आरोग्यदायी सुरण

सुरण एक कंद पीक आहे. सुरणचे दोन भागकेल्यानंतर ते हत्तीच्या पायाप्रमाणे दिसते. सुरणचे लाल आणि पांढरे असे दोन प्रकार आहेत. यांपैकी, पांढरे सुरण भाजीसाठी वापरले जाते.
Elephant Foot Yam
Elephant Foot Yam

सुरण एक कंद पीक आहे. सुरणचे दोन भाग केल्यानंतर ते हत्तीच्या पायाप्रमाणे दिसते. सुरणचे लाल आणि पांढरे असे दोन प्रकार आहेत. यांपैकी, पांढरे सुरण भाजीसाठी वापरले जाते. या वनस्पतीचा हिरवा रंगाचा भाग खाद्यतेलासाठी वापरतात. सर्व वयोगटातील लोकांसाठी सुरण खाण्यायोग्य आहे. मधुमेह असलेल्यांसाठी सूरण चांगले मानले जाते. हिंदू संस्कृतीत दिवाळीच्या उत्सवात सुरण खाण्याची प्रथा आहे.  आरोग्यदायी फायदे

  • आतड्यांसंबंधीचे आजार बरे करण्यासाठी सुरण चांगले असते.
  • कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
  • हे कमी चरबीयुक्त असल्यामुळे वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते.
  • सुरणच्या सेवनामुळे रक्तवाहिन्यांमधील अडथळा दूर केला जातो. 
  • यामध्ये मॅग्नेशिअम, फॉस्फरस, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि इतरही बरेच उपयुक्त घटक असतात. 
  • सुरणमध्ये कर्करोगाचा प्रतिकार करणारे घटक असून यामुळे कर्करोगाविरोधी लढण्याची क्षमता मिळते.
  • सुरणमधील कार्बोहायड्रेट आणि प्रथिने शरीरास त्वरित ऊर्जा प्रदान करतात. याच्या नियमित सेवनाने शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहते. 
  • हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. याचे पुरेसे सेवन केल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो. 
  • सुरणचे सेवन करण्यामुळे आपली पचनक्षमता चांगली राहून रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 
  • सुरणमध्ये दाहकविरोधी गुणधर्म असून सांधेदुखी आणि संधिवातावर फायदेशीर असते. यामुळे स्नायूंचा ताण आणि दुखणे कमी होण्यास मदत होते.
  • आपल्या शरीराच्या अंतर्गत शुद्धता ठेवण्यास उपयुक्त मदत करते. शरीरातील नको असलेले घटक शरीराबाहेर काढून टाकण्यास मदत करते. आणि पचनक्रियेस सुधारण्यास मदत करते.
  • मूळव्याध आणि रक्तस्राव बरा करण्यास मदत करते. 
  • त्वचेसंबंधीच्या समस्या दूर करण्यास मदत करते. 
  • पांढरे सुरण बद्धकोष्ठता, पोटदुखी, संधिवात, पोटाचे विकार, जंत, खोकला आणि श्‍वसनासंबंधीच्या समस्यांवर उपयुक्त आहे.
  • सुरण पचनास हलके, कफशामक आणि वातशामक असते. 
  • अस्वस्थता, अपचन, डोकेदुखी, अशक्तपणामुळे हात पाय दुखणे यावर फायदेशीर असते. 
  • काळजी 

  • त्वचेचे विकार, हृदयरोग, रक्तस्राव आणि कुष्ठरोग असलेल्या रुग्णांनी सुरणचे सेवन टाळावे.
  • ताजे सुरण खाण्यास चांगले असले तरी याच्यामुळे घसा आणि तोंड खाजवू शकते. त्यासाठी पदार्थ तयार करताना आमसूल पावडर किंवा लिंबाचा वापर करावा.
  • संपर्क- पल्लवी कांबळे, ८३२९३७५३९० (आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, बीड.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com