राज्यात उन्हाचा चटका कमी

weather
weather

पुणे: उत्तर भारतात असलेल्या पश्‍चिमी चक्रावाताचे तीव्र कमी दाब क्षेत्रामध्ये रूपांतर झाले आहे. यामुळे अरबी समुद्रावरून जोरदार वारे वाहत आहेत. वाऱ्यामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी होऊन कमाल तापमानात घट झाली. तर दोन्ही समुद्रांवरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात ढगाळ हवामान होत आहे. तर पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.    पूर्व विदर्भापासून तमिळनाडूपर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्या, पूर्व आणि पश्‍चिमेकडून वाहणारे बाष्पयुक्त वारे यामुळे पूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामान होत आहे. ढगाळ हवामान, वाऱ्यामुळे राज्याचे कमाल तापमानात घट झाली आहे. महाबळेश्‍वर, नाशिक, निफाड, अलिबाग, डहाणू, सांताक्रूझ येथे तापमान ३० अंशांपेक्षा खाली आले आहे. तर विदर्भातही तापमान कमी झाले असले तरी चटका कायम आहे. गुरुवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील नगर येथे उच्चांकी ३५.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर पहाटेच्या वेळी काहीसा गारठा जाणवत आहे.   गुरुवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.६, नगर ३५.२, धुळे  ३२, जळगाव ३१.६, कोल्हापूर ३३.१, महाबळेश्‍वर २६.३, मालेगाव ३४.४, नाशिक २८.५, निफाड २८, सांगली ३४, सातारा ३२.१, सोलापूर ३४.२, अलिबाग २८.२, डहाणू २९.३, सांताक्रूझ २९.९, रत्नागिरी ३१.८, औरंगाबाद ३१, परभणी ३४.३, नांदेड ३५, अकोला ३४.४, अमरावती ३४.२, बुलडाणा ३१, चंद्रपूर ३२.६, गोंदिया ३१.२, नागपूर ३३.९, वर्धा ३४.५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com