Agriculture news in marathi health benefits of chicken and eggs | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास चिकन अन् अंडी उपयुक्त

डॉ. प्रतीक जाधव, डॉ. काकासाहेब खोसे
रविवार, 5 जुलै 2020

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने चिकन आणि अंडी मानवी आहारामध्ये वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. चिकन व अंडी रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत करतात.
 

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने चिकन आणि अंडी मानवी आहारामध्ये वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. चिकन व अंडी रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत करतात.

आरोग्यदायी फायदे

  • चिकन व अंडी हे प्रथिनांचा उच्च प्रतीचा स्रोत आहेत. यामध्ये जीवनसत्त्व अ, ब, कॅल्शिअम, लोह, कोबाल्मीन, मॅग्नेशिअम आणि फोलेट इत्यादी आवश्यक पोषक घटक असतात.
  • यामध्ये ‘ड’ जीवनसत्त्व जास्त प्रमाणात असल्याने शरीरातील फ्री रॅडीकल्स काढून टाकण्यास मदत होते. श्‍वसनमार्गाच्या संसर्गाविरुध्द लढण्यासाठी उपयुक्त ठरते.
  • चिकन व अंड्यामध्ये असलेले सेलेनियम रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यास मदत करतात.
  • अमिनो आम्लाचा मुख्य स्रोत म्हणून अंडी ओळखली जातात. यामध्ये असलेले प्रतिजैविके आपले आरोग्य सुधारण्यास आणि रोगप्रतिकारक प्रणाली उत्तम प्रकारे कार्य करण्यास मदत करते.
  • अंडी हे सर्वाधिक जैवउपलब्धता करून देणारे प्रथिनांचा स्रोत आहे. इतर प्रथिनांच्या स्रोतांच्या तुलनेत शरीरामध्ये शोषून घेण्याची आणि वापराची क्षमता अंड्यांमध्ये जास्त असते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दिवसातून किमान दोन अंड्याचे सेवन करावे.

अंड्यातील सर्वसाधारण घटक

घटक प्रती अंडी प्रमाण दैनंदिन गरज
पाणी ३८.८ ग्रॅम --
ऊर्जा ७८ कॅलरी २५०० किलो कॅलरी
प्रथिने ६.५ ग्रॅम ५२.५ ग्रॅम
स्निग्ध पदार्थ ५.८ ग्रॅम --
कोलेस्टेरोल १९६ मिलिग्रॅम ३०० मिलिग्रॅम
अ जीवनसत्त्व ९८ मायक्रो ग्रॅम ७०० मायक्रो ग्रॅम
ड जीवनसत्त्व ०.९० मायक्रो ग्रॅम
ई जीवनसत्त्व ०.५७ मिलिग्रॅम १.१ मिलिग्रॅम
फॉस्फरस १०३ मिलिग्रॅम ५५० मिलिग्रॅम
लोह १ मिलिग्रॅम १० मिलिग्रॅम
झिंक ०.७ मिलिग्रॅम ९.५ मिलिग्रॅम
सेलेनियम ६ मायक्रो ग्रॅम ०.५५ मायक्रो ग्रॅम
थायमिन ०.०५ मिलिग्रॅम १.१ मिलिग्रॅम
राईबोफ्लेवीन ०.२४ मिलिग्रॅम १.६ मिलिग्रॅम
फोलेट २५ मायक्रो ग्रॅम ३०० मायक्रो ग्रॅम
मॅग्नेशिअम ६२ मिलिग्रॅम --
आयोडीन २७ मायक्रो ग्रॅम --

चिकन खाण्याचे फायदे

  • शरीरामध्ये नैसर्गिकरीत्या तयार होणारे होमोसिस्टीन हे अमिनो आम्ल ह्रदयाच्या विकारासाठी कारणीभूत असते. चिकनमध्ये उच्च प्रमाणात उपलब्ध असलेले जीवनसत्त्व बी१२, बी६ आणि बी२, जस्त आणि ट्रायमिथील ग्लायसीन हे शरीरातील होमोसिस्टीनची पातळी कमी करतात. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी आहारात चिकनचा समावेश फायदेशीर ठरते.
  • चिकन हे उच्च प्रतीच्या आणि कमी चरबी असलेल्या प्रथिनांचा स्रोत म्हणून ओळखले जाते. १०० ग्रॅम चिकन ब्रेस्ट मधून ३१ ग्रॅम प्रथिने मिळतात. स्नायूंच्या वाढीसाठी आहारात चिकनचे नियमित सेवन करणे गरजेचे आहे.
  • चिकनच्या काळजामध्ये राइबोफ्लेवीन म्हणजेच ‘बी२’ जीवनसत्त्व अधिक प्रमाणात असते. याच्या सेवनाने ऊतींचे आरोग्य व वाढ होण्यास मदत होते. त्वचा नितळ बनते. शरीरात ऊर्जा पुरवठा करण्यासाठी तसेच कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ यांचे विघटन करण्यासाठी राइबोफ्लेवीन मदत करते.
  • मिलेनियम हे अमिनो आम्ल रोगप्रतिकारक प्रतिसादामध्ये सुधारणा करण्यास मदत करते. चयापचय क्रियेसाठी आवश्यक असते. हे ऑक्सीडेटीव ताण कमी करण्यास देखील मदत करते. ८५ ग्रॅम चिकनमधून २५ मिलिग्रॅम सेलेनियम मिळते.
  • ताणतणाव कमी करण्यात मदत करणारे ट्रिप्टोफेन आणि जीवनसत्त्व ‘बी५’ हे दोन मुख्य घटक आहेत. हे घटक चिकनमध्ये पोषक द्रव्यांसह उपलब्ध असतात.

संपर्क- डॉ. प्रतीक जाधव, ९८९०९९७७९५
(डॉ. जाधव पीएच.डी. स्कॉलर, कुक्कुटपालनशास्त्र विभाग, उ. प्र. पंडित दीन दयाल उपाध्याय पशुचिकित्सा विज्ञान विश्वविद्यालय एवं गो-संशोधन संस्था, (दुवासु), मथुरा, उत्तरप्रदेश आणि डॉ. खोसे कुक्कुटपालनशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी येथे साहाय्यक प्राध्यापक आहेत.)


इतर महिला
अपचन, खोकला, कफावर गुणकारी पिंपळी पावडर आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना पिंपळी नक्कीच...
नैसर्गिकरीत्या वाढवा रोगप्रतिकारक शक्तीरोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच शरीरात बाहेरून प्रवेश...
कुक्कुटपालन, भात रोपवाटिका व्यवसायातून...विंग (ता. खंडाळा,जि.सातारा)  गावातील तेरा...
महिला बचत गट बनवतो २६ प्रकारचे मसालेपाहुणेवाडी (ता.बारामती, जि.पुणे) येथील सुवर्णा...
बहुगुणी वेलचीवेलची म्हणजेच वेलदोडा. मसाला तसेच मुखशुद्धीकर...
महिला बचतगटाचा ‘जय भोलेनाथ’ ब्रॅण्डभेंडा बुद्रूक (ता. नेवासा,जि.नगर) येथील वीस...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास चिकन अन्...भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने चिकन...
आरोग्यदायी हिंगआपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी...
थेट भाजीपाला विक्रीतून शेती झाली सक्षमथेट ग्राहकांना शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी स्वतःहून...
पूरक उद्योगातून मिळाली आर्थिक साथपरभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावातील झाडे...
आरोग्यदायी फणसवरून काटेरी पण आतून गोड.. असे म्हटले की फणस हे फळ...
गटामुळे मिळाली शेती, पूरक उद्योगाला...  टाकळीमिया (ता. राहुरी, जि. नगर) येथील...
अजीर्ण, अपचनावर गुणकारी बडीशेपकोणताही सण, समारंभ आणि घरगुती कार्यक्रमाच्या...
नाचणी प्रक्रियेतून मिळवली आर्थिक समृद्धीकोकणात भातशेतीबरोबर नाचणीची लागवड मोठ्या प्रमाणात...
गुणकारी कोकमकोकम सरबतामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते....
महौषधी जिरेस्वयंपाकात, पदार्थात, मसाल्यात उपयुक्त असणारे...
किरकोळ आजारांकडे नको दूर्लक्षमहिलांनी घराकडून शेताकडे जाताना चेहऱ्यावर पदर...
आरोग्यदायी ज्येष्ठमधसमस्त महिलावर्गासाठी ज्येष्ठमध काही नवीन नाही....
कुक्कुटपालन, परसबागेने दिली आर्थिक साथचिंचघरी (ता.चिपळूण,जि.रत्नागिरी) येथील अंजली...