गुणकारी डाळिंब

 health benefits of pomegranate
health benefits of pomegranate

डाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र आढळते. डाळिंबाचे फळ रुचकर असते. डाळिंबाची साल व फळाचा रस औषधी असतो. सालीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. डाळिंबाच्या औषधी गुणधर्माबाबत अनेकांना पुरेशी माहिती नसते. औषधी उपयोग

  • डाळिंब पित्तशामक म्हणून उत्तम काम करते. विशेषतः उन्हाळ्यात थकवा, पित्ताचा त्रास हमखास जाणवतो. अशावेळी डाळिंबाच्या रसामध्ये साखर घालून सेवन करावे. त्यामुळे आराम मिळतो.  
  • तापामध्ये, तापानंतरच्या थकव्यामध्ये डाळिंबाचे दाणे खाल्याने उत्साह वाढतो. पित्ताचे शमन होते.  
  • लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास, वावडिंग आणि डाळिंबाची साल उकळून त्याचा काढा करून द्यावा.  
  • उलट्या, अजीर्ण, अपचन यासाठी डाळिंब रसाचे सेवन करावे.  
  • पोट बिघडल्यास डाळिंबाची साल, सुंठ पावडर, जिरे पाण्यात चांगले उकळून त्याचे सेवन करावे. जास्त प्रमाणात जुलाब झाल्यास वरील मिश्रणात जायफळ उगाळून घालावे. डाळिंबाची साल अतिसारासाठी उपाय म्हणून उत्तम कार्य करते.  
  • जुनाट पित्त, जळजळ यासाठी डाळिंबापासून बनविलेले ‘दाडीमादी घृत' नावाचे औषध उत्तम कार्य करते. घृत म्हणजे तूप! याचे सेवन तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावे.
  • थकवा, थोड्या श्रमानेही दम लागणे, रक्त कमी असणे यासाठी पोटात औषधे जरूर घ्यावीत. पण त्यासोबतच रोज १ डाळिंब जरूर खावे.  
  • वारंवार पोट बिघडणे, अजीर्ण, आव पडणे अशा त्रासामध्ये डाळिंबाची साल उगाळून द्यावी.
  • पथ्य

  • शिळे व तिखट पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी करावे. या पदार्थांच्या सेवनाने पित्ताचा त्रास उद्भवतो.  
  • जेवणाच्या वेळा पाळाव्यात. उशिरा जेवण करणे टाळावे.
  • काळजी

  • वारंवार पित्त, जळजळ, पोटात दुखणे, अजीर्ण असे त्रास सतत होत असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार करावा. योग्य त्या तपासण्या करून घ्याव्यात.  
  • महिलांनी त्यांना होणाऱ्या कोणत्याही दुखण्याकडे दुर्लक्ष करू नये. सहज मिळणारे डाळिंब औषधी म्हणून काम करते, याची जाणीव ठेवून तसा उपयोग करावा.
  • संपर्कः डॉ. विनीता कुलकर्णी, ९४२२३१०३७७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com