सोलापूर जिल्हा बॅंकेच्या बरखास्तीवर ३ ऑक्‍टोबरला सुनावणी

जिल्हा बॅंकेच्या बरखास्तीवर ३ ऑक्‍टोबरला सुनावणी
जिल्हा बॅंकेच्या बरखास्तीवर ३ ऑक्‍टोबरला सुनावणी

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या विरोधातील याचिकेवर आता ३ ऑक्‍टोबरला सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात रिझर्व्ह बॅंकेच्या वकिलांनी कागदपत्रे जागेवर मिळत नसल्याचा मुद्दा पुढे करून पुढील तारीख मागितली. त्यामुळे या याचिकेवरील सुनावणीकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा बॅंकेच्या बरखास्तीवर दाखल या याचिकेच्या पूर्वीच्या सुनावणीत रिझर्व्ह बॅंकेने प्रतिज्ञापत्र दिलेले आहे. बॅंकेच्या १९ संचालकांपैकी १४ जणांकडे ६०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे सहकार खात्याने संचालक मंडळावर कारवाई करावी, अशी शिफारस केल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्यानुसारच ही कारवाई झाल्याचे स्पष्टीकरण सहकार खात्याने दिले. त्यावर ३ ऑक्‍टोबरला म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.

आता काय बाजू मांडली जाणार, याबाबत उत्सुकता आहेच. पण त्यात ''नाबार्ड''ने या कारवाईविषयी कुठलीच शिफारस केलेली नाही, असे म्हणणे दिले. सोमवारच्या सुनावणीत रिझर्व्ह बॅंक अधिक स्पष्टीकरण देणार होती. सहकार खात्याशी झालेल्या पत्रव्यवहारांच्या प्रतीही सादर करण्यात येणार होत्या. परंतु ही कागदपत्रे जागेवर मिळत नसल्याने पुढील तारीख द्यावी, अशी मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केल्याचे संचालकांच्या बाजूने काम पाहणारे ॲड. अभिजित कुलकर्णी यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com