Agriculture news in marathi health benefits of jeshthamadh | Agrowon

आरोग्यदायी ज्येष्ठमध

डॉ. विनीता कुलकर्णी
रविवार, 31 मे 2020

समस्त महिलावर्गासाठी ज्येष्ठमध काही नवीन नाही.  मुखशुद्धीकर म्हणून सुपारी तयार करताना, लहान बाळाच्या गुटीत उगाळून चाटण करताना जेष्ठमधाचा वापर केला जातो. जेष्ठमधाच्या काड्या किंवा पावडर बाजारात उपलब्ध होते. उगाळून द्यायचे असल्यास काडीचा उपयोग केला जातो.
 

समस्त महिलावर्गासाठी ज्येष्ठमध काही नवीन नाही.  मुखशुद्धीकर म्हणून सुपारी तयार करताना, लहान बाळाच्या गुटीत उगाळून चाटण करताना जेष्ठमधाचा वापर केला जातो. जेष्ठमधाच्या काड्या किंवा पावडर बाजारात उपलब्ध होते. उगाळून द्यायचे असल्यास काडीचा उपयोग केला जातो.

कोणत्याही काष्ठौषधीच्या दुकानात जेष्ठमध काढा मिळतो. आयुर्वेदिक मेडिकल स्टोअर मध्ये पावडर सहज उपलब्ध होते. प्रत्येक घरात जेष्ठमध पावडर असायलाच पाहिजे  इतके आरोग्यदायी गुणधर्म जेष्ठमधात असतात.

  • आवाज बसला असेल किंवा घसा दुखत असेल तर जेष्ठमध पावडर १/४ चमचा या प्रमाणात  चघळावी आणि गरम पाणी प्यावे.
  • कोरडा खोकला आणि रात्री ढास लागत असेल तर सितोपलादी चूर्ण आणि जेष्ठमध पावडर प्रत्येकी १/४ चमचा या प्रमाणात एकत्र करून मधासह घ्यावी. खोकला कमी होतो. खूपच कोरडी ढास असेल तर तुपासह चाटण करून सेवन करावे.
  • नवजात बाळासाठी ज्येष्ठमधाची काडी मधामध्ये उगाळून चाटवल्यास फायदा होतो.मात्र याची मात्रा  तज्ञांना विचारून ठरवावी.
  • खूप तिखट चमचमीत अन्न सेवन केल्यास उष्णता वाढून तोंड येते. अशावेळी जेष्ठमध पावडर तुपात मिसळून लावावी. यामुळे  आग कमी होते.
  • अनेकांना  मूळव्याधीचा त्रास असतो. शौचाच्या वेळी  आग होणे, रक्त पडणे अशा तक्रारी दिसतात. यासाठी नियमित औषधे आणि पथ्य पालन करणे आवश्‍यक आहे. तसेच यासोबत अर्धा चमचा जेष्ठमध पावडर तुपासह जेवणाआधी घेतल्यास आग कमी होण्यास मदत होते. जोडीला नागकेशर, चंद्रकला वटी यांचा तज्ञांच्या सल्ल्याने उपयोग केल्यास फायदा होतो. 
  • उन्हात काम केल्याने, पाणी कमी सेवन केल्याने उन्हाळे लागतात आणि मूत्र विसर्जनावेळी आग होते.  अशावेळी जेष्ठमध खडीसाखर आणि तूप एकत्र करून चाटण घ्यावे.   पाणी भरपूर प्यावे. तज्ञांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार करावा.
  • उष्णतेमुळे शौचाच्या जागी आग होत असल्यास, ज्येष्ठमध चूर्ण तुपात किंवा लोण्यात घालून त्याजागी लावावे.

पथ्य 
जास्त तिखट, तळलेले, मिरची, पापड अशा पदार्थांचे सेवन केल्याने उष्णता वाढते. त्यामुळे त्यांचे सेवन करणे टाळावे.  आंबट थंड ताक, दही, दही अधिक काकडी,  दूध अधिक केळी,  थंड पाणी यामुळे कफ वाढतो. म्हणून अशा गोष्टींचे सेवन करणे वर्ज्य करावे.

काळजी

  • वारंवार शौचाद्वारे रक्त पडणे, तोंड येणे अशा तक्रारी सतत होत असल्यास डॉक्टारांच्या सल्याने योग्य औषधोपचार घ्यावा.
  • कफ जास्त असेल,  ताप असेल, श्‍वास घेण्यास त्रास होत असेल, आडवे झोपल्यावर कप अधिक वाढत असेल तर तज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य त्या तपासण्या करून उपचार घ्यावेत.

(टीप - जेष्ठमधाचा उपयोग तज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.)

संपर्क - डॉ. विनीता कुलकर्णी, ९९२२३१०३३७


इतर महिला
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास चिकन अन्...भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने चिकन...
आरोग्यदायी हिंगआपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी...
थेट भाजीपाला विक्रीतून शेती झाली सक्षमथेट ग्राहकांना शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी स्वतःहून...
पूरक उद्योगातून मिळाली आर्थिक साथपरभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावातील झाडे...
आरोग्यदायी फणसवरून काटेरी पण आतून गोड.. असे म्हटले की फणस हे फळ...
गटामुळे मिळाली शेती, पूरक उद्योगाला...  टाकळीमिया (ता. राहुरी, जि. नगर) येथील...
अजीर्ण, अपचनावर गुणकारी बडीशेपकोणताही सण, समारंभ आणि घरगुती कार्यक्रमाच्या...
नाचणी प्रक्रियेतून मिळवली आर्थिक समृद्धीकोकणात भातशेतीबरोबर नाचणीची लागवड मोठ्या प्रमाणात...
गुणकारी कोकमकोकम सरबतामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते....
महौषधी जिरेस्वयंपाकात, पदार्थात, मसाल्यात उपयुक्त असणारे...
किरकोळ आजारांकडे नको दूर्लक्षमहिलांनी घराकडून शेताकडे जाताना चेहऱ्यावर पदर...
आरोग्यदायी ज्येष्ठमधसमस्त महिलावर्गासाठी ज्येष्ठमध काही नवीन नाही....
कुक्कुटपालन, परसबागेने दिली आर्थिक साथचिंचघरी (ता.चिपळूण,जि.रत्नागिरी) येथील अंजली...
महिलांमध्ये तयार झाली स्वयंरोजगाराची ‘...ग्रामीण भागातील महिलांना छोट्या उद्योगातून रोजगार...
आरोग्यदायी कलिंगडकलिंगडात जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात असून...
शेतीमधील ‘विमेन चॅम्पियन'पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि नाशिक जिल्ह्यातील...
आरोग्यदायी हळदस्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार...
औषधी, आरोग्यवर्धित द्राक्षद्राक्षाचे आरोग्यदायी दृष्टीने अनेक फायदे आहेत....
आरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...
वाढवा प्रतिकार क्षमतासध्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे....