Agriculture news in marathi health benefits of wild vegetables and fruits | Agrowon

आरोग्यदायी आघाडा,भोकर,पेंढारी

रूपाली देशमुख,उत्तम सहाणे
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

निसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या रानभाज्या आणि फळे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहेत. या रानभाज्या पोटदुखी, श्वसनलिका दाह, यकृत विकार, सर्दी, खोकला आदी विकारांवर उपयुक्त आहेत.

निसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या रानभाज्या आणि फळे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहेत. या रानभाज्या पोटदुखी, श्वसनलिका दाह, यकृत विकार, सर्दी, खोकला आदी विकारांवर उपयुक्त आहेत.

आघाडा
औषधी उपयोग

  • जेवणापूर्वी आघाड्यांचा काढा घेतल्यास पाचक रस वाढतो. जेवल्यानंतर घेतल्यास आम्लता कमी होते. 
  • रातांधळेपणात उपयुक्त. 
  • भूक वाढवणारी, वात, हृदयरोग, मूळव्याध, मुतखडा, पोटदुखी, अपचन, आमांश, रक्तरोगावर उपयोगी. 

उपयुक्त भाग- कोवळी पाने 

पाककृती- आघाड्यांच्या कोवळ्या पानांची भाजी

हादगा 
औषधी उपयोग 

  • वातदोष कमी होण्यास उपयुक्त. 
  • भूक लागत नसल्यास तसेच पोट साफ होत नसल्यास अत्यंत गुणकारी. 
  • स्त्रियांची मासिक पाळी नियमित येण्यासाठी तसेच मासिक पाळीत होणाऱ्या त्रासावर उपयुक्त. 
  • रातांधळेपणात उपयुक्त. 
  • ठेचाळलेल्या भागांवर पानांचा लेप लावतात. 

उपयुक्त भाग- फुले, शेंगा. 

पाककृती- फुलांची भाजी, भरीत, शेंगाची भाजी

भोकर 
औषधी उपयोग 

  • अतिसारात फळे उपयुक्त. या भाजीमुळे आतड्यांची ताकद वाढते. पुष्टी येते. 
  • लोणचे अग्निवर्धक, भूक वाढविण्यास व पचनासाठी चांगले. 

उपयुक्त भाग- फळे 
पाककृती- लोणचे, भाजी

बांबू 
औषधी उपयोग 

भूक व पचनशक्ती वाढवते 

  • उपयुक्त भाग- कोवळे कोंब, वास्ते 
  • पाककृती- कोंबाची भाजी, लोणचे.

भुई आवळा 
औषधी उपयोग 

  • लघवीचे प्रमाण वाढते, दाह कमी होतो. लघवी कमी होणे, मुतखडा, जंतू संसर्ग आदी विकारांवर या भाजीच्या सेवनामुळे चांगला गुण येतो. 
  • रक्तदाब, चक्कर येणे या आजारावर उपयुक्त. 
  • थंडी ताप तसेच सर्दी, खोकल्यावर भाजी उपयुक्त. 

उपयुक्त भाग- पाने, कोवळे खोड, फांद्या 

पाककृती- भाजी

मायाळू 
औषधी उपयोग 

  • सांध्याच्या वेदना व सूज कमी करण्यासाठी. 
  • रक्त विकारात वाढलेली रक्तातील उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त. 

उपयुक्त भाग- पाने 

पाककृती- भाजी, पराठा, भजी

कुर्डू 
औषधी उपयोग 

मूतखडा व लघवीच्या विकारावर उपयुक्त, शक्तिवर्धक 

  • उपयुक्त भाग- कोवळी पाने 
  • पाककृती- भाजी, पराठा, भजी

बाफळी
औषधी उपयोग

पोट दुखी व पोट साफ होण्यासाठी, पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी. 

  • उपयुक्त भाग-  भाजी 
  • पाककृती-  भाजी, पराठा, भजी

कोहरेल 
औषधी उपयोग

रक्‍तशुद्धी. 

  • उपयुक्त भाग- कोळा पाला 
  • पाककृती- भाजी

पेंढारी 
औषधी उपयोग 

  • भाजी थंड गुणधर्माची आहे. 
  • पोटात कळ मारून जुलाब होत असल्यास, आव पडत असल्यास कच्चा फळांची भाजी खावी. 
  • लघवी कमी होत असल्यास, लघवीची जळजळ होत असल्यास भाजी खावी. 

उपयुक्त भाग- फळे 

पाककृती- फळांची भाजी

रानभाज्यांचे वर्गीकरण 

प्रकार नावे 
रानभाज्या  शेऊळ, लोथ, तरोटा, चाईचा वेल, कुर्डू, बाभळी, तेरा, घोळ, माट, चंदन बटवा 
रानफळे  आळीव, पेटारा, टेंभुर्णी, चंदन बटवा, करटोली, चीचुडी, भोकर 
बिया   डोंगरजीरा, कुकुरवळ, तोरण 
फुले  हादगा, मोह, शिरी, शेवगा 
बुरशी भूछत्र, भुईफोड 
कंद  करांदा, चाळीचे कंद, शेवूळ, वळीचे कंद, रानसुरण, वास्ते, कोणफळ 
शेंगा   टॅटू, हादगा, खरशिंग 
कोवळे खोड डिनी, मोरडीनी 

संपर्क- रूपाली देशमुख, ८६९८७०११७७ ,
उत्तम सहाणे, ७०२८९००२८९. (कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल,जि.पालघर)


इतर औषधी वनस्पती
गुणकारी अन् औषधी हरभरासाधारणपणे हिवाळ्यात कोवळा हरभरा येतो. हरभऱ्याचे...
वातदोषावर उपाय ः हादग्याची फुले, शेंगाआयुर्वेदानुसार त्रिदोषांपैकी वातदोष कमी...
आरोग्यदायी आले आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे...
जाणून घ्या पळसाचे आरोग्यदायी गुणधर्मआपल्या सर्वांना पळस ही वनस्पती परिचित आहे....
आरोग्यदायी आवळाआवळा हे फळ प्रक्रिया केल्यास आपल्याला वर्षभर औषध...
हळदीचे औषधी गुणधर्महळद ही अत्यंत गुणकारी असून, त्यातील जंतूनाशक...
गुणकारी वाळावाळा म्हटले की उन्हाळ्याच्या दिवस आठवतात. माठ...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
सब्जा बियांचे आरोग्यदायी फायदे सब्जामध्ये प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने...
महौषधी ओवास्वयंपाकघरातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे ओवा! अनेक...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...
वातविकारांवर गुणकारी एरंडएरंड ही वनस्पती सगळ्यांना सुपरिचित आहे. घरातील...
आरोग्यदायी सुरणसुरण एक कंद पीक आहे. सुरणचे दोन भाग ...
केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी माका ​माका सगळीकडे अगदी सहज मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो...
मळमळ, पित्तावर आमसूल फायदेशीरआमसूल महिलावर्गामध्ये अधिक लोकप्रिय आहे....
डाळिंबाचे औषधी गुणधर्म डाळिंबाची मधुर चव, बियांचा आकर्षक नैसर्गिक लाल...
आरोग्यदायी तुतीची फळेतामिळनाडू राज्यातील रेशीम संशोधन व जर्मप्लाझम...
खोकला, अशक्तपणावर गुणकारी काळा मनुकालहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत काळा मनुका सर्वांना...
आरोग्यदायी आघाडा,भोकर,पेंढारीनिसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या रानभाज्या आणि फळे...
बहुगुणी वेलचीवेलची म्हणजेच वेलदोडा. मसाला तसेच मुखशुद्धीकर...