आरोग्यदायी हळद

डॉ. विनिता कुलकर्णी स्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या आरोग्यासाठी देखील हळद उत्तम कार्य करते. हे घरातील वृद्ध मंडळींना नक्कीच माहिती असते. सध्याच्या नवीन पिढीला याचे महत्त्व माहिती असणे आवश्‍यक आहे.
health benefits of turmeric
health benefits of turmeric

स्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या आरोग्यासाठी देखील हळद उत्तम कार्य करते. हे घरातील वृद्ध मंडळींना नक्कीच माहिती असते. सध्याच्या नवीन पिढीला याचे महत्त्व माहिती असणे आवश्‍यक आहे.

  • कोणत्याही जखमेवर नेहमी हळद लावली जाते. हळद जंतुघ्न असल्याने पूयस्त्राव, जंतुसंसर्ग याला प्रतिबंध करते.
  • उन्हामुळे त्वचा तापते व काळवंडते. अशावेळी डाळीचे पीठ, साय, दूध आणि हळद असे मिश्रण चेहऱ्याला लावल्यास उपयोग होतो. अर्थात रक्तदोष नाहीसा व्हावा म्हणून पोटातून औषधे घेणे आवश्‍यक आहे.
  • मुकामार लागून सूज आल्यास हळद चंदन (रक्तचंदन) तुरटीचा लेप लावतात. हे सर्व लोकांना परिचित आहेच.
  • मधुमेहात नेहमीच्या औषधांच्या जोडीला आवळा आणि हळदीचे चूर्ण समभाग एकत्र करून अर्धा चमचा प्रमाणात रोज पोटात घ्यावे.
  • कफाचा खोकला, घसादुखी यासाठी गरम दुधात हळद घालून उकळून दुधाचे सेवन करावे.
  • बऱ्याचदा गार वारे अंगावर आले की, खाज येऊन पित्ताच्या गाठी उठतात. अशावेळी हरिद्राखंड हे औषध योग्य मात्रेत दिल्यास उपयोग होतो. हरिद्रा म्हणजे हळद.
  • अनंतमुळ, हळद, चंदन जेष्ठमध यांचा लेप चेहऱ्यावर लावल्यास वर्ण आणि त्वचेचा पोत सुधारतो. हा लेप दुधासह लावावा. औषधाची मात्रा रूग्णापरत्वे बदलते.
  • कफाचे विकार, जंतुसंसर्ग, घसा खवखवणे, सर्दी यासारख्या तक्रारींमध्ये हळद आणि दूध दीर्घकाळापर्यंत घ्यावे.
  • पथ्य

  • कफाचा त्रास असेल तर दही, ताक, थंड पदार्थ यांचे सेवन बंद करावे.
  • त्वचाविकारांसाठी साबणाचा वापर बंद करावा. त्याऐवजी उटणे, मसूर पीठ लावावे. चमचमीत पदार्थांचे सेवन बंद करावे.
  • काळजी  

  • जुनाट त्वचाविकारात पथ्य दीर्घकाळ पाळावे. बरे वाटत असले तरी औषधात खंड पडू देऊ नये.
  • कफाचा खोकला ताप, श्‍वास घेण्यास त्रास होत असल्यास योग्य त्या तपासण्या करून घ्याव्यात.
  • संपर्क - डॉ. विनिता कुलकर्णी,  ९४२२३१०३७७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com