राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज

पूर्वमोसमी पावसाचे ढग, वाहणारे वारे यामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी झाला आहे. अनेक ठिकाणी वाढलेला उन्हाचा चटका पुन्हा चाळीशीच्या खाली घसरला आहे.
hawaman
hawaman

पुणे: पूर्वमोसमी पावसाचे ढग, वाहणारे वारे यामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी झाला आहे. अनेक ठिकाणी वाढलेला उन्हाचा चटका पुन्हा चाळीशीच्या खाली घसरला आहे. सोमवारी (ता.२०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील वाशीम येथे देशातील उच्चांकी ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता.२१) राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने जोरदार वाऱ्याचे प्रवाह वाहत आहेत. तर दुपारनंतर ढग जमा होत असल्याने उन्हाचा चटका काहीसा कमी झाला आहे. जळगाव, धुळे, मालेगाव, अकोला वगळता राज्यात सर्वच ठिकाणी तापमान चाळीशीच्या खाली घसरले आहे. हंगामातील उच्चांकी ४३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेल्या अकोला येथे तापमान ४०.६ अंशांपर्यंत खाली घसरले आहे. उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कर्नाटक किनारपट्टीपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने राज्याच्या चारही हवामान विभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजा, जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  सोमवार (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.३, जळगाव ४०.६, धुळे ४०.६, कोल्हापूर ३४.०, महाबळेश्‍वर ३२.७, मालेगाव ४०.६, नाशिक ३८.४, निफाड ३७.८, सांगली ३६.४, सातारा ३८.१, सोलापूर ३९.४, डहाणू ३४.५, सांताक्रूझ ३४.९, रत्नागिरी ३६.९, औरंगाबाद ३९.२, परभणी ३९.८, अकोला ४०.६, अमरावती ३८.६, बुलडाणा ३८.०, ब्रह्मपुरी ३८.५, चंद्रपूर ३७.०, गोंदिया ३५.०, नागपूर ३७.५, वाशीम ४२.६, वर्धा ३८.०. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com