agriculture news in marathi Health benefits of goat milk | Agrowon

आरोग्यदायी शेळीचे दूध

डॉ. अनिता चप्पलवार, डॉ. शुभांगी नागरे
मंगळवार, 28 जानेवारी 2020

शेळीच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांवरील सूज कमी होते. पोटाच्या इतर आजारांसाठी दूध फायदेशीर आहे. तसेच स्थूलपणा आणि संधिवात कमी करण्यास मदत होते.

शेळीपालन हे मुख्यतः मांस उत्पादनासाठी केले जाते. ग्रामीण भागात घरगुती वापरासाठी शेळीच्या दुधाचा वापर केला जातो. शेळीच्या दुधामध्ये विविध पोषणतत्त्व, रोगप्रतिकारक तसेच औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे दूध आरोग्यवर्धक आहे. शेळीचे दूध हे नैसर्गिकरीत्या एकजीव झालेले असते, त्यामुळे ते मानवी शरीरास फायदेशीर आहे. दुधातील स्निग्ध पदार्थ आकाराने सूक्ष्म असून पचनाला अत्यंत हलके असतात.

शेळीच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांवरील सूज कमी होते. पोटाच्या इतर आजारांसाठी दूध फायदेशीर आहे. तसेच स्थूलपणा आणि संधिवात कमी करण्यास मदत होते.

शेळीपालन हे मुख्यतः मांस उत्पादनासाठी केले जाते. ग्रामीण भागात घरगुती वापरासाठी शेळीच्या दुधाचा वापर केला जातो. शेळीच्या दुधामध्ये विविध पोषणतत्त्व, रोगप्रतिकारक तसेच औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे दूध आरोग्यवर्धक आहे. शेळीचे दूध हे नैसर्गिकरीत्या एकजीव झालेले असते, त्यामुळे ते मानवी शरीरास फायदेशीर आहे. दुधातील स्निग्ध पदार्थ आकाराने सूक्ष्म असून पचनाला अत्यंत हलके असतात.

आरोग्यविषयक फायदे 

 • शेळीच्या दुधात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते. कॅल्शिअम आणि फॉस्फरस ही खनिजे हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत. पोटॅशिअम हे खनिज रक्तदाब तर मॅग्नेशिअम हे हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी फायदेशीर आहे.
   
 • कॅल्शिअम आणि फॉस्फरस ही खनिजे नवजात शिशूंच्या शरीरात सहजरीत्या शोषली जातात. त्यामुळे लहान मुलांच्या सामान्य वाढीस यांची मदत होते.
   
 • दुधातील आरोग्यदायी घटकांमुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहिल्यामुळे हृदयाचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी मदत करते.
   
 • पोटातील जखमांवर उपचारासाठी दुधाचा उपयोग होतो.
   
 • दुधाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांवरील सूज कमी होते. पोटाच्या इतर आजारांसाठी दूध फायदेशीर आहे. तसेच स्थूलपणा आणि संधिवात कमी करण्यास मदत करते.
   
 • दुधामध्ये झिंक व सेलेनिअमचे चांगले प्रमाण असते. त्वच्या निरोगी राहण्यासाठी आणि जखमा लवकर भरून येण्यासाठी झिंक तर सेलेनिअम रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करते.
   
 • दुधामध्ये असलेले अल्फा २ बीटा केसिन मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त असते. कारण हा घटक इन्सुलिन प्रमाण सुरळीत ठेवण्यास मदत करतो.
   
 • आयुर्वेदानुसार क्षयरोग, खोकला आणि काही स्त्रीरोगविषयक विकारांसाठी दुधाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

संपर्कः डॉ. अनिता चप्पलवार, ९५२०२४०५०९
(पशुजन्यपदार्थ प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)


इतर कृषिपूरक
हिरव्या चाऱ्याच्या पूर्ततेसाठी मुरघास...हिरव्या चाऱ्याच्या व्यवस्थापनावर उपाययोजना म्हणून...
वाहतूक शेळ्या, मेंढ्यांची...तापमानात जास्त वाढ झाल्यास, शेळ्यांना शरीराचे...
व्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणीभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली. सर्व बचत...
कृषी पर्यटन ः आव्हानात्मक पूरक व्यवसायवसंताच्या मनातील कृषी पर्यटनाच्या विचाराला...
ऋतुमानानुसार म्हशीतील प्रजनन व्यवस्थापनअधिक दूध उत्पादनाकरिता म्हशीमधील प्रजनन सक्षम...
जैवपुंज निर्मितीसाठी विविध कार्बन स्रोतपाण्याचे तापमान, सामू, विरघळलेला प्राणवायू...
जनावरांच्या आहारामध्ये पोषकद्रव्ये...दुधाळ जनावरांच्या शरीराची प्रसूतिदरम्यान झालेली...
मेंढ्यांची संवाद साधण्याची पद्धतमेंढ्यांचे आवाज हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात...
मत्स्यशेतीसाठी पाण्याची गुणवत्ता...मत्स्यशेती यशस्वी होण्यासाठी मत्स्य टाक्यांची...
वयानुसार पुरवा कोंबड्यांना संतुलित खाद्यकुक्कुटपालनामध्ये एकूण खर्चाच्या जवळ जवळ ६० ते ७०...
फळबागेला दिली शेळीपालनाची जोडअजगणी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जगदीश...
जनावरांतील गोचीड तापगोचीड कान, पंजा, उदर, बारीक व नाजूक त्वचा तसेच...
जाणून घ्या ग्राहक संरक्षण अधिनियम, १९८६ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी...
शेळ्यांना द्या समतोल आहार शेळीच्या प्रजननक्षमता वाढीस आहाराचे...
मेंढीपालनाचे वार्षिक वेळापत्रकगाभण मेंढ्यांकडे विशेष लक्ष द्यावे. नवजात...
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
आरोग्यदायी शेळीचे दूधशेळीच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांवरील...
बहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...
..अशी ओळखा दुधातील भेसळवाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ...