आरोग्यदायी आघाडा,भोकर,पेंढारी

निसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या रानभाज्या आणि फळे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहेत. या रानभाज्या पोटदुखी, श्वसनलिका दाह, यकृत विकार, सर्दी, खोकला आदी विकारांवर उपयुक्त आहेत.
wild vegetables
wild vegetables

निसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या रानभाज्या आणि फळे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहेत. या रानभाज्या पोटदुखी, श्वसनलिका दाह, यकृत विकार, सर्दी, खोकला आदी विकारांवर उपयुक्त आहेत. आघाडा औषधी उपयोग

  • जेवणापूर्वी आघाड्यांचा काढा घेतल्यास पाचक रस वाढतो. जेवल्यानंतर घेतल्यास आम्लता कमी होते. 
  • रातांधळेपणात उपयुक्त. 
  • भूक वाढवणारी, वात, हृदयरोग, मूळव्याध, मुतखडा, पोटदुखी, अपचन, आमांश, रक्तरोगावर उपयोगी. 
  • उपयुक्त भाग-  कोवळी पाने  पाककृती-  आघाड्यांच्या कोवळ्या पानांची भाजी हादगा  औषधी उपयोग 

  • वातदोष कमी होण्यास उपयुक्त. 
  • भूक लागत नसल्यास तसेच पोट साफ होत नसल्यास अत्यंत गुणकारी. 
  • स्त्रियांची मासिक पाळी नियमित येण्यासाठी तसेच मासिक पाळीत होणाऱ्या त्रासावर उपयुक्त. 
  • ठेचाळलेल्या भागांवर पानांचा लेप लावतात. 
  • उपयुक्त भाग-  फुले, शेंगा.  पाककृती-  फुलांची भाजी, भरीत, शेंगाची भाजी भोकर  औषधी उपयोग 

  • अतिसारात फळे उपयुक्त. या भाजीमुळे आतड्यांची ताकद वाढते. पुष्टी येते. 
  • लोणचे अग्निवर्धक, भूक वाढविण्यास व पचनासाठी चांगले. 
  • उपयुक्त भाग-  फळे  पाककृती-  लोणचे, भाजी बांबू  औषधी उपयोग  भूक व पचनशक्ती वाढवते 

  • उपयुक्त भाग-  कोवळे कोंब, वास्ते 
  • पाककृती-  कोंबाची भाजी, लोणचे.
  • भुई आवळा  औषधी उपयोग 

  • लघवीचे प्रमाण वाढते, दाह कमी होतो. लघवी कमी होणे, मुतखडा, जंतू संसर्ग आदी विकारांवर या भाजीच्या सेवनामुळे चांगला गुण येतो. 
  • रक्तदाब, चक्कर येणे या आजारावर उपयुक्त. 
  • थंडी ताप तसेच सर्दी, खोकल्यावर भाजी उपयुक्त. 
  • उपयुक्त भाग-  पाने, कोवळे खोड, फांद्या  पाककृती-  भाजी मायाळू  औषधी उपयोग 

  • सांध्याच्या वेदना व सूज कमी करण्यासाठी. 
  • रक्त विकारात वाढलेली रक्तातील उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त. 
  • उपयुक्त भाग- पाने  पाककृती-  भाजी, पराठा, भजी कुर्डू  औषधी उपयोग  मूतखडा व लघवीच्या विकारावर उपयुक्त, शक्तिवर्धक 

  • उपयुक्त भाग-  कोवळी पाने 
  • पाककृती-  भाजी, पराठा, भजी
  • बाफळी औषधी उपयोग पोट दुखी व पोट साफ होण्यासाठी, पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी. 

  • उपयुक्त भाग-   भाजी 
  • पाककृती-   भाजी, पराठा, भजी
  • कोहरेल  औषधी उपयोग रक्‍तशुद्धी. 

  • उपयुक्त भाग-  कोळा पाला 
  • पाककृती-  भाजी
  • पेंढारी  औषधी उपयोग 

  • भाजी थंड गुणधर्माची आहे. 
  • पोटात कळ मारून जुलाब होत असल्यास, आव पडत असल्यास कच्चा फळांची भाजी खावी. 
  • लघवी कमी होत असल्यास, लघवीची जळजळ होत असल्यास भाजी खावी. 
  • उपयुक्त भाग-  फळे  पाककृती- फळांची भाजी

    रानभाज्यांचे वर्गीकरण 

    प्रकार नावे 
    रानभाज्या  शेऊळ, लोथ, तरोटा, चाईचा वेल, कुर्डू, बाभळी, तेरा, घोळ, माट, चंदन बटवा 
    रानफळे  आळीव, पेटारा, टेंभुर्णी, चंदन बटवा, करटोली, चीचुडी, भोकर 
    बिया   डोंगरजीरा, कुकुरवळ, तोरण 
    फुले  हादगा, मोह, शिरी, शेवगा 
    बुरशी भूछत्र, भुईफोड 
    कंद  करांदा, चाळीचे कंद, शेवूळ, वळीचे कंद, रानसुरण, वास्ते, कोणफळ 
    शेंगा   टॅटू, हादगा, खरशिंग 
    कोवळे खोड डिनी, मोरडीनी 

    संपर्क- रूपाली देशमुख, ८६९८७०११७७ , उत्तम सहाणे, ७०२८९००२८९. (कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल,जि.पालघर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com