agriculture news in Marathi, heat increased in state, Maharashtra | Agrowon

सूर्य तळपला; चटका तापदायक

टीम अॅग्रोवन
रविवार, 2 जून 2019

पुणे : सूर्य तळपू लागल्याने उन्हाचा चटका अधिकच तापदायक ठरत आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्ण लाट आली आहे. आज (ता. २) विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तर राज्यात वादळी पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. शनिवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा येथे उच्चांकी ४६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

पुणे : सूर्य तळपू लागल्याने उन्हाचा चटका अधिकच तापदायक ठरत आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्ण लाट आली आहे. आज (ता. २) विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तर राज्यात वादळी पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. शनिवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा येथे उच्चांकी ४६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

मे महिन्यात वाढलेले तापमान जून महिन्यात काही दिवस कायम राहणार आहे. यातच पूर्वमासेमी पावसाच्या सरीही यंदा कमी बरसल्या आहेत. परिणामी उन्हाचा चटका असह्य होत आहे. कमाल तापमानाचा पारा चाळीशी पार असेल आणि तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंशांची वाढ झाली असेल, तसेच कमाल तापमान ४५ अंशांच्या वर गेले असेल तर उष्ण लाट समजली जाते. त्यानुसार शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात बहुतांशी ठिकाणी, तर मराठवाड्यातील परभणी, बीड, औरंगाबाद, मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, मालेगाव, सातारा आणि पुणे येथे उष्णतेची लाट होती. 

यातच पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात दुपारनंतर ढगाळ हवामान होत आहे. ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. शुक्रवारी (ता. ३१) सायंकाळनंतर बुलडाणा जिल्ह्यातील वरवटबकाल, बावणबीर, संग्रामपूर, वानखेड येथे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. आज (ता. २) विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, कोकणातील रत्नागिरी, सिंधदुर्ग, मराठवाड्यातील लातूर जिल्हा आणि परिसरात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

शनिवारी (ता. ३१) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.० (४.७), जळगाव ४४.० (२.४), कोल्हापूर ३७.१(३.६), महाबळेश्वर ३३.५ (६.३), मालेगाव ४४.२ (५.४), नाशिक ३९.१ (२.६), सांगली ३९.१ (२.६), सातारा ४१.२ (७.१), सोलापूर ४४.३(५.७), अलिबाग ३५.३ (२.५), डहाणू ३४.८ (०.८), सांताक्रूझ ३४.५ (१.१), रत्नागिरी ३३.५ (१.१), औरंगाबाद ४२.८ (४.७), बीड ४४.२ (५.४), परभणी ४५.५ (५.०), नांदेड ४४.० (३.४), अकोला ४५.८ (४.७), अमरावती ४५.६ (४.७), बुलडाणा ४२.३ (४.९), बह्मपुरी ४५.१ (३.३), चंद्रपूर ४६.० (३.५), गोंदिया ४३.२ (१.०), नागपूर ४६.५ (४.५), वाशीम ४४.४, वर्धा ४६.७ (५.१), यवतमाळ ४५.०(४.२). 

अरबी समुद्रात मॉन्सूनची वाटचाल शक्य
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरुवारी (ता. ३०) संपूर्ण अंदमान बेटांचा परिसर व्यापला. अरबी समुद्राच्या दक्षिणेकडे असलेल्या मालदीव बेटे आणि लगतच्या कोमोरीन भागातही मॉन्सून दाखल झाला आहे. लक्षद्वीप बेटे आणि परिसरावर हवेच्या खालच्या थरात असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती पश्चिमेकडे सरकणार आहे. तर विषववृत्ताकडून येणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह वाढणार असल्याने उद्या (ता. ३) दक्षिण अरबी समुद्रात मॉन्सूनची वाटचाल होण्यास पोषक हवामान आहे.

उष्ण लाट असलेली ठिकाणे 
विदर्भ : वर्धा ४६.७, चंद्रपूर ४६.०, नागपूर ४६.५, अकोला ४५.८, अमरावती ४५.६, बह्मपुरी ४५.१, यवतमाळ ४५.०, बुलडाणा ४२.३. मराठवाडा : परभणी ४५.५, बीड ४४.२, औरंगाबाद ४२.८, मध्य महाराष्ट्र : सोलापूर ४४.३, मालेगाव ४४.२, सातारा ४१.२, पुणे ४०.०. 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...
सांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...
अठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...
सिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...
पशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...
निर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
खारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
शेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...
ऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...