agriculture news in marathi health benefits of pomegranate | Agrowon

गुणकारी डाळिंब

डॉ. विनीता कुलकर्णी
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

डाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र आढळते. डाळिंबाचे फळ रुचकर असते. डाळिंबाची साल व फळाचा रस औषधी असतो. सालीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. डाळिंबाच्या औषधी गुणधर्माबाबत अनेकांना पुरेशी माहिती नसते.

औषधी उपयोग

डाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र आढळते. डाळिंबाचे फळ रुचकर असते. डाळिंबाची साल व फळाचा रस औषधी असतो. सालीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. डाळिंबाच्या औषधी गुणधर्माबाबत अनेकांना पुरेशी माहिती नसते.

औषधी उपयोग

 • डाळिंब पित्तशामक म्हणून उत्तम काम करते. विशेषतः उन्हाळ्यात थकवा, पित्ताचा त्रास हमखास जाणवतो. अशावेळी डाळिंबाच्या रसामध्ये साखर घालून सेवन करावे. त्यामुळे आराम मिळतो.
   
 • तापामध्ये, तापानंतरच्या थकव्यामध्ये डाळिंबाचे दाणे खाल्याने उत्साह वाढतो. पित्ताचे शमन होते.
   
 • लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास, वावडिंग आणि डाळिंबाची साल उकळून त्याचा काढा करून द्यावा.
   
 • उलट्या, अजीर्ण, अपचन यासाठी डाळिंब रसाचे सेवन करावे.
   
 • पोट बिघडल्यास डाळिंबाची साल, सुंठ पावडर, जिरे पाण्यात चांगले उकळून त्याचे सेवन करावे. जास्त प्रमाणात जुलाब झाल्यास वरील मिश्रणात जायफळ उगाळून घालावे. डाळिंबाची साल अतिसारासाठी उपाय म्हणून उत्तम कार्य करते.
   
 • जुनाट पित्त, जळजळ यासाठी डाळिंबापासून बनविलेले ‘दाडीमादी घृत' नावाचे औषध उत्तम कार्य करते. घृत म्हणजे तूप! याचे सेवन तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावे.
 • थकवा, थोड्या श्रमानेही दम लागणे, रक्त कमी असणे यासाठी पोटात औषधे जरूर घ्यावीत. पण त्यासोबतच रोज १ डाळिंब जरूर खावे.
   
 • वारंवार पोट बिघडणे, अजीर्ण, आव पडणे अशा त्रासामध्ये डाळिंबाची साल उगाळून द्यावी.

पथ्य

 • शिळे व तिखट पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी करावे. या पदार्थांच्या सेवनाने पित्ताचा त्रास उद्भवतो.
   
 • जेवणाच्या वेळा पाळाव्यात. उशिरा जेवण करणे टाळावे.

काळजी

 • वारंवार पित्त, जळजळ, पोटात दुखणे, अजीर्ण असे त्रास सतत होत असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार करावा. योग्य त्या तपासण्या करून घ्याव्यात.
   
 • महिलांनी त्यांना होणाऱ्या कोणत्याही दुखण्याकडे दुर्लक्ष करू नये. सहज मिळणारे डाळिंब औषधी म्हणून काम करते, याची जाणीव ठेवून तसा उपयोग करावा.

संपर्कः डॉ. विनीता कुलकर्णी, ९४२२३१०३७७


इतर महिला
मुलींना मिळाली जिल्हाधिकारी, पोलिस...बुलडाणा  ः राज्यात जागतिक महिला दिनानिमित्त...
सुनंदाताई भागवत बनल्यात शेकडो मुलींचा...नगर ः त्यांच्या घरची परिस्थिती सर्वसामान्य. मात्र...
राज्यातील चौदा टक्के शेतीक्षेत्राची ‘ती...पुणे: एकविसाव्या शतकात सर्वच क्षेत्रांत महिलांचा...
‘त्या’ पस्तीस जणींचा ‘ते’ बनलेत आधारकोल्हापूर : ‘त्या’ पस्तीस जणींचा ''ते'' गेल्या...
महिला बचत गटाच्या माध्यमातून शेती, पूरक...नांदेड ः जिल्ह्यातील महिला स्वंयसहाय्यता गटांच्या...
आहारातील अंड्याचे महत्त्व..मानवी आहारामध्ये हजारो वर्षांपासून अंड्यांचा...
बहुगुणी नारळपूजाअर्चा, सणवार, लग्नकार्य, बारसे, डोहाळेजेवण...
रानमेवा प्रक्रियेतून साधली आर्थिक प्रगतीकोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील...
बचत गटांच्या उत्पादनांचा ‘रुरल मार्ट’परभणी ः महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत परभणी...
..ही आहेत दुधातील आरोग्यदायी खनिजेदुधामधून मिळणारे कॅल्शिअम हे हाडे व दात मजबूत...
आरोग्यदायी आले, सुंठ पावडरमहिलांना आले आणि सुंठ पावडर परिचित आहे. ओल्या...
आरोग्यदायी शेवगा पावडरलहान मुलांच्या हाडांची वाढ योग्य प्रमाणात...
महिला गटांमुळे मिळाली प्रगतीची दिशानांदेड जिल्ह्यातील सगरोळी (ता. बिलोली) येथील...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
जमिनीची सुपीकता जपत पीक उत्पादनात...नाशिक जिल्ह्यातील कारसूळ (ता. निफाड) येथील संकिता...
थकवा, अशक्‍तपणावर शतावरी गुणकारीशतावरी ही औषधी वनस्पती सर्वांनाच सुपरिचित आहे....
फळबाग, भाजीपाला शेतीतून मिळविली आर्थिक...शेतीचा कोणताच अनुभव नसताना कुऱ्हा (ता. तिवसा, जि...
ग्रामीण महिलांच्या समृद्धीचा महामार्गराज्यातील महिला बचतगट वेगवेगळ्या लघूउद्योगाच्या...
जीवनसत्त्व, क्षार घटकांचा पुरवठा करणारे...अंजिरामध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ हे घटक मुबलक...