Agriculture news in marathi health benefits of Cinnamon | Page 2 ||| Agrowon

आरोग्यदायी दालचिनी

विनीता कुलकर्णी
रविवार, 12 जुलै 2020

मसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना दालचिनीचा वापर हमखास होतो. त्यामुळे महिलावर्गात दालचिनी विशेष प्रिय आहे. संपूर्ण दालचिनी आणि पावडर अशा दोन्ही स्वरूपात ती उपलब्ध असते. दालचिनीमध्ये विविध औषधी गुणधर्म असतात.

मसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना दालचिनीचा वापर हमखास होतो. त्यामुळे महिलावर्गात दालचिनी विशेष प्रिय आहे. संपूर्ण दालचिनी आणि पावडर अशा दोन्ही स्वरूपात ती उपलब्ध असते. दालचिनीमध्ये विविध औषधी गुणधर्म असतात.

अगदी सहज उपलब्ध होणारी आणि स्वयंपाक घरात हमखास असलेली दालचिनी सर्वांना सुपरिचित आहे. मसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना दालचिनीचा वापर हमखास होतो. त्यामुळे महिलावर्गात दालचिनी विशेष प्रिय आहे. संपूर्ण दालचिनी आणि पावडर अशा दोन्ही स्वरूपात ती उपलब्ध असते. दालचिनीमध्ये विविध औषधी गुणधर्म असतात.

  • दालचिनी मुखदुर्गंधीनाशक आहे. हिरड्यांना मजबुती आणण्यासाठी दालचिनीचा एक छोटा तुकडा तोंडात धरून चघळावा.
  • तापामध्ये बऱ्याचदा घशाला कोरड पडून सारखी तहान लागते. अशा वेळी दालचिनीचा छोटा तुकडा तोंडात धरावा. कोरडा खोकला येत असल्यास दालचिनी आणि खडीसाखरेचा तुकडा चघळावा. त्यामुळे ढास कमी होते.
  • सर्दी, खोकला, डोकेदुखीचा त्रास होत असल्यास दालचिनी, तुळस, सुंठ यांची पाव चमचा पावडर पाण्यात उकळून ते पाणी प्यावे. त्यामुळे कफ कमी होऊन घशाला आराम मिळतो.
  • अवेळी जेवण, बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्यामुळे पोटात गॅस होऊन जडपणा येतो. यासाठी दालचिनी, ओवा, सुंठ समभाग एकत्र करून पाव चमचा प्रमाणात गरम पाण्यासह घ्यावे.
  • दूषित पाण्यामुळे अतिसार, आव पडणे अशा पोटासंबंधी तक्रारी निर्माण होतात. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधे घ्यावीत. यासोबतच दालचिनीची पूड मधासह घ्यावी.
  • अचानक झालेला हवाबदल, थंड पदार्थांचे सेवन, धूळ, धूर यामुळे कोरडा खोकला येऊन सतत ढास लागते. अशा वेळी ज्येष्ठमध, दालचिनी, खडीसाखर एकत्र करून पाव चमचा प्रमाणात चघळावी.
  • उलटी, मळमळणे, अजीर्ण अशा त्रासासाठी दालचिनीचा तुकडा चघळणे फायदेशीर असते.
  • सर्दी कमी करण्यासाठी दालचिनी, सुंठ, लवंग, गवती चहा पाण्यात टाकून उकळून घेऊन तो काढा सेवन करावा. दालचिनीचा समावेश असलेले सितोपलादी चूर्ण मधासह जरूर घ्यावे.

पथ्य

  • सर्दी, खोकला, ताप जास्त प्रमाणात असेल तर दालचिनीबरोबर अन्य आयुर्वेदिक औषधे पोटात घ्यावीत. दही, ताक, थंड पेय, तेलकट पदार्थांचे सेवन पूर्ण बंद करावे.
  • अजीर्ण, अपचन टाळण्यासाठी जेवणाच्या वेळा पाळाव्यात. वातूळ पदार्थ, मैद्याचे पदार्थ खाणे टाळावे. दोन जेवणाच्या मध्ये किमान चार तासांचे अंतर ठेवावे.

काळजी
लक्षणांमध्ये वाढ झाल्यास डॉक्टरांच्या सल्ला घेऊन योग्य तपासण्या कराव्यात.

संपर्क- डॉ. विनीता कुलकर्णी, ९४२२३१०३७७


इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात खरीप पेरणीत अडीच लाख...पुणे ः यंदा जूनच्या सुरुवातीला पावसाने चांगली...
बिबट्याच्या पिंजऱ्यांशेजारीच बसून करणार...मंचर : वनखात्यानेही बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी...
खरीप पीक कर्जासाठी भाजपचा आज ठिय्याअमरावती : खरीप हंगाम अर्ध्यावर आला असतानासुद्धा...
औरंगाबादेत ग्राहकांचा रानभाज्या खरेदीला...औरंगाबाद ः आरोग्यदायी व अनेक औषधी गुणधर्म...
नगर जिल्ह्यात तुरीचा ५४ हजार हेक्टरवर...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला...
रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ पैकी ४८ धरणे...रत्नागिरी ः अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी...
सांगलीत अडीच हजार क्विंटल मक्याची खरेदीसांगली ः जिल्ह्यातील तीन हमीभाव केंद्रांच्या...
निकृष्ट बियाणे पुरवठादार कंपन्यांवर...अमरावती: निकृष्ट दर्जाच्या बियाणे पुरवठा प्रकरणात...
मराठवाडा विभागातील हवामानानुसार पीक...मराठवाडा विभागातील एकूण हवामान, पर्जन्यमान या...
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...