ग्लूटेनमुक्त आहार फायदेशीर

ग्लूटेन हा गहू, राई आणि बार्ली यांसारख्या ठरावीक धान्यांमध्ये आढळणाऱ्या प्रथिनांचा समूह आहे. ग्लुटेन अन्नाला लवचिकता आणि ओलावा देऊन त्याचा आकार टिकवून ठेवण्यास मदत करते.
soya milk
soya milk

ग्लूटेन हा गहू, राई आणि बार्ली यांसारख्या ठरावीक धान्यांमध्ये आढळणाऱ्या प्रथिनांचा समूह आहे. ग्लुटेन अन्नाला लवचिकता आणि ओलावा देऊन त्याचा आकार टिकवून ठेवण्यास मदत करते. ब्रेडच्या आकार आणि चवदारपणासाठी ते कारणीभूत असते. ग्लुटेन काही लोकांसाठी सुरक्षित असते तरी, सेलियाक रोग किंवा ग्लुटेन संवेदनशीलता असणाऱ्या लोकांनी याचे सेवन टाळावे.

ग्लूटेन हा गहू, राई आणि बार्ली यांसारख्या ठरावीक धान्यांमध्ये आढळणाऱ्या प्रथिनांचा समूह आहे. ग्लुटेन अन्नाला लवचिकता आणि ओलावा देऊन त्याचा आकार टिकवून ठेवण्यास मदत करते. ब्रेडच्या आकार आणि चवदारपणासाठी ते कारणीभूत असते. ग्लुटेन काही लोकांसाठी सुरक्षित असते तरी, सेलियाक रोग किंवा ग्लुटेन संवेदनशीलता असणाऱ्या लोकांनी याचे सेवन टाळावे. सेलियाक रोग हा एक आनुवंशिक स्वयंप्रतिकारक विकार असून तो पाचन तंत्रावर परिणाम करतो. बऱ्याच लोकांना ग्लूटेन युक्त पदार्थ खाल्ल्यानंतर अस्वस्थता जाणवते. आजाराची लक्षणे  अतिसार, पोट फुगणे, बद्धकोष्ठता, अपचन, छातीतील जळजळ, पित्त सेलियाक रोग निदानासाठी चाचणी  रक्त तपासणी  टीटीजी-आयजीए चाचणीद्वारे या रोगाचे निदान होऊ शकते. लहान आतड्यांतील बायोप्सी  रक्त चाचणी सकारात्मक येणाऱ्या लोकांची बायोप्सी केली जाते. या प्रक्रियेमध्ये आतड्यांतून लहान ऊतींचे नमुने घेऊन आजाराची तपासणी केली जाते. सिलेयाक रोगामध्ये आतड्यास हानी पोचविली जाते. रोगाचे निदान झाल्यानंतर आपल्या आहारातून ग्लुटेन असलेले पदार्थ वर्ज करावेत. आहारातून ग्लुटेनयुक्त पदार्थ काढून टाकणे हा रोगावर एकमेव उपचार आहे. गहू, बार्ली आणि राईमध्ये ग्लुटेन आढळून येते. ग्लूटेन मुक्त आहार

  • फळे, भाज्या, शेंगा.
  • मांस, कुक्कुटपालन, मासे मुक्त पर्याय.
  • दुग्ध उत्पादने
  • सोयाबीन व सोयाबीन पदार्थ.
  • राजगिरा
  • तांदूळ, शेंगदाणा, शेंगदाणा पदार्थ.
  • ग्लूटेन असलेली उदाहरणे 

  • गहू, गहू जंतू, राई बार्ली, यीस्ट
  • ब्रेड, बिस्कीट, केक, पास्ता.
  • ग्लूटेन मुक्त प्रक्रिया पदार्थ सोयाबीन दूध मोठ्या भांड्यात रात्रभर सोयाबीन भिजवून घ्यावे. दुसऱ्या दिवशी न भिजलेले सोयाबीन काढून टाकावे. नंतर सोयाबीन स्वच्छ धुऊन त्याची सैल झालेली साल काढावी आणि पुन्हा १२ तास भिजत ठेवा. मिक्सरमध्ये सोयाबीन आणि २ ते ३ कप पाणी घालून चांगले बारीक करून घ्यावे. बारीक झालेले मिश्रण चांगल्या कापडाने गाळून घ्यावे. एका भांड्यात सोयाबीनचे दूध आणि २ कप पाणी घालून चांगले ढवळून घ्यावे. दुधावर आलेला फेस काढून टाकावा. मिश्रण चांगले एकजीव होण्यासाठी त्यास किमान २० मिनिटे ढवळत राहावे. गरजेनुसार पाणी घालावे. चवीनुसार गूळ किंवा साखर, इलायची घालावी. सोयाबीन दूध थंड करून घ्यावे. थंड वातावरणामध्ये २ ते ३ दिवस चांगले राहते. शेंगदाणा (पीनट) बटर साहित्य शेंगदाणे, मध, मीठ आणि तेल. कृती  प्रथम शेंगदाणे चांगले भाजून घ्यावेत. भाजलेले शेंगदाणे थंड करून साल काढावी. साल काढलेले शेंगदाणे, साखर, गुळ किंवा मध आणि मीठ मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. प्रमाण चांगले येण्यासाठी तेलाचा वापर करावा. शेवटी चांगले बारीक झालेले मिश्रण म्हणजेच पीनट बटर होय. संपर्क- चंद्रकला सोनवणे, ८४०८९७०९३७ (केएसके अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, बीड.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com