औषधी, आरोग्यवर्धित द्राक्ष

द्राक्षाचे आरोग्यदायी दृष्टीने अनेक फायदे आहेत. द्राक्षांमध्ये कॅलरीज, फायबर आणि जीवनसत्त्व क, ई आढळतात.द्राक्षाच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. द्राक्षामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते.
health benefits of grapes
health benefits of grapes

द्राक्षाचे आरोग्यदायी दृष्टीने अनेक फायदे आहेत. द्राक्षांमध्ये कॅलरीज, फायबर आणि जीवनसत्त्व क, ई आढळतात.द्राक्षाच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. द्राक्षामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते.

  • मायग्रेनच्या त्रासावर द्राक्ष गुणकारी असते. द्राक्षांचा रस पिणे फायदेशीर ठरते. नियमित द्राक्ष रसाचे सेवन केल्यास मायग्रेन त्रास कमी होतो.
  • उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना द्राक्ष खाणे फायदेशीर ठरते. द्राक्षाने रक्तदाब नियंत्रित राहतो. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी आठवड्यातून ३ ते ४ वेळा द्राक्षाचे सेवन करावे.
  • द्राक्षामध्ये ग्लूकोज, मॅग्नेशियम आणि सायट्रिक आम्ल यांसारखे पोषकघटक असतात. त्यामुळे अनेक आजारांवर द्राक्ष खाणे लाभदायी मानले जाते. टीबी, कर्करोग आणि रक्तातील संसर्ग यांसारख्या आजारांवर द्राक्ष फायदेशीर आहे.
  • मधुमेह असलेल्यांसाठी द्राक्ष खाणे लाभदायी आहे. द्राक्षाच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. द्राक्षामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते.
  • भूक लागत नसल्यास द्राक्षाचा रस पिणे फायदेशीर ठरते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.
  • शरीरात रक्त कमी असल्यास एक ग्लास द्राक्ष रसात २ चमचे मध घालून प्यावे. त्यामुळे ॲनेमिया दूर होण्यास मदत होते. ॲनेमियामुळे येणारा थकवा कमी होऊन तरतरी येते.
  • संपर्क - प्रा. सागर नागरगोजे, ९६८९२२०००८ प्रा. शशिकिरण हिंगाडे, ९८८१२२२१०२ (आदित्य अन्नतंत्र महाविद्यालय, बीड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com