agriculture news in marathi health Benefits of Turmeric | Agrowon

हळदीचे औषधी गुणधर्म

सचिन शेळके
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

हळद ही अत्यंत गुणकारी असून, त्यातील जंतूनाशक गुणधर्मामुळे भारतात प्राचीन काळापासून हळदीचा वापर विविध औषधांमध्ये वापर केला जातो. हळद एकाच वेळी खाद्यपदार्थांचा स्वाद वाढवते, सुरेख रंग देते यासोबतच त्वचा समस्या कमी करते.  

हळद ही अत्यंत गुणकारी असून, त्यातील जंतूनाशक गुणधर्मामुळे भारतात प्राचीन काळापासून हळदीचा वापर विविध औषधांमध्ये वापर केला जातो. हळद एकाच वेळी खाद्यपदार्थांचा स्वाद वाढवते, सुरेख रंग देते यासोबतच त्वचा समस्या कमी करते. यामुळे खाद्य पदार्थांसोबतच सौंदर्य प्रसाधनामध्ये हळदीचा मोठा वापर होतो. 

जागतिक पातळीवरील एकूण उत्पादनांपैकी सुमारे ८० टक्के उत्पादन भारतामध्ये होते. १५ ते २० टक्के हळद निर्यातही होते. उत्पादनामध्ये आंध्र प्रदेश प्रथम क्रमांकांवर असून, त्यानंतर ओडिशा, तमिळनाडू, आसाम, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा क्रम लागतो. भौगोलिक दृष्ट्या हळद लागवडीस भारतात अनुकूल वातावरण असल्यामुळे जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हळदीची लागवड होऊ शकते. महाराष्ट्रातील वातावरण हळद लागवडीस अतिशय अनुकूल आहे. महाराष्ट्रात हळद लागवड प्रामुख्याने सातारा, चंद्रपूर, सांगली, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, नांदेड, नागपूर, हिंगोली, कोल्हापूर आणि परभणी जिल्ह्यात होते. 

   हळदीमधील करक्यूमिन  हा औषधी घटक असून, त्यात अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. आपल्या आहारात अशा अँटीऑक्सिडेंट घटकांचे प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचा समावेश केल्यास विविध आजारांच्या शक्यता कमी होतात. 

१०० ग्रॅम हळदीमध्ये खालील घटक आढळतात.

 • पाणी - ६ ग्रॅम          
 • ऊर्जा - ३९० कॅलरी       
 • प्रथिने - ८.५ ग्रॅम         
 • स्निग्ध पदार्थ - ८.९ ग्रॅम  
 • लोह - ४७.५ मिली ग्रॅम     
 • कर्बोदके - ६९.९ ग्रॅम    
 • तंतू - ६.९ ग्रॅम   
 • निआसीन  - ४.८ मिली ग्रॅम
 • कुरकुमीन - २ ते ६ टक्के 
 • सुगंधी तेल - ५ टक्के

 हळदीचे महत्त्व   

 • हळद हे मसाला व औषधी पिकांतील प्रमुख पीक आहे. हळद ही भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य अंग असून, त्याचा वापर अन्न, सौंदर्य प्रसाधने, पारंपरिक कर्मकांडे व विधी, औषधे, रंग अशा अनेक  बाबींमध्ये केला जातो. 
 • भारतीय पाककृतींमध्ये हळदीचा वापर होतो. जवळपास प्रत्येक शाकाहारी वा मांसाहारी पदार्थांत वापर होतो. 
 • भारतीय प्राचीन उपचार शास्त्र असलेल्या आयुर्वेदातही हळदीचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे. भारतीय हळद ही जागतिक पातळीवर सर्वोत्तम मानली जाते.

औषधी गुणधर्म 

 • हळदीमधील घटकांमुळे विविध प्रकारच्या संसर्गांपासून तुमचे संरक्षण होते. मुख्यतः घशाला संसर्ग झाला असल्यास दुधात हळद घालून प्यायल्यास त्याचा फायदा होतो.
 • हळदीमुळे जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध होतो. परिणामी हळदीचा वापर जखमांवर लावण्यासाठी केला जातो. त्यातील अँटिसेप्टीक गुणधर्मामुळे जखम लवकर भरून येते.
 • हळद रोज खाल्याने पित्त वाढत असले तरी जेवण पचण्यास मदत होते.
 • आपल्या रोजच्या आहारात नियमितपणे हळदीचा वापर केल्यास शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
 • हळदीचे पाणी पिण्यामुळे आपल्या डोके शांत होण्यास मदत मिळते.
 • हळदीमधील एका अँटीऑक्सिडेंट घटकाचा उपयोग कर्करोगाच्या पेशींना नष्ट करण्यासाठी होऊ शकतो. 
 • पोट साफ होत नसल्यास गरम पाण्यात लिंबू, हळद आणि मध टाकून ते पाणी घ्यावे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. पोटही साफ होते.
 • हळदीचे पाणी नियमितपणे प्यायल्यास मुक्त विषारी कणांशी (फ्री रॅडिकल्स) लढण्यास मदत होते. 
 • ‘बायोकेमिस्‍ट्री ॲण्ड बायोफिजिकल रिसर्च’ मध्ये प्रकाशित एका संशोधनामध्ये हळदीचे सेवन केल्याने ग्लुकोजची पातळी कमी राहते.  तसेच टाइप २ च्या मधुमेहाचा धोकाही टळत असल्याचे मांडण्यात आले आहे. 
 • डाळीच्या पिठामध्ये थोडी हळद, थोडा बारीक केलेला कापूर व ४ ते ५ थेंब मोहरीचे तेल टाकून स्नानावेळी अंगाला लावावे. यामुळे त्वचारोग, खाज थांबून पूर्ण अंगकांती सुधारते.

हळद वापरताना...

 • हळद योग्य प्रमाणात सेवन केली तरच ती आरोग्यास खूप फायदेशीर ठरू शकते. यासाठी हळद सेवन करण्याचे योग्य प्रमाण खालीलप्रमाणे-
 • हळदीचा पाणी स्वरूपातील अर्काचे प्रमाण प्रतिदिन ३० ते ९० थेंब.
 • हळकुंडापासून बनवलेली हळद पूड सेवन करणार असाल तर प्रमाण प्रतिदिन १.५ ते २.५ ग्रॅम.  
 • हळदीच्या अर्काचे प्रमाण १५ ते ३० थेंब प्रतिदिन चारवेळा. 
 • हळदयुक्त चहासाठी १० ग्रॅम हळकुंडाचा तुकडा १०० मिलिलिटर पाण्यात उकळावा.

संपर्क ः सचिन शेळके, ८८८८९९२५२२
(संशोधन विद्यार्थी, अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग,  सॅम हिग्गिनबॉटम कृषी, प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय, प्रयागराज, उत्तर प्रदेश.)


इतर औषधी वनस्पती
गुणकारी अन् औषधी हरभरासाधारणपणे हिवाळ्यात कोवळा हरभरा येतो. हरभऱ्याचे...
वातदोषावर उपाय ः हादग्याची फुले, शेंगाआयुर्वेदानुसार त्रिदोषांपैकी वातदोष कमी...
आरोग्यदायी आले आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे...
जाणून घ्या पळसाचे आरोग्यदायी गुणधर्मआपल्या सर्वांना पळस ही वनस्पती परिचित आहे....
आरोग्यदायी आवळाआवळा हे फळ प्रक्रिया केल्यास आपल्याला वर्षभर औषध...
हळदीचे औषधी गुणधर्महळद ही अत्यंत गुणकारी असून, त्यातील जंतूनाशक...
गुणकारी वाळावाळा म्हटले की उन्हाळ्याच्या दिवस आठवतात. माठ...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
सब्जा बियांचे आरोग्यदायी फायदे सब्जामध्ये प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने...
महौषधी ओवास्वयंपाकघरातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे ओवा! अनेक...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...
वातविकारांवर गुणकारी एरंडएरंड ही वनस्पती सगळ्यांना सुपरिचित आहे. घरातील...
आरोग्यदायी सुरणसुरण एक कंद पीक आहे. सुरणचे दोन भाग ...
केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी माका ​माका सगळीकडे अगदी सहज मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो...
मळमळ, पित्तावर आमसूल फायदेशीरआमसूल महिलावर्गामध्ये अधिक लोकप्रिय आहे....
डाळिंबाचे औषधी गुणधर्म डाळिंबाची मधुर चव, बियांचा आकर्षक नैसर्गिक लाल...
आरोग्यदायी तुतीची फळेतामिळनाडू राज्यातील रेशीम संशोधन व जर्मप्लाझम...
खोकला, अशक्तपणावर गुणकारी काळा मनुकालहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत काळा मनुका सर्वांना...
आरोग्यदायी आघाडा,भोकर,पेंढारीनिसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या रानभाज्या आणि फळे...
बहुगुणी वेलचीवेलची म्हणजेच वेलदोडा. मसाला तसेच मुखशुद्धीकर...