Agriculture news in marathi health benefits of Gluten-free diet | Agrowon

ग्लूटेनमुक्त आहार फायदेशीर

चंद्रकला सोनवणे, पल्लवी कांबळे
शनिवार, 22 ऑगस्ट 2020

ग्लूटेन हा गहू, राई आणि बार्ली यांसारख्या ठरावीक धान्यांमध्ये आढळणाऱ्या प्रथिनांचा समूह आहे. ग्लुटेन अन्नाला लवचिकता आणि ओलावा देऊन त्याचा आकार टिकवून ठेवण्यास मदत करते.

ग्लूटेन हा गहू, राई आणि बार्ली यांसारख्या ठरावीक धान्यांमध्ये आढळणाऱ्या प्रथिनांचा समूह आहे. ग्लुटेन अन्नाला लवचिकता आणि ओलावा देऊन त्याचा आकार टिकवून ठेवण्यास मदत करते. ब्रेडच्या आकार आणि चवदारपणासाठी ते कारणीभूत असते. ग्लुटेन काही लोकांसाठी सुरक्षित असते तरी, सेलियाक रोग किंवा ग्लुटेन संवेदनशीलता असणाऱ्या लोकांनी याचे सेवन टाळावे.

ग्लूटेन हा गहू, राई आणि बार्ली यांसारख्या ठरावीक धान्यांमध्ये आढळणाऱ्या प्रथिनांचा समूह आहे. ग्लुटेन अन्नाला लवचिकता आणि ओलावा देऊन त्याचा आकार टिकवून ठेवण्यास मदत करते. ब्रेडच्या आकार आणि चवदारपणासाठी ते कारणीभूत असते. ग्लुटेन काही लोकांसाठी सुरक्षित असते तरी, सेलियाक रोग किंवा ग्लुटेन संवेदनशीलता असणाऱ्या लोकांनी याचे सेवन टाळावे. सेलियाक रोग हा एक आनुवंशिक स्वयंप्रतिकारक विकार असून तो पाचन तंत्रावर परिणाम करतो. बऱ्याच लोकांना ग्लूटेन युक्त पदार्थ खाल्ल्यानंतर अस्वस्थता जाणवते.

आजाराची लक्षणे 
अतिसार, पोट फुगणे, बद्धकोष्ठता, अपचन, छातीतील जळजळ, पित्त

सेलियाक रोग निदानासाठी चाचणी 
रक्त तपासणी 
टीटीजी-आयजीए चाचणीद्वारे या रोगाचे निदान होऊ शकते.

लहान आतड्यांतील बायोप्सी 
रक्त चाचणी सकारात्मक येणाऱ्या लोकांची बायोप्सी केली जाते. या प्रक्रियेमध्ये आतड्यांतून लहान ऊतींचे नमुने घेऊन आजाराची तपासणी केली जाते.

सिलेयाक रोगामध्ये आतड्यास हानी पोचविली जाते. रोगाचे निदान झाल्यानंतर आपल्या आहारातून ग्लुटेन असलेले पदार्थ वर्ज करावेत. आहारातून ग्लुटेनयुक्त पदार्थ काढून टाकणे हा रोगावर एकमेव उपचार आहे. गहू, बार्ली आणि राईमध्ये ग्लुटेन आढळून येते.

ग्लूटेन मुक्त आहार

  • फळे, भाज्या, शेंगा.
  • मांस, कुक्कुटपालन, मासे मुक्त पर्याय.
  • दुग्ध उत्पादने
  • सोयाबीन व सोयाबीन पदार्थ.
  • राजगिरा
  • तांदूळ, शेंगदाणा, शेंगदाणा पदार्थ.

ग्लूटेन असलेली उदाहरणे 

  • गहू, गहू जंतू, राई बार्ली, यीस्ट
  • ब्रेड, बिस्कीट, केक, पास्ता.

ग्लूटेन मुक्त प्रक्रिया पदार्थ
सोयाबीन दूध

मोठ्या भांड्यात रात्रभर सोयाबीन भिजवून घ्यावे. दुसऱ्या दिवशी न भिजलेले सोयाबीन काढून टाकावे. नंतर सोयाबीन स्वच्छ धुऊन त्याची सैल झालेली साल काढावी आणि पुन्हा १२ तास भिजत ठेवा. मिक्सरमध्ये सोयाबीन आणि २ ते ३ कप पाणी घालून चांगले बारीक करून घ्यावे. बारीक झालेले मिश्रण चांगल्या कापडाने गाळून घ्यावे. एका भांड्यात सोयाबीनचे दूध आणि २ कप पाणी घालून चांगले ढवळून घ्यावे. दुधावर आलेला फेस काढून टाकावा. मिश्रण चांगले एकजीव होण्यासाठी त्यास किमान २० मिनिटे ढवळत राहावे. गरजेनुसार पाणी घालावे. चवीनुसार गूळ किंवा साखर, इलायची घालावी. सोयाबीन दूध थंड करून घ्यावे. थंड वातावरणामध्ये २ ते ३ दिवस चांगले राहते.

शेंगदाणा (पीनट) बटर
साहित्य

शेंगदाणे, मध, मीठ आणि तेल.

कृती 
प्रथम शेंगदाणे चांगले भाजून घ्यावेत. भाजलेले शेंगदाणे थंड करून साल काढावी. साल काढलेले शेंगदाणे, साखर, गुळ किंवा मध आणि मीठ मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. प्रमाण चांगले येण्यासाठी तेलाचा वापर करावा. शेवटी चांगले बारीक झालेले मिश्रण म्हणजेच पीनट बटर होय.

संपर्क- चंद्रकला सोनवणे, ८४०८९७०९३७
(केएसके अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, बीड.


इतर कृषी प्रक्रिया
चिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थचिंचेपासून मूल्यवर्धित पदार्थांच्या निर्मितीला...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
छोट्या उद्योगात नफा कसा वाढवावा?नवीन लघुउद्योग सुरू केल्यानंतर उद्योजकांना अनेक...
हळदीपासून मूल्यवर्धित पदार्थ...बहुतांश भारतीय भाज्यांमध्ये हळदीचा कमी अधिक वापर...
दुधीभोपळ्यापासून टुटीफुटी, पावडर, वडीबऱ्याच लोकांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही....
सुरणपासून रुचकर पदार्थसुरण या कंदपिकापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ...
टोमॅटोपासून केचअप, चटणी, वेफर्सबाजारातील दर कमी झाल्यावर टोमॅटो फेकून दिले जातात...
उद्योजकतेतून ग्रामीण विकासाकडे...ग्रामीण भागासह सर्वत्र व्यवसाय, उद्योग याविषयी...
टोमॅटो निर्यात, प्रक्रिया उद्योगात संधीयेत्या काळात टोमॅटो उत्पादक प्रदेशांमध्ये सहकारी...
पनीर निर्मितीसह वाढवा टिकवणक्षमतापनीर हा भारतीय उपखंडामध्ये आहारामध्ये मोठ्या...
आल्यापासून कॅण्डी, लोणचे, मुरांबाअनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये आल्याचा वापर केला जातो...
डाळिंबापासून जॅम, जेली, स्क्वॅश ​डाळिंबापासून इतर फळाप्रमाणेच उत्तम प्रकारचे सिरप...
कृषी व्यवसायात भरपूर संधी, गरज योग्य...कृषी क्षेत्रात व्यवसायाला मोठा वाव आहे. कृषी...
पेरूपासून बनवा लोणचे, चीज, जेलीपेरूमधील जीवनसत्त्व क रोगप्रतिकारक शक्ती...
चिंच प्रक्रियेतून उद्योगाच्या संधीचिंचेच्या आंबट-मधुर व आम्लकारक चवीमुळे याचा वापर...
डाळिंबाचे औषधी गुणधर्म डाळिंबाची मधुर चव, बियांचा आकर्षक नैसर्गिक लाल...
केळीमधील सूत्रकृमीचे नियंत्रणकेळी पिकामध्ये पाच प्रकारचे सूत्रकृमी जास्त...
आरोग्यदायी तुतीची फळेतामिळनाडू राज्यातील रेशीम संशोधन व जर्मप्लाझम...
ग्लूटेनमुक्त आहार फायदेशीरग्लूटेन हा गहू, राई आणि बार्ली यांसारख्या ठरावीक...
डाळिंबासाठी पायाभूत सुविधांच्या...येत्या काळात डाळिंब फळांच्या बरोबरीने रस, पावडर,...