agriculture news in Marathi heat increased in state Maharashtra | Agrowon

राज्यात उन्हाचा चटका असह्य

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 एप्रिल 2020

अकोला येथे राज्यातील यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४२.८ अंश सेल्सिअस तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथे ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुणे: राज्याच्या कमाल तापमानात चांगलीच वाढ झाल्याने उन्हाचा चटका असह्य होऊ लागला आहे. सोमवारी (ता.१३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४२.८ अंश सेल्सिअस तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथे ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता.१४) राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे, तर उन्हाचा तापही वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.    

पूर्वमोसमी पावसाला पोषक स्थिती असल्याने राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत आहेत. उन्हाचा चटका वाढला असताना, दुपारनंतर ढगाळ हवामान होऊन वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे. कोकण वगळता राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव, अकोल्यासह धुळे, सोलापूर, बीड, परभणी, नांदेड, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे तापमान चाळीशीपार होते. उन्हाचा ताप आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

वाढलेले तापमान, मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक दरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता.१४) कोकणातील सिंधुदुर्ग, मध्यमहाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, विदर्भातील नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

सोमवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.१, जळगाव ४२.६, धुळे ४१.८, कोल्हापूर ३७.५, महाबळेश्‍वर ३१.२, नाशिक ३९.९, निफाड ३९.२, सांगली ३८.२, सातारा ३८.९, सोलापूर ४०.८, डहाणू ३४.५, सांताक्रूझ ३५.७, रत्नागिरी ३२.८, औरंगाबाद ३९.७, बीड ४१.१, परभणी ४१.०, नांदेड ४०.०, अकोला ४२.८, अमरावती ४१.६, बुलडाणा ३८.८, ब्रह्मपुरी ४०.२, चंद्रपूर ४०.५, गोंदिया ३९.८, नागपूर ४१.१, वर्धा ४१.६.


इतर अॅग्रो विशेष
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...
राज्यात पावसाची उघडीप; शेतीकामांना वेगपुणे ः पावसाने उघडीप दिल्याने ओढ्या- नाल्याच्या व...
गुणवत्तापूर्ण संत्रा वाण निर्मितीसाठी...अकोला/नागपूर ः आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी...
राहुरी विद्यापीठातील बदल्या अखेर रद्दपुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामानाची...
कापूस हंगाम लांबणीवर?नागपूर: पावसाचा वाढलेला कालावधी, ढगाळ वातावरण...
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत रब्बी...परभणी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बियाणे खरेदीसाठी...
देशी गोपालनातून शेती केली शाश्वतकिणी (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील सुमित अशोक...
रेशीम शेतीने दिली आर्थिक साथपांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील...
मॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...
कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...
कृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...
कोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी  : कमी मेहनत, कमी...
खावटी अनुदान योजनेच्या नावाखाली...मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली खावटी अनुदान...
मुंबईतील व्यापारी, कामगारांमध्ये कृषी...मुंबई: केंद्र शासनाच्या तीन कृषी विधेयकांचे पडसाद...