agriculture news in marathi, hearing in the high court on maratha caste reservation, mumbai, maharashtra | Agrowon

मराठा आरक्षणाबाबत १० सप्टेंबरला पुढील सुनावणी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाने अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी मागितला आहे. आम्हाला वेळ नको आहे, पण आयोगाला वेळ हवा आहे. आयोग स्वायत्त आहे. त्यामुळे आम्ही वेळ ठरवू शकत नाही, अशी माहिती शासनाने मंगळवारी (ता. ७) उच्च न्यायालयात दिली.  हिंसक आंदोलने, आत्महत्या थांबवा, असे आवाहन न्यायालयाने मराठा आंदोलनकर्त्यांना या वेळी केले. यासंदर्भातील पुढील सुनावणी येत्या १० सप्टेंबरला होणार आहे.

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाने अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी मागितला आहे. आम्हाला वेळ नको आहे, पण आयोगाला वेळ हवा आहे. आयोग स्वायत्त आहे. त्यामुळे आम्ही वेळ ठरवू शकत नाही, अशी माहिती शासनाने मंगळवारी (ता. ७) उच्च न्यायालयात दिली.  हिंसक आंदोलने, आत्महत्या थांबवा, असे आवाहन न्यायालयाने मराठा आंदोलनकर्त्यांना या वेळी केले. यासंदर्भातील पुढील सुनावणी येत्या १० सप्टेंबरला होणार आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यभरात उमटलेल्या हिंसक आंदोलनांची दखल घेत न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात १४ ऑगस्टला होणारी सुनावणी मंगळवारी (ता. ७) घेतली. याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी राज्यभरातील आंदोलनांची बाब न्यायालयाच्या नजरेस आणून देत याचिकेवरील सुनावणी लवकरात लवकर घेण्याची विनंती केली होती. न्या. रणजित मोरे आणि न्या. अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी सुरू आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा अनेक महिन्यांपासून मागास प्रवर्ग आयोगाकडे प्रलंबित आहे. याबाबत अद्याप कुठलेही ठोस काम दिसत नसल्याने आयोगाने आणि राज्य सरकारने तत्काळ आणि वेळमर्यादेच्या आत मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अशी प्रमुख मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

मंगळवारी सुनावणीवेळी पाच संस्थांकडून मागासवर्ग आयोगाला माहिती मिळणार असल्याचे राज्य सरकारने न्यायालयात सांगितले. हा आयोग वेगवेगळ्या विभागांकडून माहिती घेत आहे. पाच संस्थांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यांचा अभ्यास सुरू आहे. या संस्था आयोगाला आपला अहवाल सादर करतील. गावांमध्ये मराठा समाज किती मागास आहे, राज्य लोकसेवा आयोगात किती मराठा उमेदवार निवडले गेले आहेत याची माहिती घेतली जात आहे. राज्यभर जनसुनावणीही घेतली जात आहे, अशी माहिती राज्य सरकारने न्यायालयात दिली.

तसेच आयोगाला दोन लाख सूचना मिळाल्या आहेत, या माहितीची नोंदणी आणि वर्गीकरण याचे काम सुरू आहे. यासंदर्भात मागासवर्ग आयोगाला ५ सप्टेंबरपर्यंत अहवाल मिळेल. मागासवर्ग आयोग स्वतंत्रपणे काम करत आहे, त्यांची भूमिका तेच सांगू शकतील. येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत मागासवर्ग आयोग आपला अहवाल राज्य सरकारला देणार, अशी माहितीही सरकारने या वेळी न्यायालयात दिली.

दरम्यान, हिंसक आंदोलने, आत्महत्या थांबवा, असे आवाहन न्यायालयाने मराठा आंदोलनकर्त्यांना या वेळी केले. मराठा आंदोलकांच्या आत्महत्यांबाबत न्यायालयाने या वेळी चिंता व्यक्त केली. याबाबतीत सगळेच चिंतेत असून, प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आंदोलने करणे चुकीचे आहे, असे मतही न्यायालयाने व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...
जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटातजळगाव  ः जिल्ह्यात रोज सुमारे साडेसहा लाख...
जळगावात पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथजळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
`औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीची मुदत...औरंगाबाद : झालेली मका खरेदी व बाकी असलेली...
धुळे जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा...देऊर, जि. धुळे  : जिल्ह्यात मका पिकावर...
सांगलीत दुग्ध व्यवसाय बंद पडण्याच्या...सांगली  ः शेतीपूरक दूग्ध व्यवसाय पशुखाद्य...
सिंधुदुर्गात दुध संकलनाची शासकीय...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात दुध संकलन करणाऱ्या...
कोल्हापुरात बिलांअभावी...कोल्हापूर : दुध संघांकडून वेळेत बिले मिळत...
‘पीकविमा प्रस्तावासाठी जनसुविधा केंद्र...नांदेड : ‘‘जिल्ह्यातील जनसुविधा केंद्र (सीएससी)...
परभणीत दर कपातीमुळे दूध उत्पादकांसमोर...परभणी : शासकीय दुग्धशाळेतील दूधाचे दर स्थिर आहेत...
सोलापुरात पावसाने जूनची सरासरी केली...सोलापूर  ः जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली...
भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांतील...सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा...
पुणे जिल्ह्यात दूध दराअभावी शेतकऱ्यांचे...पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे....
हिंगोलीत ‘कर्जमुक्ती’तून ७० हजार...हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
साताऱ्यात कमी दूध दरामुळे उत्पन्न,...सातारा ः दुष्काळग्रस्त तसेच बागायती भागातील...
कृषी केंद्रात दरफलक नसल्यास...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालविणाऱ्या...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’ने केली वीज...सोलापूर : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात...
नगर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक मेटाकुटीलानगर ः जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू...
पदरमोड करून दूध व्यवसाय करण्याची...सोलापूर  ः चारा व पशुखाद्याच्या वाढत्या...
कोल्हापुरात वाढीव वीज बिलांची होळीकोल्हापूर : वाढीव वीज बिलांविरोधात येथील...