agriculture news in Marathi, heat and dry weather condition in state, Maharashtra | Agrowon

राज्यात उष्ण, कोरड्या हवामानाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 मे 2019

पुणे: विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागपूरमध्ये तापमान ४५ अंशांच्या पुढे गेल्याने उष्णतेची लाट आली आहे. शुक्रवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत चंद्रपूर येथे उच्चांकी ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. तर विदर्भात उष्ण लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

पुणे: विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागपूरमध्ये तापमान ४५ अंशांच्या पुढे गेल्याने उष्णतेची लाट आली आहे. शुक्रवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत चंद्रपूर येथे उच्चांकी ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. तर विदर्भात उष्ण लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

राज्याच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव, सोलापूरसह मराठवाडा आणि विदर्भात जवळपास सर्व ठिकाणी तापमान ४१ अंशांच्या पुढे गेले आहे. चंद्रपूरसह नागपूर (४५ अंश) आणि ब्रह्मपुरी (४५.४ अंश) उष्णतेची लाट आहे. विदर्भात ३९ ते ४६ अंश, मराठवाडा ४० ते ४३ अंश, मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान ३३ ते ४२ अंश आणि कोकणात ३० ते ३३ अंशांच्या दरम्यान आहे. विदर्भात उष्ण लाट कायम राहणार असून, उर्वरित राज्यातही चटका वाढण्याचा अंदाज आहे. 

शुक्रवारी (ता. १७) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.६ (१.९), जळगाव ४१.०(-१.७), कोल्हापूर ३७.७ (२.५), महाबळेश्वर ३३.५ (३.८), मालेगाव ४१.६ (१.६), नाशिक ३६.१ (-१.६), सांगली ३९.२ (२.७), सातारा ३९.२ (४.२), सोलापूर ४२.१(२.०), अलिबाग ३०.९ (-२.२), डहाणू ३२.९ (-१.३), सांताक्रूझ ३३.७ (०.३), रत्नागिरी ३३.५ (०.६), औरंगाबाद ४०.४ (०.९), नांदेड ४२.५ (१.०), परभणी ४३.४ (१.६), उस्मानाबाद ४१.४ (२.१), अकोला ४३.० (०.९), अमरावती ४२.६ (०.२), बुलडाणा ३९.२ (०.८), बह्मपुरी ४५.४ (३.३), चंद्रपूर ४६.० (३.०), गोंदिया ४३.५ (१.४), नागपूर ४५.० (२.३), वाशीम ४२.४, वर्धा ४४.५ (१.८), यवतमाळ ४२.० (०.३). 


इतर अॅग्रो विशेष
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...
जलयुक्त फेल, पुढे काय?उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती...
ऊस उत्पादकता २५० टनांपर्यंत न्यावीच...पुणे : देशातील ऊस उत्पादकता एकरी शंभर टन...
कर्जमाफीसाठी आकस्मिकता निधीतून दहा हजार...मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने...
पीकविमा हप्त्यापोटी पाचशे कोटी वितरणास...मुंबई ः पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०१९...
मोसंबी क्लटरमध्ये शाश्‍वत उत्पादन,...औरंगाबाद : मोसंबी उत्पादकांसाठी उत्पन्नाची...
डाळिंब उत्पादनात ३० टक्के घटसांगली ः सुरुवातीला दुष्काळी परिस्थिती, त्यानंतर...
कोरोनाच्या अफवेमुळे पोल्ट्रीचे १५०...पुणे : कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने यांचा...
प्रयोगशील शेतीच्या आधारे चिंचवलीने...पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास...
कहर ‘कोरोना’चाकोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाने जगभर दहशतीचे...
नदी संवर्धनाचा केरळचा आदर्शकेरळ हे भारताच्या दक्षिण टोकाचे एक राज्य. अरबी...
शेतमजुराच्या मुलीने पटकावला ‘शिवछत्रपती...अकोला ः प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एका खेड्यातील...
साडेआठ हजार कोटी खर्चूनही 'जलयुक्त' फेल...मुंबई : फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी जलयुक्त...
पीक विमा योजना यापुढे ऐच्छिक; केंद्र...नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
सेंद्रिय धान्य महोत्सवातून हक्काची...तीन-चार वर्षांपासून कृषी विभागातर्फे पुणे येथे...
प्रयोगशीलतेने घडविली समृद्धी..अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील पाटेगाव (जि. नगर)...
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरीपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...
शिवरायांची भविष्यवेधी ध्येयधोरणेछत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने रयतेचा राजा...
आपणच आपला करावा उद्धारशेती फायद्याची करायची असेल, तर शेतकऱ्यांनी एकत्र...