Agriculture news in marathi health benefits of Fennel | Agrowon

अजीर्ण, अपचनावर गुणकारी बडीशेप

विनिता कुलकर्णी
रविवार, 21 जून 2020

कोणताही सण, समारंभ आणि घरगुती कार्यक्रमाच्या भोजनानंतर बडीशेप ही खाल्ली जातेच. प्रत्येक घरामध्ये अगदी सहज आढळणारी बडीशेप औषध म्हणूनही उत्तम कार्य करते. विशेषतः वृद्ध, गर्भवती महिला, बाळंतिणी या सर्वांसाठी बडीशेप फार उपयोगी असते.

कोणताही सण, समारंभ आणि घरगुती कार्यक्रमाच्या भोजनानंतर बडीशेप ही खाल्ली जातेच. प्रत्येक घरामध्ये अगदी सहज आढळणारी बडीशेप औषध म्हणूनही उत्तम कार्य करते. विशेषतः वृद्ध, गर्भवती महिला, बाळंतिणी या सर्वांसाठी बडीशेप फार उपयोगी असते.

  • पावसाळ्याच्या दिवसांत पचनशक्ती मंदावते आणि पोटात गॅसेस तयार होतात. अजीर्ण, अपचन यामुळे अस्वस्थपणा आल्यासारखा वाटतो. अशा वेळी भाजलेली बडीशेप आणि ओवा चावून खाऊन गरम पाणी प्यावे. त्यामुळे पोटदुखी, जडपणा कमी होतो.
  • अचानक झालेला पाणी बदल, पावसाळ्यात दूषित पाणी पिल्याने पोट बिघडते. पोटात दुखून अतिसार होतो. अशा वेळी एक ग्लास पाण्यात एक चमचा बडीशेप घालून ते पाणी उकळून दिवसभर गरम स्वरूपात प्यावे. यामुळे पोटदुखीला आराम मिळतो. बडीशेपच्या जोडीला पाव चमचा सुंठ पावडर घालून त्याचे सेवन केल्यास अतिसाराचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
  • बाळंतिणीला आहाराचे पथ्य सांभाळावे लागते. पथ्य न सांभाळल्यास बाळाच्या पोटाच्या तक्रारी उद्‌भवतात. म्हणून बाळंतिणीने जेवणानंतर रोज भाजलेली, मीठ न लावलेली बडीशेप सेवन करावी. जेणेकरून अन्नपचन सुलभ होऊन बाळाला त्रास होणार नाही.
  • लहान मुलांना अजीर्ण, अपचन झाल्यास किंवा होऊ न देण्यासाठी बडीशेपचा काढा द्यावा.
  • बऱ्याच वेळा अवेळी जेवण आणि बाहेरचे पदार्थ खाण्यामुळे भूक मंदावते. अशा वेळी हलका आहार घ्यावा. बडीशेप, सुंठ, धने, जिरे, दालचिनी यांचा एकत्रित अर्धा कप काढा घेतल्यास पचन सुधारते.
  • स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी पोट दुखणे, अंग दुखणे, पोट जड होणे अशा तक्रारी जाणवतात. अशा वेळी योग्य त्या तपासण्या करून औषधे घ्यावीत. जोडीला भाजलेली बडीशेप जरूर खावी. शिवाय ओवा आणि सैंधव सेवन करावे.
  • बडीशेप पित्तशामक आहे. पित्ताच्या त्रासामुळे मळमळणे, उलटी आल्यासारखे वाटल्यास बडीशेपचे सेवन जरूर करावे.
  • सुपारी, मसाले, एकेरी बडीशेप मुखशुद्धीकर आहेतच, याशिवाय औषध म्हणूनही याचा उपयोग जरूर करावा.

पथ्य 
हरभरा, वाटाणा, मटकी अशा उसळींचे वारंवार सेवन करणे टाळावे. वातूळ पदार्थ टाळावेत.

काळजी
पाळीच्या तक्रारी खूप असतील, वारंवार पोट बिघडणे, भूक न लागणे अशा तक्रारींसाठी सोनोग्राफी, रक्त तपासणी जरूर करावी. जेणेकरून योग्य निदान होऊन औषधोपचार घेता येईल.

संपर्क - डॉ. विनिता कुलकर्णी, ९४२२३१०३७७


इतर महिला
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
गृह उद्योगाच्या माध्यमातून महिलांना...कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याची क्षमता प्रत्येक...
शाश्वत ग्राम, शेती अन कौशल्य विकासावर भरशाश्वत ग्रामविकास, शेती, आरोग्य, शिक्षण आणि...
वातविकारांवर गुणकारी एरंडएरंड ही वनस्पती सगळ्यांना सुपरिचित आहे. घरातील...
आरोग्यदायी सुरणसुरण एक कंद पीक आहे. सुरणचे दोन भाग ...
केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी माका ​माका सगळीकडे अगदी सहज मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो...
मळमळ, पित्तावर आमसूल फायदेशीरआमसूल महिलावर्गामध्ये अधिक लोकप्रिय आहे....
महिला शेतकरी कंपनीने दिली शेती, ग्राम...शेती आणि पूरक उद्योगांना चालना देण्यासाठी रिहे (...
खोकला, अशक्तपणावर गुणकारी काळा मनुकालहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत काळा मनुका सर्वांना...
काथ्या, काजू प्रक्रिया उद्योगात...कठोर परिश्रम आणि संकटांना ताकदीने तोंड देत इळये (...
ग्लूटेनमुक्त आहार फायदेशीरग्लूटेन हा गहू, राई आणि बार्ली यांसारख्या ठरावीक...
आरोग्यदायी आघाडा,भोकर,पेंढारीनिसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या रानभाज्या आणि फळे...
उमाताईंनी मिळवली आयुष्याची भाकरी गाडीवर फिरून ज्वारीच्या कडक भाकरीची विक्री करत...
अपचन, खोकला, कफावर गुणकारी पिंपळी पावडर आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना पिंपळी नक्कीच...
नैसर्गिकरीत्या वाढवा रोगप्रतिकारक शक्तीरोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच शरीरात बाहेरून प्रवेश...
कुक्कुटपालन, भात रोपवाटिका व्यवसायातून...विंग (ता. खंडाळा,जि.सातारा)  गावातील तेरा...
महिला बचत गट बनवतो २६ प्रकारचे मसालेपाहुणेवाडी (ता.बारामती, जि.पुणे) येथील सुवर्णा...
बहुगुणी वेलचीवेलची म्हणजेच वेलदोडा. मसाला तसेच मुखशुद्धीकर...
महिला बचतगटाचा ‘जय भोलेनाथ’ ब्रॅण्डभेंडा बुद्रूक (ता. नेवासा,जि.नगर) येथील वीस...