आरोग्यदायी शेळीचे दूध

Health benefits of goat milk
Health benefits of goat milk

शेळीच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांवरील सूज कमी होते. पोटाच्या इतर आजारांसाठी दूध फायदेशीर आहे. तसेच स्थूलपणा आणि संधिवात कमी करण्यास मदत होते. शेळीपालन हे मुख्यतः मांस उत्पादनासाठी केले जाते. ग्रामीण भागात घरगुती वापरासाठी शेळीच्या दुधाचा वापर केला जातो. शेळीच्या दुधामध्ये विविध पोषणतत्त्व, रोगप्रतिकारक तसेच औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे दूध आरोग्यवर्धक आहे. शेळीचे दूध हे नैसर्गिकरीत्या एकजीव झालेले असते, त्यामुळे ते मानवी शरीरास फायदेशीर आहे. दुधातील स्निग्ध पदार्थ आकाराने सूक्ष्म असून पचनाला अत्यंत हलके असतात.

आरोग्यविषयक फायदे  

  • शेळीच्या दुधात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते. कॅल्शिअम आणि फॉस्फरस ही खनिजे हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत. पोटॅशिअम हे खनिज रक्तदाब तर मॅग्नेशिअम हे हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी फायदेशीर आहे.  
  • कॅल्शिअम आणि फॉस्फरस ही खनिजे नवजात शिशूंच्या शरीरात सहजरीत्या शोषली जातात. त्यामुळे लहान मुलांच्या सामान्य वाढीस यांची मदत होते.  
  • दुधातील आरोग्यदायी घटकांमुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहिल्यामुळे हृदयाचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी मदत करते.  
  • पोटातील जखमांवर उपचारासाठी दुधाचा उपयोग होतो.  
  • दुधाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांवरील सूज कमी होते. पोटाच्या इतर आजारांसाठी दूध फायदेशीर आहे. तसेच स्थूलपणा आणि संधिवात कमी करण्यास मदत करते.  
  • दुधामध्ये झिंक व सेलेनिअमचे चांगले प्रमाण असते. त्वच्या निरोगी राहण्यासाठी आणि जखमा लवकर भरून येण्यासाठी झिंक तर सेलेनिअम रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करते.  
  • दुधामध्ये असलेले अल्फा २ बीटा केसिन मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त असते. कारण हा घटक इन्सुलिन प्रमाण सुरळीत ठेवण्यास मदत करतो.  
  • आयुर्वेदानुसार क्षयरोग, खोकला आणि काही स्त्रीरोगविषयक विकारांसाठी दुधाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
  • संपर्कः डॉ. अनिता चप्पलवार, ९५२०२४०५०९ (पशुजन्यपदार्थ प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com