Agriculture news in marathi health benefits of kokam | Agrowon

गुणकारी कोकम

पल्लवी कांबळे, चंद्रकला सोनवणे
गुरुवार, 11 जून 2020

कोकम सरबतामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. त्वचा निरोगी राहण्यासाठी कोकम खूप उपयोगी आहेत. आहारात कोकमाचा नियमित वापर केल्यास पोट साफ राहण्यास मदत होते. कोकमामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, तंतूमय पदार्थ व क जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते.

कोकम सरबतामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. त्वचा निरोगी राहण्यासाठी कोकम खूप उपयोगी आहेत. आहारात कोकमाचा नियमित वापर केल्यास पोट साफ राहण्यास मदत होते. कोकमामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, तंतूमय पदार्थ व क जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते.

कोकम सेवनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदानुसार कोकम ही अत्यंत उपयोगी वनस्पती आहे. कोकम सरबतामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. त्वचा निरोगी राहण्यासाठी कोकम खूप उपयोगी आहेत. आहारात कोकमाचा नियमित वापर केल्यास पोट साफ राहण्यास मदत होते. कोकमामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, तंतूमय पदार्थ व क जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार कोकम हे रक्तपित्तशामक, दीपक, पाचक व ग्राही गुणधर्माचे आहे.

कोकमचा वापर अन्नपदार्थ साठविण्यासाठी आणि आंबटपणा आणण्यासाठी केला जातो. कोकमापासून अमसूल, कोकम आगळ (मिठाचा वापर करून साठवलेला रस) आणि कोकम सरबत तयार केला जातो. कोकमाच्या बियांमधील तेलास कोकम बटर असे म्हणतात. कोकम बटरचा उपयोग सौंदर्य प्रसाधने, औषधे किंवा मलमांमध्ये केला जातो.

 • मराठी नाव - आमसूल,
 • संस्कृत नाव - साराम्ल
 • इंग्रजी नाव - कोकम
 • शास्त्रीय नाव - गार्सिनिया इंडिका
 • कुळ - गटिफेरी

औषधी उपयोग

 • चरकाचार्याच्या मते चिंचेपेक्षा कोकम हे जास्त औषधी गुणधर्मयुक्त व शरीरास गुणकारी आहे.
 • कोकम पाण्यात टाकून त्याचा काढा करून प्यायल्यास अपचन दूर होते.
 • कोकमामध्ये पाणी घालून त्याचा गर बनवावा. हा गर पाण्यात टाकून त्यात वेलची, खडीसाखर घालून सरबत बनवावे. हे सरबत प्यायल्याने आम्लपित्त, दाह, तृष्णा, उष्णतेचे विकार दूर होतात.
 • कोकमचा गर, नारळाचे दूध, कोथिंबीर व थोडे ताक एकत्र करून त्याची सोलकढी बनवून जेवणासोबत प्यावी. यामुळे घेतलेल्या अन्नांचे पचन व्यवस्थित होते.
 • अतिसार, संग्रहणी आणि रक्ताचे जुलाब हे पोटात मुरडा येऊन होत असतील तर कोकम कुसकरून गाळलेले पाणी प्यावे.
 • अंगावर पित्त उठले असल्यास कोकमचा गर संपूर्ण अंगास लावावा.
 • पोटात कळ येऊन आव पडत असल्यास कोकमचे तेल भातावर घालून तो भात खावा.
 • हातापायांची उष्णतेमुळे आग होत असेल तर कोकमचे तेल संपूर्ण अंगाला चोळावे. यामुळे उष्णता कमी होऊन दाह कमी होतो.
 • हिवाळ्यात थंडीमुळे ओठ फुटणे किंवा त्वचा कोरडी पडून भेगा पडणे यासाठी कोकमचे तेल कोमट करून लावावे.
 • आहारामध्ये कोकमचा नियमितपणे वापर केल्यास अरुची, आम्लपित्त, भूक मंद होणे, अपचन इ. तक्रारी दूर होऊन आहाराचे पचन चांगले होते.
 • कोकम (१० तोळे ) पाण्यात भिजत घालावे. नंतर ते कोकम पाण्यात कुसकरून ते पाणी गाळून घ्यावे. त्यात जिरेपूड, साखर घालून ते पाणी प्यायले असता शरीरावर आलेले शीतपित्त दूर होते.
 • मूळव्याधीचा त्रास होत असेल व रक्त पडत असल्यास कोकमचा गर दह्यावरच्या निवळीत कालवून ती निवळी प्यावी. यामुळे रक्त पडणे बंद होते.
 • कोकमच्या सालीपासून अमसूल तयार केले जाते. रोजच्या जेवणात तसेच सोलकढी तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो.
 • अमृत कोकम (सिरप) या पेयाच्या सेवनाने शरीराला थंडावा मिळतो. अमृत कोकम बनविण्यासाठी ताज्या कोकम फळांच्या सालीचा वापर करतात.

संपर्क-  प्रा. पल्लवी कांबळे, ८३२९३७५३९०
(आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, बीड.


इतर महिला
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
गृह उद्योगाच्या माध्यमातून महिलांना...कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याची क्षमता प्रत्येक...
शाश्वत ग्राम, शेती अन कौशल्य विकासावर भरशाश्वत ग्रामविकास, शेती, आरोग्य, शिक्षण आणि...
वातविकारांवर गुणकारी एरंडएरंड ही वनस्पती सगळ्यांना सुपरिचित आहे. घरातील...
आरोग्यदायी सुरणसुरण एक कंद पीक आहे. सुरणचे दोन भाग ...
केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी माका ​माका सगळीकडे अगदी सहज मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो...
मळमळ, पित्तावर आमसूल फायदेशीरआमसूल महिलावर्गामध्ये अधिक लोकप्रिय आहे....
महिला शेतकरी कंपनीने दिली शेती, ग्राम...शेती आणि पूरक उद्योगांना चालना देण्यासाठी रिहे (...
खोकला, अशक्तपणावर गुणकारी काळा मनुकालहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत काळा मनुका सर्वांना...
काथ्या, काजू प्रक्रिया उद्योगात...कठोर परिश्रम आणि संकटांना ताकदीने तोंड देत इळये (...
ग्लूटेनमुक्त आहार फायदेशीरग्लूटेन हा गहू, राई आणि बार्ली यांसारख्या ठरावीक...
आरोग्यदायी आघाडा,भोकर,पेंढारीनिसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या रानभाज्या आणि फळे...
उमाताईंनी मिळवली आयुष्याची भाकरी गाडीवर फिरून ज्वारीच्या कडक भाकरीची विक्री करत...
अपचन, खोकला, कफावर गुणकारी पिंपळी पावडर आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना पिंपळी नक्कीच...
नैसर्गिकरीत्या वाढवा रोगप्रतिकारक शक्तीरोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच शरीरात बाहेरून प्रवेश...
कुक्कुटपालन, भात रोपवाटिका व्यवसायातून...विंग (ता. खंडाळा,जि.सातारा)  गावातील तेरा...
महिला बचत गट बनवतो २६ प्रकारचे मसालेपाहुणेवाडी (ता.बारामती, जि.पुणे) येथील सुवर्णा...
बहुगुणी वेलचीवेलची म्हणजेच वेलदोडा. मसाला तसेच मुखशुद्धीकर...
महिला बचतगटाचा ‘जय भोलेनाथ’ ब्रॅण्डभेंडा बुद्रूक (ता. नेवासा,जि.नगर) येथील वीस...