आरोग्यदायी फणस

वरून काटेरी पण आतून गोड.. असे म्हटले की फणस हे फळ लगेच डोळ्यांसमोर येते. अनेक पोषक घटकांनी युक्त पण वजनाला जास्त, कापायला अवघड, हाताळायला जिकरीचे आणि ठरावीक भागातच येणारे हे फळ आरोग्यासाठी खूप लाभदायी असते.
health benefits of jackfruit
health benefits of jackfruit

वरून काटेरी पण आतून गोड.. असे म्हटले की फणस हे फळ लगेच डोळ्यांसमोर येते. अनेक पोषक घटकांनी युक्त पण वजनाला जास्त, कापायला अवघड, हाताळायला जिकरीचे आणि ठरावीक भागातच येणारे हे फळ आरोग्यासाठी खूप लाभदायी असते.

वरून काटेरी पण आतून गोड.. असे म्हटले की फणस हे फळ लगेच डोळ्यांसमोर येते. अनेक पोषक घटकांनी युक्त पण वजनाला जास्त, कापायला अवघड, हाताळायला जिकरीचे आणि ठरावीक भागातच येणारे हे फळ आरोग्यासाठी खूप लाभदायी असते. कापा प्रकारच्या फणसातील गरे कडक, खुसखुशीत, चवीला जास्त गोड व रुचकर असतात. बरका प्रकारातील फणसांचे गरे नरम, बिळबिळीत, चवीला कमी गोड किंवा सपक असतात. कापा फणसावरील काटे चपटे, लांबट व निमुळते तर बरका फणसावरील काटे आखूड व पसरट असतात.

  • फणसाचे पिकलेले गरे खाल्ले जातात. त्यापासून जॅम, जेली, लोणची व पाक हे खाद्यपदार्थ तयार करतात. कोवळ्या फणसाची भाजी केली जाते.
  • फणसाची मूळे, साल, फळाचा गर, बी या सर्वांचेच विशेष पोषक आणि आरोग्यवर्धक महत्त्व आहे. या फळाचे सर्वच भाग उपयोगी असतात.
  • पिकलेल्या फणसात सुमारे ६३ ते ७० टक्क्यांपर्यंत जलांश असतो. पोषणमूल्याच्या दृष्टीने १०.५ टक्के ते १३.५ टक्के प्रथिने, २२ ते २५ टक्के कर्बोदके त्यातील सुमारे १४ टक्क्यांपर्यंत शर्करा असून अत्यंत कमी ०.०९ ते ०.१२ टक्के स्निग्धांश असतात. शिवाय पोटॅशिअम, सोडिअम, कॅल्शिअम, झिंक आणि लोह ही महत्त्वपूर्ण खनिजे त्याचसोबत जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात असतात.
  • आरोग्यदायी महत्त्व 

  • पिकलेल्या फणसाचा पल्प करून तो पाण्यात उकळून त्याचे सेवन केल्याने ताजेतवाने वाटते.
  • फणसातील पोटॅशिअम रक्तदाब कमी करण्यास मदत करत असल्याने हृदयावरील अनेक समस्यांवर उपायकारक ठरते.
  • भरपूर प्रमाणात लोह असल्याने ॲनिमियासारख्या विकारांवर फणस खाणे फायद्याचे असते.
  • फणसामध्ये असलेले ‘अ’ जीवनसत्त्व हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी व त्वचेसाठीही उत्तम आहे. फणसामध्ये तंतूची मात्रा जास्त असून गरांच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. तसेच, पचनक्रिया व रक्ताभिसरण क्रिया चांगली राहण्यास मदत मिळून, पचनाशी संबंधित तक्रारीदेखील दूर होतात.
  • फणसाच्या मुळापासून बनवलेला काढा दम्यावर गुणकारी आहे.
  • फणसाच्या बिया त्वचा, डोळे आणि केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर मानले जाते.
  • थायरॉईडचा त्रास असणाऱ्या लोकांनी फणस खाणे फायद्याचे आहे. यातील खनिज आणि तांबे थायरॉईड नियंत्रित करण्यास मदत करतात.
  • हाडांसाठी फणस खाणे खूप लाभदायक असते. यात असलेले मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम हाडांसाठी गुणकारी असते.
  • फणसातील अ आणि क जीवनसत्त्व रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात.
  • उष्णतेमुळे वारंवार तोंड येत असल्यास फणसाच्या झाडाची कोवळी हिरवी पाने काही सेकंद चावून थुंकून टाकावीत. पानांच्या रसामुळे तोंडातील अल्सर किंवा उष्णतेमुळे आलेले तोंड कमी होण्यास मदत होते.
  • संपर्क - प्रा. पल्लवी कांबळे, ८४५९५९०४८३ (आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, बीड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com