agriculture news in marathi health Benefits of Elephant Foot Yam | Agrowon

आरोग्यदायी सुरण

पल्लवी कांबळे, सोमेश्वर खांडेकर
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

सुरण एक कंद पीक आहे. सुरणचे दोन भाग केल्यानंतर ते हत्तीच्या पायाप्रमाणे दिसते. सुरणचे लाल आणि पांढरे असे दोन प्रकार आहेत. यांपैकी, पांढरे सुरण भाजीसाठी वापरले जाते.

सुरण एक कंद पीक आहे. सुरणचे दोन भाग केल्यानंतर ते हत्तीच्या पायाप्रमाणे दिसते. सुरणचे लाल आणि पांढरे असे दोन प्रकार आहेत. यांपैकी, पांढरे सुरण भाजीसाठी वापरले जाते. या वनस्पतीचा हिरवा रंगाचा भाग खाद्यतेलासाठी वापरतात. सर्व वयोगटातील लोकांसाठी सुरण खाण्यायोग्य आहे. मधुमेह असलेल्यांसाठी सूरण चांगले मानले जाते. हिंदू संस्कृतीत दिवाळीच्या उत्सवात सुरण खाण्याची प्रथा आहे. 

आरोग्यदायी फायदे

  • आतड्यांसंबंधीचे आजार बरे करण्यासाठी सुरण चांगले असते.
  • कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
  • हे कमी चरबीयुक्त असल्यामुळे वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते.
  • सुरणच्या सेवनामुळे रक्तवाहिन्यांमधील अडथळा दूर केला जातो. 
  • यामध्ये मॅग्नेशिअम, फॉस्फरस, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि इतरही बरेच उपयुक्त घटक असतात. 
  • सुरणमध्ये कर्करोगाचा प्रतिकार करणारे घटक असून यामुळे कर्करोगाविरोधी लढण्याची क्षमता मिळते.
  • सुरणमधील कार्बोहायड्रेट आणि प्रथिने शरीरास त्वरित ऊर्जा प्रदान करतात. याच्या नियमित सेवनाने शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहते. 
  • हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. याचे पुरेसे सेवन केल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो. 
  • सुरणचे सेवन करण्यामुळे आपली पचनक्षमता चांगली राहून रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 
  • सुरणमध्ये दाहकविरोधी गुणधर्म असून सांधेदुखी आणि संधिवातावर फायदेशीर असते. यामुळे स्नायूंचा ताण आणि दुखणे कमी होण्यास मदत होते.
  • आपल्या शरीराच्या अंतर्गत शुद्धता ठेवण्यास उपयुक्त मदत करते. शरीरातील नको असलेले घटक शरीराबाहेर काढून टाकण्यास मदत करते. आणि पचनक्रियेस सुधारण्यास मदत करते.
  • मूळव्याध आणि रक्तस्राव बरा करण्यास मदत करते. 
  • त्वचेसंबंधीच्या समस्या दूर करण्यास मदत करते. 
  • पांढरे सुरण बद्धकोष्ठता, पोटदुखी, संधिवात, पोटाचे विकार, जंत, खोकला आणि श्‍वसनासंबंधीच्या समस्यांवर उपयुक्त आहे.
  • सुरण पचनास हलके, कफशामक आणि वातशामक असते. 
  • अस्वस्थता, अपचन, डोकेदुखी, अशक्तपणामुळे हात पाय दुखणे यावर फायदेशीर असते. 

काळजी 

  • त्वचेचे विकार, हृदयरोग, रक्तस्राव आणि कुष्ठरोग असलेल्या रुग्णांनी सुरणचे सेवन टाळावे.
  • ताजे सुरण खाण्यास चांगले असले तरी याच्यामुळे घसा आणि तोंड खाजवू शकते. त्यासाठी पदार्थ तयार करताना आमसूल पावडर किंवा लिंबाचा वापर करावा.

संपर्क- पल्लवी कांबळे, ८३२९३७५३९०
(आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, बीड.)


इतर औषधी वनस्पती
भूक मंदावण्यावर सुंठ, जिरे, ओवा उपयुक्तजनावरांनी खाद्य न खाणे, त्याचे पोट गच्च होणे,...
गुणकारी अन् औषधी हरभरासाधारणपणे हिवाळ्यात कोवळा हरभरा येतो. हरभऱ्याचे...
वातदोषावर उपाय ः हादग्याची फुले, शेंगाआयुर्वेदानुसार त्रिदोषांपैकी वातदोष कमी...
आरोग्यदायी आले आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे...
जाणून घ्या पळसाचे आरोग्यदायी गुणधर्मआपल्या सर्वांना पळस ही वनस्पती परिचित आहे....
आरोग्यदायी आवळाआवळा हे फळ प्रक्रिया केल्यास आपल्याला वर्षभर औषध...
हळदीचे औषधी गुणधर्महळद ही अत्यंत गुणकारी असून, त्यातील जंतूनाशक...
गुणकारी वाळावाळा म्हटले की उन्हाळ्याच्या दिवस आठवतात. माठ...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
सब्जा बियांचे आरोग्यदायी फायदे सब्जामध्ये प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने...
महौषधी ओवास्वयंपाकघरातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे ओवा! अनेक...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...
वातविकारांवर गुणकारी एरंडएरंड ही वनस्पती सगळ्यांना सुपरिचित आहे. घरातील...
आरोग्यदायी सुरणसुरण एक कंद पीक आहे. सुरणचे दोन भाग ...
केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी माका ​माका सगळीकडे अगदी सहज मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो...
मळमळ, पित्तावर आमसूल फायदेशीरआमसूल महिलावर्गामध्ये अधिक लोकप्रिय आहे....
डाळिंबाचे औषधी गुणधर्म डाळिंबाची मधुर चव, बियांचा आकर्षक नैसर्गिक लाल...
आरोग्यदायी तुतीची फळेतामिळनाडू राज्यातील रेशीम संशोधन व जर्मप्लाझम...
खोकला, अशक्तपणावर गुणकारी काळा मनुकालहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत काळा मनुका सर्वांना...
आरोग्यदायी आघाडा,भोकर,पेंढारीनिसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या रानभाज्या आणि फळे...