agriculture news in Marathi, heat increased, Maharashtra | Agrowon

उन्हाचा चटका अन् उकाड्यातही वाढ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 मे 2019

पुणे : विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरीसह मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये उष्णतेची लाट आली आहे. उन्हाच्या चटक्याबरोबरच अंशत: ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. आज (ता. २०) विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारा कायम आहे. तर उद्यापासून (ता. २१) कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
 

पुणे : विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरीसह मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये उष्णतेची लाट आली आहे. उन्हाच्या चटक्याबरोबरच अंशत: ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. आज (ता. २०) विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारा कायम आहे. तर उद्यापासून (ता. २१) कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
 

रविवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे सलग दुसऱ्या दिवशी उच्चांकी ४५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. चंद्रपूर येथे तापमान ४५ अंशांपेक्षा अधिक आहे. तर कोल्हापूर, सातारा, सांगलीत तापमान ४० अंशांच्या वर जात तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्याने उष्ण लाट आली आहे. 

आज (ता. २०) मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, मराठवाड्यातील परभणी तर विदर्भातील अकोला, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकणात पावसाला पोषक हवामान होत असल्याने उद्यापासून (ता. २१) तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.
 
रविवारी (ता. १९) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.० (३.३), कोल्हापूर ४०.५(५.३), महाबळेश्वर ३५.१ (५.४), मालेगाव ४१.२ (१.२), नाशिक ३८.९ (१.२), सांगली ४१.२ (४.७), सातारा ४०.१ (४.९), सोलापूर ४२.५(२.४), अलिबाग ३२.४ (-०.७), डहाणू ३३.६ (-०.६), सांताक्रूझ ३४.६ (१.२), रत्नागिरी ३४.१ (१.२), औरंगाबाद ४०.४ (०.९), बीड ४२.५ (२.५), नांदेड ४२.५ (१.०), परभणी ४३.८ (२.०), अकोला ४३.६ (१.५), अमरावती ४३.० (०.६), बुलडाणा ४०.५ (२.१), बह्मपुरी ४५.५ (३.४), चंद्रपूर ४५.८ (२.८), गोंदिया ४३.२ (१.१), नागपूर ४३.९ (१.२), वाशीम ४२.६, वर्धा ४४.० (१.३), यवतमाळ ४२.५(०.८). 

मॉन्सून जैसे थे
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता. १८) दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागराच्या काही भागांपर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मंगळवारपर्यंत (ता. २१) उत्तर अंदमानपर्यंत मॉन्सूनची प्रगती होण्यास पोषक हवामान असून, बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, उत्तर अंदमान बेटांवर मॉन्सून पोचण्याची पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 


इतर अॅग्रो विशेष
पावसाची सर्वदूर संततधार; धरणसाठ्यात वाढपुणे : गेल्या दोन दिवसापासून राज्यातील बहुतांशी...
राज्यात आज आणि उद्या पाऊस जोर धरणारपुणे :  गेल्या तीन ते चार दिवसापासून...
`सक्ती’चे होईल स्वागतयुरिया विकत घेताना सोबत जैविक (जीवाणू) खते...
देशाला स्वातंत्र्य मिळाले पण...शेतमालाचेच भाव का कोसळतात? कांदा, टोमॅटो ...
नवी बाजार व्यवस्था नवी आव्हानेसध्यातरी बाजार समितीचा कर नाही म्हणून व्यापारी...
आकडे, आरोग्य अन् आयातखाद्यतेलावरील आयातशुल्कात वाढ करून आयातीवर...
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
द्राक्ष पीककर्ज कर्जमाफीत बसेना आणि...नाशिक : द्राक्षासाठी घेतलेले पीककर्ज  ...
कर्जमाफीसाठी दीड हजार कोटीमुंबई: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जैविक खतांचा वापर सक्तीचा होणार पुणे: युरिया विकत घेताना जैविक खते देखील विकत...
राज्यातील पंधरा जिल्हा बँकांना ...लातूर ः राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
राज्यात पावसाची रिपरिप सुरुच पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात रिमझिम असून...
निकृष्ट बियाणेप्रकरणी ४० न्यायालयीन खटलेवाशीम ः यंदाच्या हंगामात निकृष्ट बियाण्यामुळे...
चांदोली धरणग्रस्त विस्थापीतांनी केली २५...मांगले, जि. सांगली ः  चांदोली धरणग्रस्तामधील...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
पावसाचा जोर कायम राहणार पुणे: गुजरातच्या दक्षिण भागात चक्राकार...
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्यापुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत...
मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकितजळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका...
कोकणात मुसळधारेचा अंदाजपुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते...