आरोग्यदायी चंदन

लेप लावण्यासाठी रक्तचंदन उगाळून वापरले जाते. अतिशय थंड गुणात्मक चंदन पित्तनाशक, आग कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. चंदन पावडर मेडीकलमध्ये उपलब्ध असते. त्याचा औषध म्हणून जरूर उपयोग करावा.
Indian sandalwood
Indian sandalwood

लेप लावण्यासाठी रक्तचंदन उगाळून वापरले जाते. अतिशय थंड गुणात्मक चंदन पित्तनाशक, आग कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. चंदन पावडर मेडीकलमध्ये उपलब्ध असते. त्याचा औषध म्हणून जरूर उपयोग करावा. आपल्या सर्वांच्या देवघरात चंदन असतेच. पोटात घेण्यासाठी आणि बाहेरून लेप लावण्यासाठी चंदन उपयुक्त ठरते. औषध म्हणून पोटात घेण्यासाठी श्‍वेतचंदन वापरले जाते. लेप लावण्यासाठी रक्तचंदन उगाळून वापरले जाते. अतिशय थंड गुणात्मक चंदन पित्तनाशक, आग कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. चंदन पावडर मेडीकलमध्ये उपलब्ध असते. त्याचा औषध म्हणून जरूर उपयोग करावा.

  • अपघातामध्ये मुका मार लागून सूज आल्यास रक्तचंदन, तुरटी आणि आंबेहळद यांचा लेप लावावा. आराम मिळतो.
  • उन्हात जास्त काळ राहिल्यामुळे चेहरा काळवंडतो आणि आग होते. अशावेळी चंदन, ज्येष्ठमध पावडर, अनंतमूळ यांचा लेप लावावा. किंवा फक्त चंदनाचा लेप लावावा आणि वाळल्यानंतर पुसून घ्यावे. आग कमी होते.
  • चेहऱ्यावर तारुण्यपीटिका, उष्णतेचे फोड येत असल्यास, चंदन उगाळून फोडांवर लावावे.
  • बऱ्याचदा हवाबदल, जंतूसंसर्ग, उष्णता या कारणांनी ताप जास्त येतो. अशावेळी चंदन उगाळून कपाळ, नाभी, तळहात, तळपाय या ठिकाणी लेप लावावा. शरीराची लाही आणि अस्वस्थपणा कमी होतो.
  • तापामध्ये तोंडाला कोरड पडते आणि खूप तहान लागते. अशावेळी चंदन वाळा, नागरमोथा, सुंठ प्रत्येकी १/४ चमचा पाण्यात घालून उकळून घ्यावे. पाणी थंड झाल्यावर थोडे-थोडे प्रमाणात पिण्यास द्यावे.
  • काही लोकांना उन्हाळ्यात आणि ऑक्‍टोबर हीटमध्ये नाकातून रक्त येते. अशावेळी १ ग्लास पाण्यामध्ये १/४ चमचा उगाळलेले चंदन घालून पिण्यास द्यावे.
  • कमी पाणी पिण्यामुळे लघवीला कमी प्रमाणात होऊन आग होते. अशावेळी तांदळाच्या धुवणामध्ये चंदन उगाळून साखरेसह घेतल्यास उपयोग होतो.
  • लहान, नवजात बाळाला अभ्यंग (मालिश) करण्यासाठी चंदनाच्या तेलाचा उपयोग केला जातो.
  • जास्त ताप आल्यास चंदन आणि कापूर यांचा एकत्रित लेप कपाळावर लावावा. लेपामुळे दाह कमी होतो. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने पोटात औषधे घ्यावीत.
  • पथ्य 

  • तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ उष्णता वाढवितात. त्यामुळे त्यांचे सेवन टाळावे.
  • तसेच मेथी, मुळा, वांगी, शिमला मिरची, मिरची यांचे सेवन कमी करावे.
  • ठेचा, दही, लोणचे, पापड, खारातली मिरची काही दिवस आहारातून वर्ज्य करावी.
  • काळजी 

  • वारंवार नाकातून रक्त येत असेल तर रक्तदाब तपासून घ्यावा.
  • त्वचेचा रंग काळवंडला असेल तर रक्त तपासणी, शुगर तपासणी करून घ्यावी.
  • ताप सतत येत असल्यास, डॉक्‍टरांच्या सल्ला घ्यावा. तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य त्या तपासण्या कराव्यात.
  • संपर्क ः डॉ. विनीता कुलकर्णी, ९४२२३१०३७७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com