राज्यात उन्हाचा ताप वाढला

राज्यात उन्हाचा ताप वाढला
राज्यात उन्हाचा ताप वाढला

पुणे : राज्याच्या कमाल-किमान तापमानात सातत्याने बदल होत आहेत. रविवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उन्हाचा ताप पुन्हा वाढून बहुतांशी ठिकाणी पारा ३५ अंशांच्या पुढे गेला आहे. उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ३८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. किमान तापमानात वाढ झाली असली तरी सकाळच्या वेळी हवेत गारठा कायम आहे. आज (ता. ४) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  उत्तर आणि पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा संगम आणि बंगालच्या उपसागरावरून होणारा बाष्पाचा पुरवठ्यामुळे रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाच्या हलक्या सरी पडल्या. नागपुरमध्ये हलक्या पावसाने हजरी लावली असून, रामटेक येथे २० मिलिमीटर पाऊस पडल्याचे नागपूर येथील विभागीय केंद्रातर्फे सांगण्यात आले. तर गोंदिया येथे १७ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. रविवारी किमान तापमानात थोडीशी वाढ झाली असली तरी हवेतील गारठा कायम होता. मध्य महाराष्ट्रात जवळपास सर्व ठिकाणी, तर मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान ३५ अंशांच्या पुढे गेले आहे. पुणे, जळगाव, सोलापूर, परभणी येथे कमाल तापमान ३७ अंशांवर पोचले. रविवारी (ता. ३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.५ (१५.७), जळगाव ३७.० (१८.०), कोल्हापूर ३५.५ (१८.९), मालेगाव ३८.८ (१७.६), महाबळेश्वर ३१.० (१७.२), नाशिक ३६.० (१५.५), सांगली ३६.५ (१६.७), सोलापूर ३७.३ (२०.८), अलिबाग ३२.२ (२०.६), डहाणू ३३.६ (२०.०), सांताक्रूझ ३२.० (२०.२), रत्नागिरी ३१.९ (२०.८), औरंगाबाद ३५.४ (१८.४), बीड - (१८.५), नांदेड - (२२.०), उस्मानाबाद ३३.७ (१८.१), परभणी ३७.६ (२१.२), अकोला ३६.० (२२.४), अमरावती ३४.८ (१७.२), बुलडाणा ३४.५ (२०.४), चंद्रपूर ३५.४ (१८.७), गडचिरोली ३४.० (२१.०), गोंदिया ३२.२ (१६.२), नागपूर ३३.७ (२१.२), वर्धा ३३.४ (२२.५), वाशिम ३५.० (१८.२), यवतमाळ ३४.५ (२३.०).   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com