नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
कृषी प्रक्रिया
अळिंबीचे पौष्टिक, औषधी गुणधर्म अन् आहारातील महत्त्व
लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी अळिंबी (मशरूम) चे सेवन केले पाहिजे. अळिंबीमध्ये अनेक पोषकतत्त्वे असतात. अळिंबी पौष्टिक व स्वास्थवर्धक असते. यातून अतिरिक्त ऊर्जा मिळते.
लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी अळिंबी (मशरूम) चे सेवन केले पाहिजे. अळिंबीमध्ये अनेक पोषकतत्त्वे असतात. अळिंबी पौष्टिक व स्वास्थवर्धक असते. यातून अतिरिक्त ऊर्जा मिळते. त्यामुळे लहान मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास चांगला होतो.
जगभरामध्ये अळिंबीच्या विविध प्रजाती अस्तित्वात आहेत. अळिंबीतील अनेक पोषकद्रव्ये आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पदार्थांना चव येण्यासाठी किंवा पदार्थाचा पोत बदलण्यासाठी मशरूमचा वापर केला जातो. पिझ्झा किंवा बर्गर सारख्या पदार्थांमध्ये अळिंबीचा आवर्जून वापर होतो. अळिंबीमध्ये उच्च प्रतीची प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे अळिंबी अतिशय सात्त्विक आणि पौष्टिक आहार मानला जातो. अळिंबीत जीवनसत्वे क, ब आणि ड तसेच पोटॅशिअम, फॉस्फरस, कॅल्शिअम, लोह, कॉपर, झिंक, मँगनीज इत्यादी खनिजे मुबलक प्रमाणात असतात. या लेखात अळिंबीतील बहुमूल्य पौष्टिक, औषधी गुणधर्म आणि अळिंबी सेवनाचे फायदे पाहूयात.
अळिंबीचे पौष्टिक आणि औषधी गुणधर्म
मशरूममध्ये कॅलरी कमी प्रमाणात असतात. मात्र, प्रथिने, तंतुमय पदार्थ, लोह, खनिज पदार्थ, जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात मिळतात. मशरूममध्ये ॲन्टी व्हायरल आणि कॅन्सर विरोधी गुणधर्म आढळून येतात.
पचनास सोपे प्रथिने
अळिंबीमध्ये उच्च प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे अळिंबीचा आहार अतिशय सात्विक व पौष्टिक मानला जातो. मशरूम खाण्यामुळे मुबलक प्रमाणात अमिनो आम्ल (लायसीन आणि ट्रीप्टोफॅन) मिळतात. यामुळे प्रथिनांचे पचन चांगले होते. इतर कडधान्य आणि मटनामध्ये या आम्लांची कमतरता आढळून येते.
जीवनसत्त्व समृद्ध
अळिंबीमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे असतात. जीवनसत्त्व क, जीवनसत्त्व बी-१, बी-२, बी-९, बी-१२ आणि ड-२ मुबलक प्रमाणात आढळतात. ही जीवनसत्त्वे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. उदा. अशक्तपणापासून बचाव, गर्भवती माता आणि तिच्या बाळासाठी फायदेशीर, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त असतात.
प्रतिकारशक्ती मजबुती करण्यासाठी
काही लोकांना सतत अशक्त किंवा आजारी असल्यासारखे वाटते. याचे मुख्य कारण त्या लोकांची कमकुवत रोगप्रतिकारशक्ती आहे. रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी अळिंबीचे सेवन फायदेशीर ठरते. अळिंबीतील पॉलिसेकेराइड्स मुळे शरीरातील प्रथिनांची मात्रा वाढवली जाऊन पेशींचे कार्य सुधारते. तसेच अळिंबीमध्ये प्राकृतिक प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) असतात. त्यामुळे विषाणू, जिवाणू तसेच इतर बुरशीजन्य रोगांविरूद्ध प्रतिकारशक्ती वाढते
अँटीऑक्सिडंट गुणधर्म
अळिंबीमध्ये अनेक अँटीऑक्सिडंट संयुगे असतात. यामुळे शरीरातील विषारी तसेच निरुपयोगी घटक शरिराबाहेर टाकले जातात.
चयापचय क्रियेमध्ये वृद्धी
खराब चयापचयामुळे ह्रदयरोग, लठ्ठपणा, कर्करोग आणि मधुमेह इत्यादी समस्या उद्भवतात. या समस्यांवर मात करण्यासाठी अळिंबीचे सेवन फायदेशीर ठरते. अळिंबीतील अँटिऑक्सिडेंट आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म या सर्व समस्या दूर करण्यास उपयुक्त असतात. तसेच चयापचय मजबूत करते.
अतिरिक्त उर्जाशक्तीचा स्रोत
लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी अळिंबीचे सेवन केले पाहिजे. अळिंबीमध्ये अनेक पोषकतत्त्वे असतात. अळिंबी पौष्टिक व स्वास्थवर्धक असते. यातून अतिरिक्त ऊर्जा मिळते. त्यामुळे लहान मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास चांगला होतो.
कर्करोगावर गुणकारी
अळिंबीमध्ये अनेक कर्करोगविरोधी गुणधर्म असतात. हे शरीरातील कर्करोगाच्या गाठी तयार होण्यास प्रतिबंध करतात. तसेच कर्करोग वाढविणाऱ्या पेशींची वाढ रोखण्यासाठी अळिंबी फायदेशीर ठरते.
संपर्क ः डॉ. अनिल गायकवाड, ९४२०४९८८११
(लेखक अळिंबी तज्ज्ञ आहेत)
- 1 of 15
- ››