो...
मळमळ, पित्तावर आमसूल फायदेशीरआमसूल महिलावर्गामध्ये अधिक लोकप्रिय आहे....
डाळिंबाचे औषधी गुणधर्म डाळिंबाची मधुर चव, बियांचा आकर्षक नैसर्गिक लाल...
आरोग्यदायी तुतीची फळेतामिळनाडू राज्यातील रेशीम संशोधन व जर्मप्लाझम...
खोकला, अशक्तपणावर गुणकारी काळा मनुकालहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत काळा मनुका सर्वांना...
आरोग्यदायी आघाडा,भोकर,पेंढारीनिसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या रानभाज्या आणि फळे...
बहुगुणी वेलचीवेलची म्हणजेच वेलदोडा. मसाला तसेच मुखशुद्धीकर...