agriculture news in marathi health benefits of coconut | Agrowon

बहुगुणी नारळ

डॉ. विनीता कुलकर्णी
रविवार, 8 मार्च 2020

पूजाअर्चा, सणवार, लग्नकार्य, बारसे, डोहाळेजेवण अशा अनेक मंगलप्रसंगी नारळ महत्त्वाची भूमिका बजावतो. स्वयंपाकघरातही विविध पदार्थ बनविण्यासाठी नारळाचा वापर केला जातो. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणाऱ्या नारळामध्ये विविध औषधी गुणधर्म असतात.

पूजाअर्चा, सणवार, लग्नकार्य, बारसे, डोहाळेजेवण अशा अनेक मंगलप्रसंगी नारळ महत्त्वाची भूमिका बजावतो. स्वयंपाकघरातही विविध पदार्थ बनविण्यासाठी नारळाचा वापर केला जातो. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणाऱ्या नारळामध्ये विविध औषधी गुणधर्म असतात.

  • उन्हाळ्याच्या दिवसांत दुपारी नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने तहान भागते; तसेच पित्त कमी होते.
     
  • ओले खोबरे आणि साखर सेवन केल्यास दाह कमी होतो.
     
  • खोबरे ताकद वाढवणारे असते. थकवा जाणवत असल्यास खोबऱ्याचे साखरेसह सेवन करावे.
     
  • उन्हाळ्यात खूप वेळा मूत्र विसर्जनावेळी आग होते. अशावेळी नारळाच्या पाण्याचे २ ते ३ वेळा सेवन करावे.
     
  • वातप्रकृती, वार्धक्‍यात वाताच्या व पचनाच्या तक्रारींसाठी ओले खोबरे आणि लसूण यांची चटणी रोज खायला द्यावी. पण मिरची घालू नये.
     
  • नारळाचे दूध ताकद वाढवणारे असते. नारळाचे दूध साखर घालून घेतल्यास रुची व शक्ती वाढण्यास मदत होते.
     
  • पायांना मुंग्या येणे, पोटऱ्या व गुडघे दुखणे, पाय जड होणे यासाठी खोबरेल तेलाने मालिश करावी. मालिश केल्यावर शेकल्यास अधिक फायदा होतो.
     
  • अंग कोरडे पडत असल्यास रोज खोबरेल तेल अंगाला लावून स्नान करावे; तसेच अंघोळीसाठी साबणाऐवजी उटणे वापरावे.
     
  • केसांच्या उत्तम आरोग्यासाठी खोबरेल तेलात कापूर घालून केसांना लावा.
     
  • नारळाची शेंडी जाळून राख करावी. ही पावडर मधासह घेतल्यास उचकी, उसलटी कमी होते.

पथ्य 

  • आहारात तिखट, तेलकट पदार्थ वर्ज्य करावेत. अवेळी जेवण करणे टाळावे. उन्हाळ्याच्या दिवसांत भरपूर पाणी प्यावे.

दक्षता

  • पित्तामुळे होणारी जळजळ, मूत्र विसर्जनावेळी आग होणे; तसेच कमी प्रमाणात होणे, पोटदुखी अशा उष्णतेशी संबंधित तक्रारींसाठी योग्य त्या तपासण्या करून घ्याव्यात. तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य उपचार करावेत.

संपर्क - डॉ. विनीता कुलकर्णी, ९४२२३१०३७७


इतर महिला
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
बचत गटाने दिली आर्थिक ताकद.आगसखांड (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील बारा...
टार्गेट ठेवूनच करतेय शेतीपतीची बॅंकेत नोकरी असल्याने बदली ठरलेली. त्यामुळे...
सविताताईंनी जिद्दीने ठरविले की लढायचेपतीचे हृदविकाराने झालेले निधन, डोक्यावर सात...
कणेरीच्या ‘सिद्धगिरी’ने बनवले महिलांना...कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी (ता. करवीर) येथील...
वातदोषावर उपाय ः हादग्याची फुले, शेंगाआयुर्वेदानुसार त्रिदोषांपैकी वातदोष कमी...
शेळीपालनाने दिली आर्थिक प्रगतीची दिशाजळवंडी (ता.जुन्नर, जि.पुणे) या दुर्गम आदिवासी...
तेलनिर्मिती उद्योगात तयार केली ओळखसांगली शहरातील सौ. सुजाता विठ्ठल चव्हाण यांनी...
आरोग्यवर्धक तांदूळअन्नपदार्थात ‘तांदूळ’ सर्वांना सुपरिचित आहेच. या...
सामाजिक दायीत्वातून जीवनात फुलले ‘...आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आणि...
चटणी, मसाल्याचा बनविला ब्रॅण्डकोल्हापूरची खाद्य संस्कृती म्हटलं की, तिखटाबरोबर...
आरोग्यदायी आले आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे...
संतुलीत आहार स्रोत ः सीताफळसीताफळाची लोकप्रियता कोरडवाहू लागवडयोग्य, कीड...
शेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोडभोके (ता. जि.रत्नागिरी) या दुर्गम गावातील देवयानी...
जाणून घ्या पळसाचे आरोग्यदायी गुणधर्मआपल्या सर्वांना पळस ही वनस्पती परिचित आहे....
आरोग्यदायी आवळाआवळा हे फळ प्रक्रिया केल्यास आपल्याला वर्षभर औषध...
सीताफळातून होतो जीवनसत्त्वांचा पुरवठासीताफळात जीवनसत्त्व क अत्यंत चांगल्या प्रमाणात...
हळदीचे औषधी गुणधर्महळद ही अत्यंत गुणकारी असून, त्यातील जंतूनाशक...
गुणकारी वाळावाळा म्हटले की उन्हाळ्याच्या दिवस आठवतात. माठ...
परसबागेतून मिळतो पोषण आहारभंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्याच्या जवळील...