agriculture news in Marathi heat increased in state Maharashtra | Page 2 ||| Agrowon

उन्हाचा चटका, उकाडाही वाढला

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

पुणे : राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब झाली आहे. तर कमाल तापमानातही वाढ झाल्याने पारा तिशीपार गेला आहे. त्यामुळे उन्हाचा चटका अन् उकाड्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

शनिवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील वेंगुर्ला येथे देशातील उच्चांकी ३७.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आणखी दोन-तीन दिवस कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे : राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब झाली आहे. तर कमाल तापमानातही वाढ झाल्याने पारा तिशीपार गेला आहे. त्यामुळे उन्हाचा चटका अन् उकाड्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

शनिवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील वेंगुर्ला येथे देशातील उच्चांकी ३७.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आणखी दोन-तीन दिवस कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ढगाळ हवामान होत आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या अभावी किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झाला आहे. बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा १४ अंशांच्या पुढे गेला आहे.

शनिवारी (ता.१५) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांक ११.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात काहीशी घट दिसून आली. राज्यात दुपारच्या वेळी उन्हाचा चटकाही असह्य होत आहे. कोकणातील वेंगुर्ल्यासह सांताक्रूझ, रत्नागिरी येथे ३५ अंशापेक्षा अधिक तर विदर्भातील अकोला आणि चंद्रपूर येथे ३४ अंश कमाल तापमान नोंदले गेले.

शनिवारी (ता. १५) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १५.३ (३), नगर १४.३ (०), धुळे १३.६, जळगाव १३.० (-२), कोल्हापूर १९.० (२), महाबळेश्‍वर १६.८ (३), मालेगाव १६.२ (५), नाशिक १४.४ (२), निफाड ११.२, सांगली १८.६ (३), सातारा १६.४ (२), सोलापूर १८.७ (०), डहाणू २१.७ (३), सांताक्रूझ १९.६ (१), रत्नागिरी २०.३ (१), औरंगाबाद १५.६ (१), परभणी १६.० (-१), नांदेड १४.० (-१), अकोला १४.९ (-१), अमरावती १६.० (-१), बुलडाणा १६.२ (०), चंद्रपूर १५.० (-२), गोंदिया १४.४(-१), नागपूर १३.४(-२), वर्धा १५.५ (१), यवतमाळ १६.०(-१).


इतर अॅग्रो विशेष
राज्यात उष्ण, दमट हवामानाचा अंदाज;...पुणे : तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाचा...
राज्यात आत्तापर्यंत तेरा हजार टन...नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
प्रयोगशीलतेतून मिळवले आर्थिक स्थैर्यनाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील शिवाजी शंकर देशमुख...
...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' !सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण...
केसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा...औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर...
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या...मुंबई : राज्यात कोरोनाबाधित १४५ नवीन रुग्णांची आज...
दूध भुकटी योजनेसाठी १८७ कोटी मंजूर मुंबई: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या विपरीत...
फळे, भाजीपाला थेट विक्रीसाठी ...नगर : फळे, भाजीपाला विक्रीसाठी नगर जिल्ह्यामधील...
पहिल्याच दिवशी २६० किलो मोसंबी वाजवी...औरंगाबाद : आधी बागवानाने मागितली तेव्हा दिली नाही...
कृषी उत्पादनांसह निर्धारीत अत्यावश्‍यक...नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणूचा प्रसार...
समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर...मुंबई: कृपा करून शिस्त पाळा, सहकार्य करा असे मी...
शेती अवजारे, स्पेअरपार्टस् दुकानांना...नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी (ता...
मराठवाड्यात आजही वादळी पावसाची शक्यता पुणे: उन्हाचा ताप वाढल्याने सोलापूर, मालेगाव,...
करडई संशोधन प्रकल्‍पास मान्यता परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
भारत - इस्राईल मैत्रीतून उजळणार...भारत आणि इस्राईल देशातील पंतप्रधानांच्या भेटीतून...
राज्य अंधारात जाण्याचा धोकाः डॉ. नितीन...मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता.५...
चारशे वर्षात पहिल्यांदाच वारकऱ्यांविना...सोलापूर ः सुमारे ४०० वर्षाची परंपरा असलेल्या...
शेतकरी कंपन्यांचाही ‘ई-नाम’मध्ये समावेश नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर...
राज्यात उन्हाचा चटका वाढला पुणे: एप्रिल महिना सुरू होताच राज्यात उन्हाच्या...