agriculture news in Marathi heat increased in state Maharashtra | Agrowon

उन्हाचा चटका वाढला

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 मार्च 2020

पुणे : विदर्भ, मराठवाड्यात वादळी वारे, गारपीट मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उन्हाचा चटका चांगला वाढला आहे. गुरुवारी (ता.१९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे उच्चांकी ३८.९ अंश सेल्सिअस तर मालेगाव येथे ३८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता.२०) पूर्व विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्याच्या कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : विदर्भ, मराठवाड्यात वादळी वारे, गारपीट मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उन्हाचा चटका चांगला वाढला आहे. गुरुवारी (ता.१९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे उच्चांकी ३८.९ अंश सेल्सिअस तर मालेगाव येथे ३८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता.२०) पूर्व विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्याच्या कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उन्हाचा ताप वाढला असून, सोलापूर, मालेगावसह पुणे, धुळे, सांगली येथे तापमान ३७ अंशांवर आहे. तर कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, परभणी येथे तापमान ३६ अंशांच्या पुढे गेले आहे. रात्रीचे किमान तापमान कमी झाल्याने गारठा गायब झाला आहे. निफाड येथे राज्यातील नीचांक १२.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. वादळी पाऊस व ढगाळ हवामानामुळे विदर्भात मात्र चटका कमी झाला आहे.
 
विदर्भ आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. त्यापासून दक्षिण भारतात वाऱ्याचे प्रवाह खंडित झाले आहेत. तर ओडिशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. या स्थितीमुळे पूर्व भारत आणि विदर्भात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पाऊस शक्य आहे. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उर्वरित राज्यात दुपारनंतर ढगाळ हवामानाची शक्यता आहे. 

गुरूवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.१(१५.८), धुळे ३७.२ (१५.२), जळगाव ३५.४(१९.५), कोल्हापूर ३६.८(२२.९), महाबळेश्‍वर ३२.१(१८.२), मालेगाव ३८.६ (१८.४), नाशिक ३५.८(१५.५), निफाड ३५.५(१२.२), सांगली ३७.०(२२.८), सातारा ३६.२(२०.३), सोलापूर ३८.९(२४.२), अलिबाग ३०.९, डहाणू ३१.४ (२०.५), सांताक्रूझ ३४.४(२१.०), रत्नागिरी -(२१.६), औरंगाबाद ३६.४(१९.४), परभणी ३६.१, अकोला ३५.९ (२१.९), अमरावती ३४.० (२१.०), बुलडाणा ३३.० (२१.१), चंद्रपूर ३५.० (२०.५), गोंदिया २८.६ (२०.०), नागपूर ३१.९(१९.८), वर्धा ३२.४ (२२.१).


इतर अॅग्रो विशेष
राज्यात ३० टक्के दूध वापराविनापुणे: कोरोना विषाणुमुळे पसरलेल्या साथीनंतर सुरू...
औरंगाबाद : शेतकरी गटामार्फत ग्राहकांना...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नगर जिल्ह्यात पाचशे टन भाजीपाला...नगरः कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनमुळे...
जगभरात कोरोनामुळे ३० हजार मृत्यूः...जिनिव्हा: जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरुच...
विदर्भात विजांसह पावसाची शक्यतापुणे : राज्यात सुरू असलेला पूर्वमोसमी पाऊस काहीशी...
थेट विक्रीने सोडविला दराचा प्रश्‍नऔरंगाबाद: कोरोनामुळे शेतमाल विक्रीचा प्रश्न...
पुणे, मुंबईतील सोसायटीधारकांनी...पुणे ः शहरी भागातील हाउसिंग सोसायटी भागातील...
खताचे आठ रेल्वे रेक ‘अनलोड’ पुणे : कोरोना लॉकडाऊननंतर राज्याच्या विविध भागात...
राज्यातील २२० बाजार समित्यांचे कामकाज...पुणे: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी...
लॉकडाऊन वाढवण्याचा विचार नाही : कॅबिनेट...नवी दिल्ली: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी १४...
उन्हाच्या चटक्यात महाराष्ट्र होरपळणारपुणे : यंदाच्या उन्हळ्यात महाराष्ट्र उन्हाच्या...
यंदाची चैत्री वारी रद्द, पंढरपुरात येऊ...सोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची...
पुणे बाजार समितीत १७ हजार क्विंटल फळे...पुणे: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
जळगाव बाजारसमितीत सोशल डिस्टन्सिंगकडे...जळगाव  ः येथील बाजार समितीत भाजीपाल्याची आवक...
देशात कोरोनाबाधीत १०७१ रुग्ण  नवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीत रुग्णांची...
कोकण रेल्वेकडून अत्यावश्यक वस्तूंची जलद...रत्नागिरीः देशभरातील जनतेला आवश्यक वस्तूंचा...
सोनाई प्रकल्पात दहा लाख लिटर दूध नासले...पुणे: कोरोनामुळे राज्यात दुधाचा महापूर सुरू झाला...
बार्शी तालुक्यातील द्राक्षपट्टा...सोलापूर  ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर...
पुणे विभागात ३२९ क्विंटल भाजीपाल्याची...पुणे  ः ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
शाळांमध्ये शिल्लक धान्यांचे ...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील शाळांना...