दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्ज
औषधी वनस्पती
सब्जा बियांचे आरोग्यदायी फायदे
सब्जामध्ये प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची अमिनो आम्लेही भरपूर प्रमाणात आहेत. यामुळे सब्जा हे हृद्यासंबंधित आजार, रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण, कर्करोग, पचन क्रियेचे आजार अशा विविध आजारांवर उपयोगी ठरत आहे.
सब्जामध्ये प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची अमिनो आम्लेही भरपूर प्रमाणात आहेत. यामुळे सब्जा हे हृद्यासंबंधित आजार, रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण, कर्करोग, पचन क्रियेचे आजार अशा विविध आजारांवर उपयोगी ठरत आहे.
सब्जा बियांचा (चिया सीड) चा वापर अलीकडच्या काही वर्षांमध्ये मानवी आहारात वाढला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे त्यातील जास्त प्रमाणात असणारे ओमेगा-३ स्निग्घ आम्ल आणि तंतुमय पदार्थ. यांमध्ये प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची अमिनो आम्लेही भरपूर प्रमाणात आहेत. यामुळे सब्जा हे हृद्यासंबंधित आजार, रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण, कर्करोग, पचन क्रियेचे आजार अशा विविध आजारांवर उपयोगी ठरत आहे.
- सब्जा याचे शास्त्रीय नाव सॅल्विया हिस्पॅनिका असे आहे. हे पीक जगभरात घेतले जाते. सब्जाच्या बिया गडद काळ्या रंगाच्या असतात. पाण्यात भिजवले असता यांच्यापासून डिंकाप्रमाणे चिकट पदार्थ प्राप्त होतो ज्याला म्युसिलेज म्हणतात.
- सब्जाच्या बियांमध्ये आहाराच्या दृष्टीने महत्त्वाची असलेले स्निग्ध आम्ल (अल्फा लिनोलेनिक स्निग्ध आम्ल), तंतुमय पदार्थ, प्रथिने, आवश्यक अमिनो आम्ल, अॅन्टीऑक्सिडन्टस, जीवनसत्त्वे आणि मिनरल्सचे प्रमाण आहे.
- सब्जा बियांमधील प्रथिनांचे प्रमाण हे गहू, मका, तांदूळ, ओट यांच्या तुलनेत खूप जास्त आहे. त्यांचा आहारात बिया, तेल किंवा पीठ अशा विविध स्वरूपात वापर केला जाऊ शकतो. सब्जा बियांचा विविध अन्नपदार्थांमध्ये वापर करून त्यांचे पौष्टिक गुण तर वाढविले जातात परंतु त्यासोबतच त्यांच्या चवीमध्ये सुद्धा सुधारणा होते.
- सब्जाच्या बियांचा विविध बेकरी उत्पादने जसे की ब्रेड, कुकीज; नूडल्स, आइस्क्रीम, विविध प्रकारचे ज्यूस, एनर्जी बार अशा अनेक अन्नपदार्थांमध्ये त्यांची पौष्टिक गुणवत्ता वाढविण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो.
आरोग्यास फायदे
- सब्जा बियांमध्ये असलेले ओमेगा-३ आम्ल यांमुळे रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी राखण्यास मदत होते. आहारामध्ये जर रोज ३० ग्रॅम (१५-१५ ग्रॅम दोन वेळा) एवढे सेवन केले तर याचा नक्कीच फायदा होईल.
- सब्जा बियांमध्ये असणाऱ्या अल्फा लिनोलेनिक आम्लामुळे रक्त दाब आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
- सब्जा बियांमध्ये असलेल्या प्रथिने, तसेच तंतुमय पदार्थांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी राखण्यास मदत होते. त्याबरोबरच ते इन्शुलिनचे कार्य सुरळीत चालण्यासाठी मदत करते.
- सब्जा बियांमध्ये अॅन्टीऑक्सिडन्टस भरपूर प्रमाणात आहेत. जे शरीरातून फ्री रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करते.
- सब्जाच्या बियांमध्ये आवश्यक प्रमाणात प्रथिने आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स मुख्यत्वे ओमेगा-३ स्निग्ध आम्ल (अल्फा लिनोलेनिक आम्ल) तसेच तंतुमय पदार्थ (फायबर) असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी याचा चांगला उपयोग होऊ शकतो.
- सब्जामध्ये मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ (फायबर) आहेत. ते आपल्या लहान आतड्यांचे आरोग्य तसेच पचन क्रिया सुधारण्यास मदत करतात. यामुळे बध्कोष्ठता असलेल्या लोकांना फायदा मिळू शकतो.
अन्नपदार्थांमध्ये वापर
पुडिंग
साहित्य
४० ग्रॅम सब्जा बी, एक ग्लास दूध, १-२ चमचा लिक्विड चॅाकलेट, १-२ चमचे साखर.
कृती
सब्जाचे बी स्वच्छ धुवून घ्यावेत. नंतर एक छोट्या काचेच्या भांड्यामध्ये दूध व साखर मिसळून, त्यामध्ये सब्जाचे बी, लिक्विड चॅाकलेट सर्व एकत्रित मिश्रण करून ते फ्रिज मध्ये एक तास थंड करायला ठेवावे. एका तासानंतर थंड पुडिंग खाण्यासाठी तयार होईल.
फ्रूट सलाड
अर्धी वाटी सब्जाचे बी एक ग्लास दुधामध्ये दोन तास भिजायला ठेऊन मग त्यामध्ये छोट्या आकारात कापून घेतलेली आपल्या आवडीचे कुठल्याही प्रकारचे तीन चार फळे टाकून मिश्रण थंड होऊ द्यावे.
फ्रूट स्मूदी
यासाठी ३० ग्रॅम. सब्जाचे बी, दोन केळी, आठ ते दहा स्ट्रॅाबेरी, एक ग्लास दूध एकत्रित करून मिक्सरमधून काढून घ्यावे. तयार झालेल्या मिश्रणाला थंड करून अथवा तसेच घेता येईल.
संपर्क ः ऋषिकेश माने, ९४०३१२९८७२
(अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
- 1 of 4
- ››