आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
महिला
आरोग्यदायी आले
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020
आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे आहेत. आले हे प्रतिकार शक्ती व भूक वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. आले हे वायू आणि कफाचा नाश करणारे आहे. आल्यापासून विविध प्रक्रिया पदार्थ तयार करता येतात.
आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे आहेत. आले हे प्रतिकार शक्ती व भूक वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. आले हे वायू आणि कफाचा नाश करणारे आहे. आल्यापासून विविध प्रक्रिया पदार्थ तयार करता येतात.
सिरप
- आले कॅन्डी तयारकरून उरलेल्या पाकापासून सिरप बनविले जाते ( १५ अंश ब्रीक्स ). यासाठी लिंबाचा रस स्वतंत्र काढून तो पाकामध्ये एकजीव करावा.
- तयार द्रावणात १:४ या प्रमाणात पाणी मिसळून सिरप तयार करावे.
सुपारी
- आल्यापासून बनविलेल्या सुपारीमुळे पचन क्षमता वाढण्यास मदत होते. तसेच पित्त कमी होण्यासाठी मदत होते.
- आले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे.चाकूच्या सहाय्याने साल काढून स्वच्छ करावे.
- आल्याचे लहान लहान कप करून त्यावर लिंबाचा रस मीठ व गरजेनुसार चाट मसाला मिसळावा.हे मिश्रण उन्हामध्ये किंवा ड्रायरमध्ये वाळवावे.
वडी आणि सुंठ
- आल्यापासूनच सुंठ तयार करतात.आले पाकात टाकून त्याच्या वड्या करतात. आले पाकाच्या वड्या सेवन केल्या असता उत्तम भूक लागते.
- नुसत्या सुंठेने खूप छान भूक लागते ,जिभेला चव येते. पोटात वायू साठून पोट दुखत असल्यास सुंठ कोमट पाण्यातून घ्यावी.
- दमा सर्दी खोकला यावर सुंठ मधाबरोबर चाटवावी.
- सांधेदुखी सांधे सुजणे यावर सुंठ व गूळ एकत्र करून खावा. आम्लपित्तावर सुंठ व साखर एकत्र करून खावी.
- लहान मुलांच्या सर्दी-खोकल्यावर सुंठ चूर्ण मधातून चाटवावे. सर्दीमुळे डोके दुखणे सर्दी मोकळी न होणे यावर सुंठ चूर्ण नाकाने हुंगावे.
- उलट्या होत असल्यास आल्याचा रस खडीसाखरेतून किंवा मधातून चाटवावा.
- लठ्ठपणावर सुंठ कोमट पाण्यातून घेतल्यास वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. सुंठ उष्ण आहे म्हणून उन्हाळा ऋतूत जपून वापर करावा.
लोणचे
- लोणचे तयार करण्यासाठी आले किस ५०० ग्रॅम, लिंबू रस १२५ मि.लि.,त्याचबरोबरीने तिखट ३० ग्रॅम, मीठ १५० ग्रॅम, हळद दहा ग्रॅम, सोप २० ग्रॅम, मोहरी डाळ ७५ ग्रॅम, मेथी चार ग्रॅम, तेल ३०० मि.लि. हिंग चवीनुसार वापरावे.
- लोणचे तयार करताना सर्वप्रथम आले स्वच्छ करून घ्यावे. खराब, किडलेले आल्याचे गड्डे वेगळे करावेत. स्वच्छ केलेले आले किसून त्याची संपूर्ण साल काढावी. साल काढलेला आल्याचा बारीक कीस करावा.
- लोणचे तयार करण्यासाठी मसाल्यामधील सोप, मेथी, मोहरी भाजून त्याची बारीक पूड तयार करावी. त्याचबरोबर सर्व मसाला पदार्थ बारीक करून घ्यावेत. तेल गरम करून त्यात थोडा हिंग मिसळावा.
- तेल थंड झाल्यानंतर बारीक केलेला संपूर्ण मसाला तेलात मिसळावा. त्यानंतर मसाल्याचे मिश्रण व आल्याचा कीस एकत्र करून लिंबाचा रस त्यात मिसळावा.
- संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यावे. एकत्र केलेले मिश्रण रूंद काचेच्या बाटलीत भरावे. काही दिवसांतच आल्याचे लोणचे तयार होईल.
कॅंडी
- कॅन्डी तयार करण्यासाठी आल्याचे काप एक किलो, साखर एक किलो, सायट्रिक अॅसिड पाच ग्रॅम, पाणी हे घटक लागतात.
- कॅन्डी तयार करण्यासाठी सर्वप्रथम आले स्वच्छ करून त्याची साल काढून घ्यावी. नंतर त्याचे आवडीनुसार गोल किंवा लांब काप करून घ्यावेत. ते काप १० ते १५ मिनिटे ब्लाचिंग करून घ्यावेत. त्यानंतर हे काप २० ते २५ मिनिटे हवेत उघडयावर ठेवावेत.
- काप काही प्रमाणात वाळल्यानंतर त्याचे वजन करून त्याच्या वजनाच्याइतकी साखर आणि पाच ग्रॅम सायट्रिक अॅसिड घ्यावे. त्याचा एकतारी पाक तयार करून त्या पाकात हे आल्याचे काप टाकावेत. हे मिश्रण २४ तास ठेवून पुन्हा त्याचा पाक हा दोन तारी करावा. नंतर आल्याचे काम बाहेर काढून उन्हात वाळवावे. त्यापासून आल्याची कॅन्डी तयार होईल.
- आल्याच्या कापातील तिखटपणा कमी होईपर्यंत ते काप पाकात ठेवावेत.
आले लसूण पेस्ट
- आले लसूण (१:१ प्रमाण) आणि तेल व मीठ आवश्यकतेनुसार घ्यावे.
- आले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. आले आणि लसणाची साल काढून घ्यावी
- आले लसूण १:१ प्रमाणामध्ये मिक्सर मधून काढतांना गरजेनुसार मीठ मिसळावे.
- मंद आचेवर तेल गरम करून आले लसणाचा लगदा भाजून घ्यावा. तयार पेस्ट निर्जंतुक केलेल्या हवाबंद केलेल्या बाटल्यांमध्ये साठवून ठेवावी.
संपर्क ः सौ. कीर्ती देशमुख, ८२७५४१२०६३
(कृषी विज्ञान केंद्र, अकोला)
इतर महिला
आरोग्यदायी हळद मिश्रित दूधहळदीचा वापर औषधोपचारामध्ये चांगल्या प्रकारे होते...
पूरक उद्योगातून महिला गट झाला सक्षमग्रामीण भागातील महिलांना योग्य प्रशिक्षण,...
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
बचत गटाने दिली आर्थिक ताकद.आगसखांड (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील बारा...
टार्गेट ठेवूनच करतेय शेतीपतीची बॅंकेत नोकरी असल्याने बदली ठरलेली. त्यामुळे...
सविताताईंनी जिद्दीने ठरविले की लढायचेपतीचे हृदविकाराने झालेले निधन, डोक्यावर सात...
कणेरीच्या ‘सिद्धगिरी’ने बनवले महिलांना...कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी (ता. करवीर) येथील...
वातदोषावर उपाय ः हादग्याची फुले, शेंगाआयुर्वेदानुसार त्रिदोषांपैकी वातदोष कमी...
शेळीपालनाने दिली आर्थिक प्रगतीची दिशाजळवंडी (ता.जुन्नर, जि.पुणे) या दुर्गम आदिवासी...
तेलनिर्मिती उद्योगात तयार केली ओळखसांगली शहरातील सौ. सुजाता विठ्ठल चव्हाण यांनी...
आरोग्यवर्धक तांदूळअन्नपदार्थात ‘तांदूळ’ सर्वांना सुपरिचित आहेच. या...
सामाजिक दायीत्वातून जीवनात फुलले ‘...आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आणि...
चटणी, मसाल्याचा बनविला ब्रॅण्डकोल्हापूरची खाद्य संस्कृती म्हटलं की, तिखटाबरोबर...
आरोग्यदायी आले आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे...
संतुलीत आहार स्रोत ः सीताफळसीताफळाची लोकप्रियता कोरडवाहू लागवडयोग्य, कीड...
शेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोडभोके (ता. जि.रत्नागिरी) या दुर्गम गावातील देवयानी...
जाणून घ्या पळसाचे आरोग्यदायी गुणधर्मआपल्या सर्वांना पळस ही वनस्पती परिचित आहे....
आरोग्यदायी आवळाआवळा हे फळ प्रक्रिया केल्यास आपल्याला वर्षभर औषध...
सीताफळातून होतो जीवनसत्त्वांचा पुरवठासीताफळात जीवनसत्त्व क अत्यंत चांगल्या प्रमाणात...
हळदीचे औषधी गुणधर्महळद ही अत्यंत गुणकारी असून, त्यातील जंतूनाशक...
- 1 of 14
- ››