agriculture news in marathi Healthy minerals in milk | Agrowon

..ही आहेत दुधातील आरोग्यदायी खनिजे

डॉ. संदीप रामोड, डॉ. बाळकृष्ण देसाई
मंगळवार, 3 मार्च 2020

दुधामधून मिळणारे कॅल्शिअम हे हाडे व दात मजबूत करण्यासाठी मदत करते. सोडियम हे स्नायूंच्या बळकटीसाठी तसेच आंकुचन व प्रसरण कार्यात मदत करते.आहाराच्या दृष्टीने झिंक महत्त्वाचे आहे. हे फायदे लक्षात घेता दररोजच्या आहारात दुधाचा समावेश करावा.

खनिजे हा सेंद्रिय पदार्थ आहेत. दुधामध्ये खनिजांचे प्रमाण ०.७५ टक्के असते. त्यामध्ये मुख्यतः; कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, क्लोरीन, सल्फर, कोबाल्ट ही महत्त्वाची खनिजे असतात. याशिवाय दुधामध्ये झिंक, ब्रोमीन, सिलिकॉन, बोरॉन अल्प प्रमाणात आढळतात.

दुधामधून मिळणारे कॅल्शिअम हे हाडे व दात मजबूत करण्यासाठी मदत करते. सोडियम हे स्नायूंच्या बळकटीसाठी तसेच आंकुचन व प्रसरण कार्यात मदत करते.आहाराच्या दृष्टीने झिंक महत्त्वाचे आहे. हे फायदे लक्षात घेता दररोजच्या आहारात दुधाचा समावेश करावा.

खनिजे हा सेंद्रिय पदार्थ आहेत. दुधामध्ये खनिजांचे प्रमाण ०.७५ टक्के असते. त्यामध्ये मुख्यतः; कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, क्लोरीन, सल्फर, कोबाल्ट ही महत्त्वाची खनिजे असतात. याशिवाय दुधामध्ये झिंक, ब्रोमीन, सिलिकॉन, बोरॉन अल्प प्रमाणात आढळतात.

कॅल्शिअम

 • दुधामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण ०.१२ टक्के असते. हे कॅल्शिअम दुधामध्ये कॅल्शिअम केसिनेटच्या स्वरूपात आढळते. ताज्या दुधामध्ये कॅल्शिअम सायट्रेट हे खनिज आढळते.

महत्त्व

 • कॅल्शिअम हे हाडे व दात मजबूत करण्यासाठी मदत करते.
   
 • जखम भरण्यास व रक्त गोठण्यास मदत करते.
   
 • हे विकारांच्या कार्याला उत्तेजन करते.
   
 • शरीरातील द्रव्यरसाचा सामू स्थिर ठेवण्यास मदत करते.

फॉस्फरस

 • दुधामध्ये फॉस्फरसचे प्रमाण ०.१५ टक्के एवढे असते. हे P२ O५ या स्वरूपात आढळते. फॉस्फरस हा प्रथिनांबरोबर आढळतो. पाण्यामध्ये तो द्रव्यरूप किंवा विद्राव्यरूपात आढळतो.

महत्त्व

 • हाडे व दात मजबूत करण्याच्या कार्यात सहभागी.
   
 • अप्रत्यक्षपणे चयापचय क्रियेत सक्रिय सहभागी.

सोडियम

 • दुधामध्ये सोडियमचे प्रमाण ०.१५ टक्के एवढे असते. सोडियम क्लोराइड व सोडियम बायकार्बोनेट (खाण्याचा सोडा) या स्वरूपात आढळतो. राख पाण्यामध्ये विद्राव्य आहे.

महत्त्व

 • स्नायूंच्या बळकटीसाठी तसेच आंकुचन व प्रसरण कार्यात मदत करते.
   
 • सोडिअमची शरीरास कमतरता भासल्यास प्रथिनांची चयापचय क्रिया मंदावते.

पोटॅशिअम

 • याचे दुधात प्रमाण ०.१५ टक्के एवढे असते. चिकामध्ये याचे प्रमाण जास्त असते.

महत्त्व 

 • प्राण्यांच्या शरीरात संवेदनक्षमता क्रियेत भाग घेतो.
   
 • शरीरातील याच्या कमतरतेमुळे चयापचयाची क्रिया मंदावते.

फ्लोराइड

 • दुधामध्ये फ्लोराइडचे प्रमाण ०.१८ टक्के एवढे असते. चिकामध्ये याचे प्रमाण जास्त असते. कासदाह झालेल्या जनावरांच्या दुधात फ्लोराइडचे प्रमाण जास्त असते. फ्लोराइडची राख पाण्यामध्ये द्राव्य आहे.

महत्त्व

 • याच्या उपस्थितीत पेशी व द्राव्य यांचे संतुलन योग्य राखण्यास मदत होते.
   
 • शरीरातील सामू योग्य प्रमाणात रहातो.

मॅग्नेशिअम

 • दुधामध्ये मॅग्नेशिअमचे प्रमाण ०.१ टक्के एवढे असते.

महत्त्व

 • हाडे, दात मजबूत बनवण्यासाठी कॅल्शिअम व फॉस्फरस सोबत काम करतो.

सल्फर (गंधक)

 • दुधामध्ये सल्फरचे प्रमाण ०.०२९ टक्के असते. हाडांच्या लवचिकतेसाठी कार्य करतो.

इतर खनिजांचे प्रमाण

 • दुधामध्ये ब्रोमीन, झिंक, कॉपर, कोबाल्ट इत्यादी खनिजे आढळतात. आहारामध्ये कोबाल्टचे प्रमाण कमी असेल तर भूक कमी लागते.
   
 • आहाराच्या दृष्टिकोनातून झिंक महत्त्व आहे. अप्रत्यक्षपणे चयापचय क्रियेत भाग घेतो.

संपर्कः डॉ. संदीप रामोड ९८६०९११९३८
(पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी)

 


इतर महिला
उमाताईंनी मिळवली आयुष्याची भाकरी गाडीवर फिरून ज्वारीच्या कडक भाकरीची विक्री करत...
अपचन, खोकला, कफावर गुणकारी पिंपळी पावडर आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना पिंपळी नक्कीच...
नैसर्गिकरीत्या वाढवा रोगप्रतिकारक शक्तीरोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच शरीरात बाहेरून प्रवेश...
कुक्कुटपालन, भात रोपवाटिका व्यवसायातून...विंग (ता. खंडाळा,जि.सातारा)  गावातील तेरा...
महिला बचत गट बनवतो २६ प्रकारचे मसालेपाहुणेवाडी (ता.बारामती, जि.पुणे) येथील सुवर्णा...
बहुगुणी वेलचीवेलची म्हणजेच वेलदोडा. मसाला तसेच मुखशुद्धीकर...
महिला बचतगटाचा ‘जय भोलेनाथ’ ब्रॅण्डभेंडा बुद्रूक (ता. नेवासा,जि.नगर) येथील वीस...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास चिकन अन्...भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने चिकन...
आरोग्यदायी हिंगआपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी...
थेट भाजीपाला विक्रीतून शेती झाली सक्षमथेट ग्राहकांना शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी स्वतःहून...
पूरक उद्योगातून मिळाली आर्थिक साथपरभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावातील झाडे...
आरोग्यदायी फणसवरून काटेरी पण आतून गोड.. असे म्हटले की फणस हे फळ...
गटामुळे मिळाली शेती, पूरक उद्योगाला...  टाकळीमिया (ता. राहुरी, जि. नगर) येथील...
अजीर्ण, अपचनावर गुणकारी बडीशेपकोणताही सण, समारंभ आणि घरगुती कार्यक्रमाच्या...
नाचणी प्रक्रियेतून मिळवली आर्थिक समृद्धीकोकणात भातशेतीबरोबर नाचणीची लागवड मोठ्या प्रमाणात...
गुणकारी कोकमकोकम सरबतामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते....
महौषधी जिरेस्वयंपाकात, पदार्थात, मसाल्यात उपयुक्त असणारे...
किरकोळ आजारांकडे नको दूर्लक्षमहिलांनी घराकडून शेताकडे जाताना चेहऱ्यावर पदर...
आरोग्यदायी ज्येष्ठमधसमस्त महिलावर्गासाठी ज्येष्ठमध काही नवीन नाही....